मुंबई : चॅम्पियन्स ट्रॉफी वन-डे क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघ शनिवारी दुबईला रवाना झाला. कर्णधार रोहित शर्मा, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यासह प्रमुख खेळाडूंनी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दुबईसाठी उड्डाण केले. (Champions Trophy)
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेला १९ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार असून भारताचा सलामीचा सामना २० फेब्रुवारीला बांगलादेशविरुद्ध होणार आहे. या स्पर्धेमध्ये भारताचा समावेश ‘ग्रुप ए’मध्ये असून पाकिस्तान, न्यूझीलंड आणि बांगलादेश हे या ग्रुपमधील अन्य संघ आहेत. भारताचा सामना २३ फेब्रुवारी रोजी पाकिस्तानशी, तर २ मार्च रोजी न्यूझीलंडशी होईल. काही दिवसांपूर्वीच या स्पर्धेसाठी भारतीय संघ निवडण्यात आला होता. भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे या स्पर्धेत खेळू शकणार नसल्याने त्याच्याऐवजी हर्षित राणाला संघात स्थान देण्यात आले. त्याचप्रमाणे, फिरकीपटू वरुण चक्रवर्तीचाही ऐनवेळी संघात समावेश करून सलामीवीर यशस्वी जैस्वालला राखीव खेळाडूंमध्ये ठेवण्यात आले होते. (Champions Trophy)
शनिवारी रोहितसोबत विराट कोहली, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, रिषभ पंत, लोकेश राहुल, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, हर्षित राणा, अर्शदीप सिंग आणि हर्दिक पंड्या हे खेळाडू दुबईला रवाना झाले. गंभीरबरोबरच प्रशिक्षक वर्गातील टी. दिलीप, मॉर्ने मॉर्केल आणि रायन टेन डॉएश्ट हेसुद्धा यावेळी संघासोबत होते. महंमद शमी आणि शुभमन गिल हे पुढील एक-दोन दिवसांमध्ये संघासोबत जोडले जातील, असे वृत्त आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी भारतीय संघाने इंग्लंडविरुद्ध खेळलेली वन-डे मालिका ३-० अशी एकतर्फी जिंकली होती. (Champions Trophy)
#WATCH | Mumbai: Indian Men’s Cricket Team Captain Rohit Sharma departs for Dubai to participate in the ICC Champions Trophy.
All matches of Team India will be held in Dubai, while the rest will take place in Pakistan. The ICC Champions Trophy will begin on February 19 and will… pic.twitter.com/M6J2lIiGJz
— ANI (@ANI) February 15, 2025
हेही वाचा :