कोल्हापूर : प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणातील आरोपी प्रशांत कोरटकरवर वकिलानेच हल्ला केला. ‘ये पश्या, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करतोस काय?,’ असा संताप व्यक्त करत ॲड. अमितकुमार भाेसले (रा. रुकडी, ता. हातकणंगले) यांनी धावून जात हल्ला केला. पोलिसांनी प्रसंगावधान राखत भोसले यांच्यावर झडप घातली. कोरटकरची सुटका केली. भर कोर्टाच्या आवारात घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली.(Attack on Koratkar)
सकाळी अकराच्या सुमारास ही घटना घडली. कोरटकरविरोधात कोल्हापुरात संतापाची लाट कायम आहे. त्यामुळे तीन दिवसांपूर्वीही त्याला कोल्हापुरी चप्पलने मारण्याचा प्रयत्न झाला होता. याप्रकरणात काहीजणांना पोलिसांनी ताब्यात घेऊन सोडून दिले होते. संतापाचे वातावरण कायम आहे. त्यामुळे शुक्रवारी (२८ मार्च) सकाळी लवकर कोरटकरला कोर्टात हजर करण्यात आले. (Attack on Koratkar)
कोरटकरची पोलिस कोठडी संपत असल्याने त्याला कोर्टात हजर करायचे होते. त्यामुळे सकाळी आठलाच पोलिस त्याला घेऊन आले होते. कोर्टात त्याला उभे केल्यानंतर त्याच्या पोलिस कोठडीत दोन दिवसाची वाढ करण्यात आली. त्यानंतर पोलिस त्याला परत पोलिस ठाण्याकडे घेऊन जात होते. कँटीनच्या पॅसेजमधून घेऊन जात असताना ॲड. भोसले यांनी कोरटकरला उद्देशून ‘तू शिवरायांचा अपमान करतोस काय,’ असे म्हणत त्याच्या अंगावर धावून गेले. त्याच्यावर हल्ला केला. यावेळी पोलिसांनी भोसले यांच्यावर झडप घातली आणि त्यांना बाजूला नेले. त्यांना ताब्यात घेतले.(Attack on Koratkar)
पोलिसांची दक्षता
तीन दिवसांपूर्वी कोरटकरला कोर्टात हजर करण्यात आले. त्यावेळीही कोर्टाच्या आवारात त्याच्यावर हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या प्रकरणातील काहीजणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. हल्ल्याचा प्रयत्न आजही होईल, म्हणून पोलिसांनी दक्षता घेतली होती. पोलिसांनी कोरटकरला कोर्टाच्या आवारात आणण्याआधीच जयदीप शेळके यांना ताब्यात घेतले. शेळके यांनी परवा कोरटकरला पायताणाने मारण्याचा प्रयत्न केला होता.
हेही वाचा :
न्यायालयाकडून इम्रान प्रतापगढी विरोधातील एफआयआर रद्द
म्यानमार, थायलंडला शक्तीशाली भूकंपाचे धक्के
राजकारण
MP Pratapgadhi : न्यायालयाकडून इम्रान प्रतापगढी विरोधातील एफआयआर रद्द
नवी दिल्ली : प्रतिनिधी : काँग्रेसचे खासदार इम्रान प्रतापगढी यांच्याविरुध्द दाखल केलेला एफआयआर सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला. हा निर्णय देताना न्यायालयाने भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे रक्षणाचे महत्व स्पष्ट केले. व्यक्तीच्या मत व्यक्त करण्याच्या अधिकाराचा आदर केला पाहिजे असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. गुजरात पोलिसांनी सोशल मिडियावर खासदार प्रतापगढी यांनी ‘ए खून के प्यासे, बात सुनो’ या गाण्यावर गुजरात पोलिसांनी एफआयआर दाखल केला होता. त्याला प्रतापगढी यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. (MP Pratapgadhi)
सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती उज्ज्ल भुयान या दोन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. न्यायालयाने निकाल देताना असे म्हटले आहे की, प्रतापगढी याच्याविरुद्ध कोणताच गुन्हा घडत नाही. अशा प्रकरणांमध्ये एफआयआर दाखल करण्यापूर्वी पोलिसांनी प्रथम लेखी किंवा बोललेल्या शब्दाचा अर्थ समजून घ्यावा. न्यायालयाने असे म्हटले आहे की “निरोगी लोकशाहीमध्ये, एखाद्या व्यक्तीने किंवा व्यक्तींच्या गटाने व्यक्त केलेल्या विचारांना किंवा विचारांना दुसऱ्या दृष्टिकोनातून विरोध केला पाहिजे. जरी मोठ्या संख्येने लोकांना दुसऱ्याने व्यक्त केलेले विचार आवडत नसले तरी, एखाद्या व्यक्तीच्या विचार व्यक्त करण्याच्या अधिकाराचा आदर आणि संरक्षण केले पाहिजे. कविता, नाटक, चित्रपट, व्यंगचित्र आणि कला यासह साहित्य मानवाचे जीवन अधिक अर्थपूर्ण बनवते,” असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. (MP Pratapgadhi)
न्यायमूर्ती अभय ओक यांनी निकाल देताना पुढे म्हटले की, “भारतीय संविधानाअंतर्गत हमी दिलेल्या मूलभूत अधिकारांचे पालन करणे आणि त्यांची अंमलबजावणी करणे न्यायालयांचे कर्तव्य आहे. कधीकधी, आपण न्यायाधीश, बोललेले किंवा लिहिलेले शब्द आवडत नाहीत, तरीही कलम १९(१) अंतर्गत मूलभूत अधिकारांचे पालन करणे आपले कर्तव्य आहे. आम्ही न्यायाधीश देखील संविधान आणि संबंधित आदर्शांचे पालन करण्याचे बंधन पाळतो.” (MP Pratapgadhi)
“बोललेल्या किंवा लिहिलेल्या शब्दांचा परिणाम अशा लोकांच्या मानकांच्या आधारे ठरवता येत नाही ज्यांना नेहमीच असुरक्षिततेची भावना असते किंवा ज्यांना नेहमीच टीका त्यांच्या सत्तेसाठी किंवा पदासाठी धोका वाटते,” असे न्यायमूर्ती ओक यांनी निरीक्षण केले आहे. (MP Pratapgadhi)
काय आहे हे प्रकरण
जामनगर येथे झालेल्या सामुहिक विवाह कार्यक्रमात तीन जानेवारी रोजी इम्रान प्रतापगढी यांच्याविरोधात गुजरात पोलिसांनी ‘ए खून के प्यासे, बात सुनो’ या प्रक्षोभक गाण्यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांच्यावर धर्म वंश इत्यादीवर आधारित वेगवेगळ्या गटांमध्ये शत्रुत्व निर्माण करणे, राष्ट्रीय एकात्मतेला हानीकारक विधान करणे असे आरोप ठेवण्यात आले होते. एफआयआर मध्ये प्रतापगढी यांनी एक वर शेअर केलेल्या ४६ सेंकदाच्या व्हिडिओ क्लिपचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामध्ये प्रतापगढी गर्दीतून हात हलवत जात आहेत आणि त्यांच्यावर फुलांच्या पाकळ्याचा वर्षाव होत आहे. ज्यामध्ये एक प्रक्षोभक गाणे, राष्ट्रीय एकात्मतेला हानीकारक, धार्मिक भावनांना आक्षेपार्ह असल्याचा आरोप गुजरात पोलिसांनी केला होता.
गुजरात पोलिसांच्या या कारवाईवर खासदार प्रतापगढी यांनी गुजरात उच्च न्यायालयात १७ जानेवारी दाद मागितली होती. पण एफआयआर रद्द करण्याची याचिका फेटाळून लावली होती. गुजरात उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्याविरोधात त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयाने आज त्याचाविरोधातील एफआयआर रद्द केला. (MP Pratapgadhi)
हेही वाचा :
कोल्हापूर : प्रतिनिधी : कितीही धमक्या आल्या तरी घाबरणार नाही. माझी लेखणीची, जिभेची तलवार चालणारच. दडवून, दडपून ठेवलेला सत्य इतिहास जनतेपुढे निर्भिडपणे मांडणार, असा ठाम निर्धार इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी व्यक्त केला. शिव-शंभू, फुले, आंबेडकर सन्मान परिषदेत सावंत यांचा अभिनेते किरण माने आणि ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांच्या हस्ते बहुजन नायक पुरस्काराने गौरव करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना सावंत बोलत होते. हिंदू बहुजन महासंघाने परिषदेचे आयोजन केले होते.(Sanman Parishad)
इतिहास अभ्यासक सावंत यांनी कोल्हापूरची लाल माती, पंचगंगेचे पाणी आणि छत्रपती शिवराय, शंभूराजे, महात्मा फुले, राजर्षी शाहू, डॉ. आंबेडकर यांच्या विचारांच्या ताकदीमुळे कोरटकरसारख्या प्रवृत्तीला निडरपणाने तोंड देण्याची ताकद मिळाल्याचे सांगितले. ते म्हणाले, शिवरायांच्या महाराष्ट्रात शिवाजी महाराजांविषयी कोरटकरच्या विखारी वक्तव्यामुळे मी अस्वस्थ होऊन सोशल मिडियावर पोस्ट केली. त्यानंतर झोपलेला बहुजन समाज जागा झाला. शिवरायांचे रक्त अजूनही जिवंत आहे, याची प्रचिती मिळाली. (Sanman Parishad)
गेल्या दहा वर्षात सत्य बोलायचे किंवा धाडसाने बोलायचे नाही अशी रचना राजकर्त्यांकडून नियोजनपूर्वक केली जात आहे. सत्य बोलणाऱ्या नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, गौरी लंकेश, कलबुर्गी यांना संपवून टाकले. त्यांचे मारेकरीही अजून सापडत नाहीत याकडे इतिहास अभ्यासक सावंत यांनी लक्ष वेधले. ते म्हणाले, लोकांमध्ये भीती निर्माण केली जात आहे. भीती घालण्याचे काम सनातनी मंडळी पूर्वीपासून करत आहेत. पण आपण त्यांना भ्यायचे नाही. त्यांच्यासमोर शड्डू ठोकून उभे रहायचे. आपण शड्डू ठोकून उभे राहिलो तर कोरटकरसारख्या मंडळींना हैद्राबाद, चेन्नईला पळावे लागते. निडरपणे उभे राहिलो तर समाजही आपल्या बाजूने राहतो.
कोरटकर प्रकरणामुळे निडरतेची ताकद नाशिकपासून नागपूरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात पसरली आहे, असे सांगून सावंत म्हणाले, आपण सर्वांनी आता व्यक्त झाले पाहिजे. आपण व्यक्त झालो तर या प्रतिगामी ताकदीशी मुकाबला करु. त्यासाठी खरा इतिहास लोकांसमोर सांगण्याचे काम अखंडपणे करु, असेही ते म्हणाले. (Sanman Parishad)
‘छावा’ चित्रपटातील खोटा इतिहास उघड केला
ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांनी मला ‘छावा’ चित्रपट पाहायला सांगितले आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी संभाजीराजेंचा खरा इतिहास त्यांनी माझी मुलाखत घेऊन जाणून घेतला. ‘छावा’ चित्रपटात खोटा इतिहास दाखवला आहे. त्या चित्रपटात शिर्केंना खलनायक दाखवले आहे, पण संभाजीराजेंना पकडून देणारा खरा इतिहास मी सांगितला. त्याचे अस्सल संदर्भ सांगितले. नाटक, सिनेमा, कांदबऱ्यांतून संभाजीराजेंना कसे बदनाम केले हे सांगितले. त्यामुळे अनेक प्रतिगामी दुखावले गेले आणि त्यातून कोरटकरचे विखारी वक्तव्य बाहेर आले, असेही सावंत यांनी सांगितले.
चित्रपटांत खोटे पत्ते घालण्याचे काम : किरण माने
अभिनेते किरण माने यांनी विशिष्ट प्रवृत्ती चित्रपटातून छुपा प्रचार करत असून त्यातून बहुजन समाजाची माथी भडकावली जात आहेत. चित्रपटात खोटे पत्ते घालण्याचे काम केले जात आहे. चित्रपट खरा नसतो. अशावेळी सत्य सांगणारी माणसे खूप कमी आहेत. इंद्रजीत सावंत यांच्यासारख्या सत्य सांगणाऱ्या माणसांना बळ देण्यासाठी समाजाने पुढे आले पाहिजे, असे सांगितले. (Sanman Parishad)
विखुरलेला समाज एकसंध करूया : चोरमारे
अध्यक्षीय भाषणात ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे म्हणाले, राष्ट्रपुरुषांनी महाराष्ट्र घडवण्याचे मोठे काम केले. पण आता हे राष्ट्रपुरुष विविध समाजात विभागले गेल्याने समाज विखुरला आहे. विखुरलेल्या समाजाला एकत्र करण्याची सुरुवात राजर्षी शाहूंच्या समतानगरीतून झाली पाहिजे. सत्ताधारी मंडळी सरकारला अडचणीत येणारे विषय येऊ नयेत म्हणून वेगवेगळे विषय आणत आहेत. शिवाजी विद्यापीठाचे नाव बदलावे, अशी मागणी पुढे येत आहे. भाजपमध्चे गेलेले नवहिंदुत्ववादी महाडिक, नरके, माने, यड्रावकर ही मंडळी कुणाच्या तरी नादाला लागून ही मागणी रेटत आहेत. ज्या शिवाजी विद्यापीठात शिकले त्यातील छत्रपतींचे नाव काढण्याच्या षड्.यंत्रात सहभागी होत आहेत. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यामुळे सरकारची नाचक्की झाली, त्यावरून लक्ष वळवण्यासाठी अबू आझमीला उठवून बसवले आणि औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा सत्ताधा-यांनी पुढे आणला. हे राजकारण समजून घेतले पाहिजे. पुरोगामी कोल्हापुरात वारंवार दंगली घडवून इथले वातावरण बिघडवण्याचे काम केले जात आहे. दंगलीनंतर सद्भावना मिरवणूक काढून इथल्या लोकांची जबाबदारी संपत नाही. धार्मिक दंगलीच्या काळात मराठा समाजासह बहुजन समाजाने मुस्लिम समाजाची ढाल बनून उभे राहिले पाहिजे.
कीर्तनकार नितिन पिसाळ म्हणाले, महाराष्ट्रात ८५ टक्के बहुजन समाज आहे. त्यांच्या अनेक संघटना आहेत. या संघटनांनी स्वत:चा अहंकार सोडून प्रतिगामी विचारांना हरवण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे. यावेळी जयदीप शेळके, उदय लाड, संजय पटकारे, प्रविण पाटील, निलेश सुतार, शुभम शिरहट्टी, विश्वविक्रम कांबळे, सागर गवळी, प्रमोद पाटील, ओंकार नलवडे यांचा बहुजन योद्धा म्हणून सत्कार करण्यात आला. यावेळी सरोजनी पाटील, वसंतराव मुळीक, चंद्रकांत यादव, शिवराजसिंह गायकवाड, धैयर्शिल घाटगे, संदीप देसाई, डॉ. डी.आर.भोसले, किरण पटवर्धन, शिवाजी खोत, पंडित केसरे, शिवाजी कांबळे, अरुण सावंत, डॉ. अनिल माने आदी उपस्थित होते. शिवप्रबोधिनीचे संस्थापक अध्यक्ष विजय पाटील यांनी स्वागत केले. हर्षल सुर्वे यांनी प्रास्ताविक केले. संपतराव चव्हाण पाटील यांनी आभार मानले.
हेही वाचा :
भाजपने हिंदुत्व सोडले का?
कामरांवर जगभरातून धनवर्षाव!
मुंबई : विशेष प्रतिनिधी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोरेगाव भीमा दंगलीवेळी केलेली चूक पुन्हा करू नये. त्यांनी राजधर्माचे पालन करुन संभाजी उर्फ मनोहर भिडे यांना तुरुंगात टाकावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी (२७ मार्च) पत्रकारांशी बोलताना केली.(Prakash Ambedkar)
भिडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वधर्मीय राजे नव्हते त्यांनी हिंदू स्वराज्याची भूमिका मांडली, असे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. तसेच किल्ले रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरुन युवराज संभाजीराजे आणि भिडे यांच्यात वाद सुरू आहे. (Prakash Ambedkar)
त्याचा संदर्भ घेत प्रकाश आंबेडकर म्हणाले, ‘मला देवेंद्र फडणवीस यांना एवढेच सांगायचे आहे की, तुम्ही मुख्यमंत्री आहात. तुम्ही अटलबिहारी वाजपेयी यांना आठवा. जो कोणी राजदंड हातात घेतो, त्याला राज्य चालवता आले पाहिजे. जो कोणी कायद्याला मानत नसेल त्याला आतमध्ये तुरुंगात टाकण्याची संधी असली पाहिजे. फडणवीस यांनी कोरेगाव भीमाच्या वेळेस संभाजी भिडेंना पाठिशी घालून एकप्रकारे बळ दिले होते. ती चूक आता पुन्हा करु नका, ही माझी अपेक्षा आहे. (Prakash Ambedkar)
‘सौगात-ए-मोदी’ काय आहे?
‘सौगात-ए-मोदी’वरुन आंबेडकर यांनी भाजपावर टीका केली. ते म्हणाले, ‘भाजपकडून रमजान ईदच्या मुहूर्तावर देशातील मुस्लिम समुदायाला ३२ लाख किट वाटण्यात येणार आहेत. या किटमध्ये खाण्यापिण्याचे पदार्थ आणि कपडे असणार आहेत. इतर पक्ष वाटप करतात आणि भाजप आरएएस करते तेव्हा वेगळा संदर्भ येतो. सत्तेत आल्यापासून त्यांची मुस्लिम विरोधी भूमिका राहिली आहे. गोध्रा घडवण्यात आलेले आहे. रेल्वेचे डब्बे जुने घेतले, जळाले नाही आणि आतून जळाले. २०१४ मध्ये सत्तेत आल्यानंतर अखलाक, शाबीर यांचे मॉब लिंचिंग केले जाते आणि त्याचे व्हीडिओ आपल्याला मिळतात.’ (Prakash Ambedkar)
शंकेला वाव
मुस्लिमांना साईडट्रॅक करायचे, हा भाजप आणि आरएसएसचा प्रयत्न आहे. त्यामुळे ‘सौगात-ए-मोदी’ कार्यक्रम येतो, तेव्हा शंका येते. हा राजकीय दृष्टीने केलेला कार्यक्रम आहे. २२ टक्के हिंदू देशाबाहेर बाहेर जाऊ पाहात आहे, त्यामुळे हे कृत्य केले जात आहे. मतांसाठी मुस्लिमांचे लांगूलचालन सुरु आहे. मौलवींनी भूमिका घेतली पाहिजे आणि सांगितले पाहिजे ही किट घ्यायची की नाही. आपल्याला फसवले तर जात नाही ना? याचा विचार कट्टरपंथी हिंदूनी करण्याची वेळ आली असल्याचेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.
हेही वाचा :
फुटीरतावाद शेवटची घटका मोजतोय
भाजपने हिंदुत्व सोडले का?
मुंबई : विशेष प्रतिनिधी : कामगार संघटना एकेकाळी मोठी शक्ती होती, आपल्या हक्कांसाठी ‘चक्का जाम’चा नारा दिला तर बंद होत होता. आता ती परिस्थिती राहिलेली नाही. अनेक उद्योग बंद पडत आहे. जे आहेत त्यात आऊटसोर्सिंग व कंत्राटी पद्धतीने कामगार भरती केली जाते, यातून शोषणाचे प्रमाण वाढत आहे. हे शोषण फक्त शहरात होत नाही तर ते गावखेड्यापर्यंत पोहचले आहे. ही शोषणावर आधारीत व्यवस्था संपवण्याची गरज आहे, त्यासाठी भविष्यातील संकटे ओळखून संघटीत लढा द्या, असे आवाहन महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले.(Workers Meet)
राष्ट्रीय मजदूर काँग्रेसच्या राज्यस्तरीय संमेलन गुरुवारी मुंबईत झाले. यावेळी ते बोलत होते.
ते म्हणाले की, आधी उद्योगपती होते आता व्यापारी झाले आहेत. ते फक्त नफ्यासाठी काम करत आहेत. त्यांना कामगारांच्या कल्याणाशी काहीही देणेघणे नाही. मोदी सरकारच्या कामगारविरोधी धोरणांमुळे देशात श्रीमंत अधिक श्रीमंत तर गरिब अधिक गरिब होत चालला आहे. देशाच्या पंतप्रधानांना गरिबांची चिंता नाही, “श्रीमंतांनी श्रीमंत होणे पाप आहे का?” असे पंतप्रधान म्हणतात ही अत्यंत गंभीर आणि चिंताजनक आहे. पंतप्रधानांना गरिबांच्या हिताचे काहीही पडलेले नाही. गरिब, कष्टकरी, कामगार यांच्या विरोधातील हे सरकार आहे. (Workers Meet)
सपकाळ म्हणाले, ‘मोदी सरकारचा कारभार म्हणजे ‘दाल में कुछ काला’ नाही तर अख्खी डाळच काळी आहे, त्यांची नियत खोटी आहे आणि नीती तर नाहीच, अशा शक्तीविरोधात लढायचे आहे.’
हेही वाचा :
भाजपने हिंदुत्व सोडले का?
तमिळनाडू सरकारचा वक्फ विधेयकाविरोधात ठराव
चेन्नई : तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी गुरुवारी (२७ मार्च) राज्य विधानसभेत केंद्र सरकारने मांडलेल्या वक्फ सुधारणा विधेयकाविरुद्ध ठराव मांडला. भाजप आमदार वनथी श्रीनिवासन यांनी विरोध केलेला हा ठराव राज्य विधानसभेत मंजूर झाला. (Waqf Amendment Act)
विधानसभेला संबोधित करताना मुख्यमंत्री स्टॅलिन म्हणाले, “केंद्र सरकार वक्फ विधेयकात सुधारणा करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे वक्फ बोर्डाच्या अधिकारांना मर्यादा येणार आहेत. मुस्लिमांच्या भावनांना यामुळे ठेच पोहोचवली जात आहे. केंद्र सरकारला मात्र त्याची पर्वा नाही.”
ते म्हणाले, “केंद्र सरकार राज्यांच्या हक्कांच्या, संस्कृतीच्या आणि परंपरांच्या विरोधात असलेल्या योजना आणत आहे. भारतात विविध संस्कृती, परंपरा आणि भाषा अस्तित्वात आहेत, परंतु ते राज्यांवर सूड घेण्याच्या उद्देशाने केंद्र सरकार वागत आहे. वक्फ दुरुस्ती विधेयक मुस्लिमांच्या विरोधात आहे. त्यामुळेच या विधेयकाविरोधात ठराव मांडला आहे. हे वक्फ दुरुस्ती विधेयक मुस्लिमांचे हक्क संपवत आहे. केंद्र सरकारने कधीही मुस्लिमांच्या कल्याणाचा आणि त्यांच्या हक्कांचा विचार केला नाही. म्हणून आम्ही त्याविरुद्ध ठराव मंजूर करत आहोत.” (Waqf Amendment Act)
“केंद्राच्या वक्फ विधेयक दुरुस्तीमध्ये म्हटले आहे की राज्य वक्फमध्ये दोन बिगर मुस्लिमांना सहभागी करून घेतले पाहिजे. मुस्लिमांना भीती आहे की वक्फ मालमत्ता हडप करण्याचा हा डाव आहे. हे धार्मिक स्वातंत्र्याच्या विरोधात आहे. ते मुस्लिमांच्या भावना दुखावत आहेत. केंद्र सरकारला याची पर्वा नाही. त्यामुळे मुस्लिमांच्या हक्कांवर गदा येणार आहे. जेएसीमधील द्रमुक सदस्य ए राजा आणि एमएम अब्दुल्ला यांनी त्याविरुद्ध आवाज उठवला आहे. द्रमुकसह अनेक पक्षांनी त्याला विरोध केला आहे. वक्फ विधेयक संसदेत कधीही मांडले जाऊ शकते. आपल्याला आपला विरोध दर्शवावा लागेल. ही दुरुस्ती भविष्यात वक्फ बोर्डावर अंकुश आणेल म्हणून मी हा ठराव मांडला आहे, ” असे स्टॅलिन यांनी स्पष्ट केले. (Waqf Amendment Act)
ठराव काय आहे?
वक्फ दुरुस्ती विधेयकाविरुद्ध तामिळनाडू विधानसभेने मंजूर केलेल्या ठरावात म्हटले आहे, ‘‘भारतात लोक धार्मिक सौहार्दाने राहतात. संविधानाने सर्व लोकांना त्यांच्या धर्माचे पालन करण्याचा अधिकार दिला आहे. निवडून आलेल्या सरकारांना त्याचे रक्षण करण्याचा अधिकार आहे. विधानसभा एकमताने आग्रह धरते की केंद्र सरकारने वक्फ कायदा १९९५ साठी २०२४ मध्ये सादर केलेला वक्फ दुरुस्ती विधेयक मागे घ्यावा.”
हेही वाचा :
मुंबई : प्रतिनिधी : बुलडोझर घेऊन घरावर चाल करणाऱ्यांच्या घरी टोपी घालून ‘सौगात-ए-मोदी’ या उपक्रमातून भाजप घरोघरी जाऊन भेटवस्तू देणार आहे. शिवसेनेने हिंदुत्व सोडले म्हणून टीका करणाऱ्या भाजपने आता हिंदुत्व सोडल्याचे जाहीर करावे, अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली.(Uddhav slams BJP)
भारतीय जनता पक्षाच्यावतीने रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर देशभरातील ३२ लाख मुस्लिमांना ‘सौगात-ए-मोदी’ या उपक्रमाद्वारे भेटवस्तूचे वाटप करणार आहे. भाजपच्या या उपक्रमाचे ठाकरे यांनी स्वागत केले आहे. त्याचवेळी बिहार, उत्तर प्रदेश राज्याच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजप ‘सौगात-ए-सत्ते’साठी ‘सौगात-ए-मोदी’ या उपक्रमाचे आयोजन केले आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. (Uddhav slams BJP)
लोकसभा निवडणुकीत ‘एक है तो सेफ है’, ‘बटेंगे तो कटेंगे’, ‘हिंदू महिलांच्या मंगळसूत्राचे रक्षण’ करण्यासाठी भाजपने मते मागितली. देशभर हिंदू-मुस्लिम अशी विभागणी करुन धार्मिक विष पेरले. एकीकडे विष पेरून दुसरीकडे अन्न दिले जात आहे. हे सर्व सत्तेसाठी चालले आहे, याकडेही ठाकरे यांनी लक्ष वेधले.
होळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर मुस्लिमांविरोधात शिमगा करायचा आणि आता त्यांना पोळी द्यायची. मुस्लिमांच्या घरावर बुलडोझर चालवण्यात आले. त्यांची घरे पेटवली जातील अशी स्फोटके विधाने केली. आता टोपी घालून ‘सौगात ए मोदी’चे वाटप करत आहेत, अशी टीकाही ठाकरे यांनी केली. (Uddhav slams BJP)
शिवसेनेने हिंदुत्व सोडले अशी टीका भाजपकडून केली जात आहे. आता टोप्या घालून मुस्लिमांच्या घरी ‘सौगात-ए-मोदी’मधून भेटवस्तूंचे वाटप करणाऱ्यांनी हिंदुत्व सोडल्याचे जाहीर करावे असेही ठाकरे म्हणाले.
विरोधी पक्ष हे संवैधानिक पद
एकीकडे विधानसभेत संविधानावर विशेष चर्चा केली जात आहे, दुसरीकडे सहा महिने विधानसभेतील विरोधी पक्षपद रिक्त आहे. हे पद रिक्त ठेवता येत नाही याकडे ठाकरे यांनी लक्ष वेधले. संख्याबळ हा विरोधी पक्षपदासाठी निकष नाही हे स्पष्ट झाले आहे. संख्याबळ हा निकष असेल तर ते लिहून द्यावे, अशी मागणीही ठाकरे यांनी केली.
राष्ट्रपुरुषांच्या बदनामीबद्दल गप्प का ?
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज या राष्ट्रपुरुषांबद्दल कोरटकर, सोलापूरकर, कोश्यारी वादग्रस्त वक्तव्ये करतात तेव्हा हे गप्प असतात. सरकारही चोर-पोलिस असा खेळ करत कारवाई टाळण्याचा प्रयत्न करते. जे गद्दार आहेत त्यांच्यावर टीका झाली की तोडफोड होते. राष्ट्रपुरुषांच्या बदनामीच्यावेळी महायुतीतील भाजप, शिंदे गट गप्प का राहतात, असा सवालही उद्धव ठाकरे यांनी केला. (Uddhav slams BJP)
अरबी समुद्रातील स्मारकावर पाणी सोडले का?
औरंगजेबाची कबर, वाघ्या कुत्र्याच्या समाधीवर जोरात चर्चा होते. वाघ्या कुत्र्याच्या समाधीवर निर्णय घेण्यासाठी सरकारने इतिहास संशोधक अभ्यासकांची मते विचारुन घेऊन निर्णय घ्यावा, पण अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. त्यावेळी मीही उपस्थित होतो, पण या स्मारकांबाबत कोणीच विचारत नाही. त्यांनी स्मारकावर पाणी सोडले का, शिवछत्रपतींच्या स्मारकाबाबत स्मरणपत्र पाठवण्याची वेळ आली आहे का असा प्रश्नही त्यांनी केला.
शिवसेनेने हिंदुत्व सोडले अशी टीका भाजपकडून केली जात आहे. आता टोप्या घालून मुस्लिमांच्या घरी ‘सौगात-ए-मोदी’मधून भेटवस्तूंचे वाटप करणाऱ्यांनी हिंदुत्व सोडल्याचे जाहीर करावे.
उद्धव ठाकरे, शिवसेना पक्ष प्रमुख
- उद्धव यांचा भाजपवर भडीमार…
- मुस्लिमांच्या घरावर बुलडोझर चालवण्यात आले, आता ‘सत्तेसाठी सौगात’
- औरंगजेबाची कबर, वाघ्या कुत्र्याची चर्चा करता शिवस्मारकाच्या कामाची चर्चा का नाही?
- कोरटकर, सोलापूरकर, कोश्यारी आदींच्या वादग्रस्त वक्तव्यावर गप्प का?
हेही वाचा :
Congress meet Governor: मुख्यमंत्री, मंत्र्यांची वर्तणूक संविधानविरोधी
मुंबई : विशेष प्रतिनिधी : राज्यात कायदा सुव्यवस्था राखणे, शांतता स्थापित करणे, त्याचबरोबर जनतेमध्ये सौहार्दाचे वातावरण राहील हे पाहण्याची संवैधानिक जबाबदारी राज्य सरकारवर असते, परंतु दुर्दैवाने महायुती सरकार जाणिवपूर्वक धार्मिक तेढ निर्माण करण्याकरिता धर्मांधतेचे विष पसरवत आहे. त्यामुळे राज्य सरकार तत्काळ बरखास्त करावे, अशी मागणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे बुधवारी (२६ मार्च) केली.(Congress meet Governor)
भाजप परिवारातील संस्था औरंगजेबाच्या कबरीविरोधात आंदोलन करतात. मंत्री व मुख्यमंत्री वक्तव्ये करतात. राज्यातील आजची परिस्थिती पाहता राज्य सरकार कायदा सुव्यवस्था राखण्यात पूर्णपणे अपयशी ठरले असून त्यांची वर्तणूक संविधानविरोधी आहे, असा आरोपही यावेळी करण्यात आला.
प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या शिष्टमंडळाने राजभवनात जाऊन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेतली. नागपूर हिंसाचारासह राज्यातील कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावर सविस्तर निवेदन दिले. (Congress meet Governor)
शिष्टमंडळात विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी प्रांताध्यक्ष माणिकराव ठाकरे, आ. डॉ. नितीन राऊत, आ. अमिन पटेल, आ. भाई जगताप, आ. विकास ठाकरे, आ. राजेश राठोड, आ. संजय मेश्राम, आ. बाळासाहेब मांगुळकर, माजी खासदार हुसेन दलवाई, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, प्रदेश सरचिटणीस राजेश शर्मा, प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत आदींचा समावेश होता. (Congress meet Governor)
भेटीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ म्हणाले की, मत्स्यपालन व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी राजकीय फायद्यासाठी दोन धर्मात तेढ निर्माण व्हावे या उद्देशाने सातत्याने वादग्रस्त विधाने केली आहेत. तरीही मुख्यमंत्र्यांनी त्यांना पाठीशी घालण्याचे काम केले आहे. याचाच अर्थ राज्यातले सामाजिक सौहार्द आणि शांतता बिघडावी हे राज्य सरकारचे धोरण आहे. औरंगजेबाची कबर ही केंद्र सरकारच्या पुरातत्व विभागाने संरक्षित केलेली वास्तू आहे. अशा केंद्र सरकार संरक्षित वास्तूचे संरक्षण करण्याची राज्य सरकारचीही तितकीच जबाबदारी आहे, असे असतानाही भाजपची मातृसंस्था असणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलसारख्या संस्था औरंगजेबाच्या कबरीविरोधात आंदोलन करतात. राज्याचे मुख्यमंत्री आणि नितेश राणेंसारख्या मंत्र्यांना संविधानाच्या आधारे मंत्रीपदाची शपथ दिलेली आहे. राज्य संविधानाच्या आधारे चालावे याची संविधानाचे संरक्षक म्हणून आपली जबाबदारी आहे. त्यामुळे आपण राणेंसारख्या मंत्र्यांची तात्काळ हकालपट्टी कराल, अशी अपेक्षा होती. (Congress meet Governor)
नागपूर शहरात रामनवमी व ताजुद्दीन बाबा उरुसामध्ये दोन्ही धर्माचे लोक उत्साहाने सहभागी होतात. नागपूर शहराने आजपर्यंत सामाजिक सौहार्द टिकवण्याचे काम करुन एक आदर्श घालून दिला आहे, याच नागपूर शहरात धार्मिक मुद्द्यावर हिंसाचाराची घटना घडावी हे अत्यंत चिंताजनक व निषेधार्ह आहे. नागपूर शहरात हिंसाचार का उसळला, त्याची माहिती घेण्यासाठी तसेच शहरात शांतता प्रस्थापित व्हावी, या हेतूने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सत्यशोधन समितीने नागपूरला भेट दिली, पण पोलीसांनी या समितीला दंगलग्रस्त भागात जाण्यास परवानगी नाकारली. काँग्रेसच्या समितीने सामाजिक संस्था व स्थानिक नागरिक यांच्याशी संवाद साधून या दंगलीची माहिती जाणून घेतली, त्याची माहितीही राज्यपाल महोदयांना दिली, असेही सपकाळ यांनी सांगितले.
हेही वाचा :
जयकुमार गोरे प्रकरणाची ए टू झेड स्टोरी
सुपारी घेऊन कुणाल कामराचे काम
नवी दिल्ली : संसदेत मला बोलूच दिले जात नाही. सभागृहात हा काय प्रकार सुरू आहे ते समज नाही, असा संताप लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी (२६ मार्च) केला. तसेच खा. राहुल गांधी यांनी अध्यक्ष ओम बिर्ला संसदेत बोलण्याची संधी नाकारत असल्याचा गंभीर आरोप केला.(Rahul alleges Birla)
लोकसभेचे कामकाज लोकशाही प्रणालीच्या विरूद्ध चालवले जात आहे. सभागृहात महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करण्याची विनंती वारंवार करूनही अध्यक्ष त्यांकडे दुर्लक्ष करतात, याकडे राहुल गांधी यांनी लक्ष वेधले.
‘मला माहित नाही काय चाललंय… मी त्यांना (सभापतींना) बोलू देण्याची विनंती केली, पण ते पळून गेले. मला बोलू दिले नाही. सभागृह चालवण्याचा हा मार्ग नव्हे,’ असे गांधी संसदेबाहेर पत्रकारांशी बोलताना म्हणाले. (Rahul alleges Birla)
आगामी महाकुंभमेळा आणि बेरोजगारीच्या वाढत्या मुद्द्यावर बोलण्याचा मी प्रयत्न करत होतो, पण मला वारंवार रोखण्यात आले. जेव्हा जेव्हा मी उभा राहतो तेव्हा मला बोलण्यापासून रोखले जाते. येथे लोकशाहीला स्थान नाही.
खा. राहुल गांधी, लोकसभेतील विरोधी पक्ष नेते
सभागृहाची प्रतिष्ठा राखा : बिर्ला
लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सदस्यांनी सभागृहाची प्रतिष्ठा राखणे अपेक्षित आहे. सदस्यांनी कार्यपद्धतीच्या नियमांचे पालन केले पाहिजे, असे त्यांना सांगितले. त्यावर सभापतींनी असे निरीक्षण का नोंदवले, ते स्पष्ट झालेले नाही. सदस्यांनी सभागृहाचा उच्च दर्जा आणि प्रतिष्ठा कायम राहील, अशा पद्धतीने वागावे अशी अपेक्षा आहे, असे बिर्ला म्हणाले. (Rahul alleges Birla)
“माझ्या निदर्शनास अशी अनेक उदाहरणे आली आहेत जिथे सदस्यांचे वर्तन सभागृहाच्या उच्च दर्जाला अनुरूप नाही,” असे सभापती म्हणाले.
“या सभागृहात वडील आणि मुलगी, आई आणि मुलगी, पती आणि पत्नी सदस्य राहिले आहेत. या संदर्भात, विरोधी पक्षनेत्याने नियम ३४९ नुसार वागावे अशी माझी अपेक्षा आहे, विशेषतः, विरोधी पक्षनेत्याने नियमांनुसार वागणे अपेक्षित आहे,” असे सभापती म्हणाले.
राहुल गांधी म्हणाले की, सभापतींनी त्यांच्यावर टीका केली आणि नंतर त्यांना बोलण्याची संधी न देता सभागृह तहकूब केले. त्यांनी सांगितले की, गेल्या आठवड्यातही त्यांना बोलण्याची परवानगी देण्यात आली नव्हती.
काँग्रेस नेत्यांची अध्यक्षांशी चर्चा
दरम्यान, लोकसभेचे उपनेते गौरव गोगोई, काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल आणि लोकसभेतील पक्षाचे व्हीप माणिकम टागोर यांच्यासह सुमारे ७० काँग्रेस खासदारांनी लोकसभा अध्यक्षांची भेट घेतली. यावेळी त्यांनी खासदार राहुल गांधी यांना सभागृहात बोलण्याची संधी नाकारल्याचा मुद्दा उपस्थित केला, असे पक्षाच्या सूत्रांनी सांगितले.
हेही वाचा :
प्रशांत पवार, सातारा
जयकुमार गोरे, तुषार खरात आणि ती महिला या प्रकरणावर लोक सत्य समजून आहेत. सोशल मीडियावर कमेंट वाचल्या की लक्षात येत आहे. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत जे निवेदन केले, त्यामुळे लिहिणे भाग आहे. फडणवीस यांनी गोरे यांचा गौरव हिंमतबहाद्दर असा केल्याने हे संकीर्तन अपरिहार्य आहे. (Jaykumar Gore Controversy)
सातारा जिल्ह्याचा राजकीय इतिहास महाराष्ट्र राज्याने अनुकरण करावा असा आहे. मराठेशाहीत दोन गाद्या निर्माण झाल्यानंतर सातारच्या थोरल्या गादीच्या इतिहासापासून, स्वातंत्र्यांची चळवळ आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतरची पुढची पन्नास वर्षे अशा कालखंडात अनेक व्यक्ती आणि घटना गौरवाने उल्लेख कराव्या अशा आहेत. चांगला मगदूर, चांगले बेणं असेल तर पीकही चांगले उगवते अशी ही भूमी आहे. पण जमीन मालकाचे (समाज) दुर्लक्ष झाले की पीक कमी आणि तणच कसे माजते, याचे वर्तमानकाळ हा नमुना आहे.
तर विषय जयकुमार गोरे यांचा आहे. त्यांच्या नागड्या फोटोंचा, पत्रकार तुषार खरात यांच्या अटकेचा, तुषार खरात यांनी पुनश्च सादर केलेल्या एका महिलेच्या विनयभंगाचा, त्याच महिलेने कथित खंडणी मागितल्याचा, तिला झालेल्या अटकेचा. (Jaykumar Gore Controversy)
जयकुमार गोरे कोण?
तर अगोदर जयकुमार गोरे कोण हे पाहू. माण तालुक्यातील बोराटवाडी गावचे हे व्यक्तिमत्त्व. हे तिघे भाऊ. १९९० नंतर जे आर्थिक आणि विकासविषयक धोरण आले, त्यातून कंत्राटदार नावाची जमात बेसुमार वाढली. हे त्यापैकीच. सांगली ही त्यांची उमेदीच्या काळातील कर्मभूमी होती. जकातीचे ठेके यात त्यांचा सहभाग होता. सांगलीच्या राजकारणातील काँग्रेस नेत्यांकडे यांचा राबता असायचा. १९९० च्या दशकाच्या अखेरीस केंद्र सरकारने चार महानगरे जोडणारी सुवर्णचतुष्कोन या महामार्गाची योजना प्रत्यक्षात सुरु केली. त्यात सातारा शहराच्या जवळून जाणारा महामार्गाचा पट्टा स्कॅन्स्का नावाच्या कंपनीने कंत्राटात घेतला.
गोरे बंधू त्या कंपनीचे पोटकंत्राटदार, पुरवठादार. सातारच्या पोवई नाक्यावर मरीआई कॉम्प्लेक्समध्ये गोरे बंधूंनी त्यांचे ऑफिस सुरु केले. त्यामुळे त्यांचा पस्तीस वर्षांचा कालखंड डोळ्यासमोरुन तरळत आहे. स्कॅन्स्काचा तो ठेका, त्या ठेक्यातील हे पोटकंत्राटदार आणि त्या सर्वांनी मिळून केलेला इतिहास लिहायचा तर तो थेट स्वर्गात बसलेल्या चित्रगुप्ताच्या वेबसाईटची लिंक मिळाली तर तिथे पोस्ट करावा लागेल असा हा विषय आहे. असो. (Jaykumar Gore Controversy)
काँग्रेसच्या माध्यमातून उत्कर्ष
कंत्राटदार धष्टपुष्ट झाला की त्याच्या चरबी संवर्धनासाठी राजकीय पक्षाचा, राजकारणात सक्रीय व्हायचा परिपाठ बनतो. तसेच इथेही झाले. जयकुमार गोरे यांचे थोरले बंधू माण तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले. तेव्हा डोक्याची केसं पांढरी झाली तर नव्हे, ती काळी करुन झडली तरी युवक काँग्रेसच्या पदावर राहता यायचे. तेव्हा नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसची निर्मिती झालेली. त्यामुळे राहिलेल्या लोकांसाठी काँग्रेसचे रान मोकळे होते. तसेच माण तालुक्याचे मोकळे रान गोरे बंधूंसाठी मिळाले. १९९९ ते २०१४ या काळात काँग्रेसचा राज्यातल्या सत्तेत निम्मा वाटा. त्यामुळे गोरे बंधू त्यांना असणार्या जागेत निम्म्यात बरेच व्यापले. (Jaykumar Gore Controversy)
२००९ साली माण विधानसभा मतदारसंघ सर्वसाधारण म्हणजे खुला झाला. तत्पूर्वीच जयकुमार गोरे काँग्रेसच्या पाठिंब्याने जिल्हा परिषद सदस्य झाले. जिल्हा बँकेचे संचालक झाले. २००९ साली ते अपक्ष आमदार झाले. तेव्हापासून अशाच पोलीस केस व्हायच्या. अर्थात गोरे यांच्यावर. मग त्यांना एकतर अटकपूर्व जामीन मिळायचा किंवा अटक होऊन जामीन मिळायचा. मग माणमध्ये मिरवणूक निघायची. आता तुषार खरात, ती पीडित महिला आणि अनिल सुभेदार यांना अटक झाल्यानंतर दिवाळीच साजरी व्हायला हवी होती. पण तसे काही दिसले नाही.
तुषार खरात तेव्हा वाघ होता…
आता जरा वादग्रस्त फोटोच्या प्रकरणाकडे वळू. पण तुषार खरात या यू ट्युबवरच्या अटकेला वळसा घालून. तुषार खरात हा माण तालुक्यातील पांढरवाडी गावच्या खरातवस्ती येथील. तो २००९ साली जयकुमार यांचा मतदार होता. २०१४ च्या निवडणुकीत खरात यांचा जयकुमार गोरे यांचे मधले बंधू शेखर गोरे यांच्याबरोबर वाद झाला. तेव्हा जयकुमार गोरे यांनी खरात यांची बाजू घेतली. ‘तू वाघ आहेस,’ असे प्रमाणपत्र जयकुमार गोरे यांनी तुषारला दिलेले. तुषार मुंबई परिसरात कार्यरत होता. पण त्याची नाळ गावाशी जोडली गेली होती. पाणी फौंडेशन, जलयुक्त शिवारच्या माध्यमातून काही कामे करण्यात त्याचा सहभाग होता. कोणताही पत्रकार स्वतःला प्रसिद्धी देण्यापुरता गोड असतो. त्याने स्थानिक घडामोडींमध्ये सहभाग घेतला की मग अडचण होते. बहुतेक पुढार्यांचा हाच प्रॉब्लेम असतो. (Jaykumar Gore Controversy)
निर्भय, शिकलेला, निर्व्यसनी, आधार असलेल्या समाजातील, चारित्र्यवान माणूस पुढार्यांचा शत्रू असतो. हे पाचही गुण एकत्र असणारा माणूस तर घोर शत्रू. खरात त्यांच्या गावात, परिसरात, विकासकामांत सहभाग घ्यायला लागल्यावर ते गोरे यांना खटकू लागले. त्यातून त्या दोघांचे कधी-मधी तू-तू, मैं-मैं होऊ लागले. दरम्यानच्या काळात तुषार पत्रकारितेच्या मुख्य प्रवाहातून बाहेर पडला. स्वतःचे डिजिटल पोर्टल आणि यू ट्युब चॅनेल त्याने सुरु केले. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्याने माण – खटाव मतदारसंघात तळ ठोकून गोरे यांच्या संदर्भात बातम्या, मुलाखती सादर केल्या. ती संख्या पुढे ८५ झाली म्हणे. झाले विधानसभेच्या निवडणुकाचा निकाल लागला. लाडक्या बहिणी पावल्या आणि त्यानंतर जयकुमार गोरे यांच्या भाषेतील एक ‘माता भगिनी’ उगवली.
गोरे आणि संबंधित महिलेचा संपर्क
सदर लेखाचा थोडा विस्तार आवश्यक आहे. संबंधित महिलेने मुलाखतीत दिलेल्या माहितीनुसार ही कहानी २०१४ पासून सुरु होते. गोरे दुसर्यांदा आमदार झाले. त्यावेळी ती महिला एका दैनिकाच्या वर्धापन दिनात त्यांना भेटली. ती महिला कौशल्य विकास कार्यक्रमानुसार युवक – युवतींना प्रशिक्षण देण्याचे काम करत होती. ती गोरेंना म्हणाली, तुमच्या मतदारसंघात मला हे काम करायचे आहे. गोरे म्हणाले, तुम्ही माझ्या बोराटवाडी येथील ऑफिसला या. ती महिला तिकडे गेली. तिने योजना समजावू सांगितली. गोरेंनी त्या महिलेला फारसा प्रतिसाद दिला नाही. पण जाताना त्या महिलेचा फोन नंबर घेतला. मग फोनाफोनी सुरु झाली. तुम्ही व्हाटसऍप का वापरत नाही?, ह्यापासून सुरु झालेला संवाद. त्या महिलेला व्हाटसऍप सुरु करायला लावून तिला वेगवेगळ्या फोन नंबरवरुन किरीट सोमय्या स्टाईल फोटो पाठवण्यापासून गुन्हा दाखल होऊन, अटकपूर्व जामीन फेटाळून अटक होईपर्यंत प्रकरण पुढे गेले. (Jaykumar Gore Controversy)
जामीन मिळाला. मग प्रथेप्रमाणे गोरे यांचे दहिवडीला भाषण. हे विरोधकांचे कटकारस्थान इथपासून त्या तक्रारदार माता – भगिनीच्या जिवाला काही बरेवाईट होऊ नये इथपर्यंतची काळजी ते वदले. केवढे हे सद्वचन. अहाहा काय हे स्त्री दाक्षिण्य. गोरे त्या फिर्यादीला माता-भगिनी म्हणतात. जणू यांचा तिच्याशी काहीच संबंध नाही. त्यांनी तिला फोटो पाठविलेच नाहीत. पुढे या प्रकरणात केस न्यायालयात उभी राहिली. त्या महिलेने पूर्वी फिर्याद देण्यापूर्वी शपथेवर जबाब दिला होता. डिजिटल पुरावेसुद्धा सक्षम होते. मग गोरेंनी काय केले? शिक्षा होण्याची शक्यता जास्त. मग त्या महिलेचा नात्याने भाऊ असणारा कोणीतरी गाठला. त्याच्यामार्फत त्या महिलेला तक्रार, जबानी यांच्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न सुरु होता. उभयपक्षी तडजोड झाली. गोरे यांनी न्यायालयात या प्रकरणात लेखी आणि हात जोडून माफी मागितली प्रकरण मिटले. निर्दोष मुक्तता झाली हे सब झूठ.
फोटोंचे प्रकरण पुन्हा चव्हाट्यावर
पुढे चार – पाच वर्षे या प्रकरणात काहीच घडल नाही. गेल्या दोन – चार महिन्यात त्या महिलेच्या नावे काही मेसेज आणि पत्रे इकडे तिकडे फिरु लागली. ही पत्रे आपली नाहीत म्हणून त्या महिलेने पोलिसांना तसा जबाबही दिला. अगोदर सांगितले त्याप्रमाणे तुषार खरात यांची गोरे यांच्याबद्दलची आघाडी जोरात होतीच. त्या महिलेचा आणि तुषार खरात यांचा संपर्क झाला. तिने फोनवरुन खरात यांना इंटरव्ह्यू दिला. एकदा हा इंटरव्ह्यू व्हायरल होताच इतर माध्यमांनीही हे प्रकरण उचलून धरले. आतापर्यंत जे गोरे तुषार खरात यांच्याकडे दुर्लक्ष करत होते आणि त्या महिलेने केलेल्या केसमध्ये आपण निर्दोष मुक्त असल्याची समजूत करुन घेत होते, ते गोरे मुळापासून हादरले. कारण हे प्रकरण राज्यात आणि देशात चर्चेचा विषय झाले होते. मग गोरे यांनी विधिमंडळाच्या आवारात स्वतः तोंड उघडले. ते म्हणाले, ‘माझी बदनामी करणार्या संजय राऊत, रोहित पवार आणि तुषार खरात यांच्याविरुद्ध अब्रुनुकसानीचा खटला दाखल करणार.’
विधीमंडळात तर यांची या तिघांविरुद्ध हक्कभंगाचा प्रस्ताव मांडला. त स्वीकारलाही गेला. त्यादिवशी तुषार खरात यांनी जयकुमार गोरे यांना विधिमंडळाच्या आवारात दोन प्रश्न विचारले. १) तुम्ही त्या महिलेची लेखी माफी मागितली होती का नव्हती ? २) तुम्ही त्या महिलेच्या मोबाईलवर नागडे फोटे पाठविले होते की नव्हते? (Jaykumar Gore Controversy)
टीव्हीवर लाईव्ह आण मोबाईलमधल्या यू ट्युबवर करोडो लोकांनी हे दोन प्रश्न ऐकले. शेकडो इंगळ्या एकाच वेळी डसाव्यात, असे हे प्रश्न होते. त्याची उत्तरे तेव्हा मिळाली नाहीत. उत्तर सोडा, त्यावरचा पुढचा उतारा आठवडाभरातच समोर आला.
तुषार खरातला अडकवण्याचे कारस्थान
फोटो आणि माफीनामा यासंबंधीचे प्रश्न ‘मारुती कांबळेचं काय झालं?’ या धाटणीचे होते. विधिमंडळाच्या आवारात काय घेऊन बसला, महाराष्ट्राच्या इतिहासात अनेक मंत्र्यांनी लफडी, कुलंगडी केली असतील. मंत्रीच काय घेऊन बसला, अनेक स्खलनशील लोकांनी पण अनेक डिजिटल भानगडी केल्या असतील, पण कुणी असे काही करणारास तुम्ही नागडे फोटो पाठविले का? असा तोंडावरचा प्रश्न प्रथमच. त्या किंवा तत्सम प्रश्नाची नसबंदी करायची तर हक्कभंग, अब्रुनुकसानीचा दावा हे मर्त्य माणसांनी करायचे उद्योग. मग पोलिसी आणि तीही फौजदारी. त्यातही पोलीस कोठडी मिळाली तरच अद्दल घडेल या मानसिकतेतून सापळे रचले गेले.
तुषार खरात हा काही ऐश्वर्यसंपन्न, श्रीमंत असा पत्रकार नव्हता. एका सामान्य घरातला मुलगा. काडी काडी जमा करुन त्याने मुंबईत आपला प्लॅटफॉर्म उभा केलेला. स्टाफचे पगार भागतील एवढे पण उत्पन्न नसते अशा उद्योगात. त्याच्याच समाजातला एक उपटसुंभ हेरला. आणि बोलक्या तुषारकडून आर्थिक विवंचना मिटेल असे होकार त्याच्या तोंडून वदवून घेतले गेले. ते रेकॉर्डिंग प्रमाण पुरावा मानून त्याच्यावर खंडणीची केस दाखल केली. अगदी असा पुरावा मिळाला नसता तरी कायद्याच्या भाषेत ‘हिअर से’ म्हणजे ‘तो मला असे म्हणाला होता,’ असा कुणाचा तरी जबाब घेऊन संजय राऊत, अरविंद केजरीवाल, संजय सिंह, अनिल देशमुख यांना कोणताही पुरावा नसताना जशी अटक केली, तशीच तुषार खरातला काहीही करुन अटक करण्यात आली असती.
तुषारची बाजू घेण्यात अडचण असणार्या तमाम लोकांना एवढे सांगायचे आहे की, त्याने जी कथित खंडणी मागितली ती कुणाकडे जाऊन नाही तर त्याच्याकडे जाऊन त्याला खंडणी मागायला प्रवृत्त केले आहे. किंवा तशी परिस्थिती निर्माण केली. तुषार तिथे चुकलाच म्हणून त्याला अडकविणारे राजा हरिश्चंद्राचे वारस ठरत नाहीत. झाले, तुषार एकदाचा आत गेला, पण अजूनही त्या पीडित महिलेच्या महिलेच्या बुरखाधारी वाणीची टांगती तलवार होतीच. (Jaykumar Gore Controversy)
वकिलाला फोडून महिलेला अडकवले
त्या पीडित महिलेने दि. १७ मार्च रोजी मुंबईत राजभवनासमोर मंत्री जयकुमार गोरे यांच्याविरुद्ध आंदोलन करण्याचा इशारा दिलेला. त्यापूर्वीच या आंदोलनकर्ती महिलेचा बंदोबस्त करणे आवश्यक होते. ज्याप्रमाणे तुषार खरात याला सापळा रचून सापळ्यात अडकेल अशी व्यवस्था करवून अटक केली. तशी सेम मोडस आपरेंडी त्या पीडित महिलेच्या बाबतीत वापरली गेली. त्यासाठी वाईतले एक चवचाल, बाटगे पात्र पुढे आले. त्याने त्या महिलेच्या वकिलाला गाठले. तो वकील महिलेपर्यंत पोहोचला.
हा खंडणीचाच सापळा होता. पण खंडणी झाली कायदेशीर शब्द. त्या महिलेला ‘भाऊ नुकसानभरपाई देऊ करताहेत,’ असा बनाव केला. ही नुकसानभरपाई खंडणीच्या केसमध्ये रुपांतरित होणार आहे, हे त्या पीडित महिलेच्या वकिलाला माहित होते. पण त्याचा वाटा ठरलेला होता. (तो ठरला तेवढा दिला की माहीत नाही.) त्यामुळे त्या वकिलाने दलाल हा शब्द सार्थ ठरवत मोहीम फत्ते केली. त्या महिलेला खंडणीची रक्कम घेताना अटक केली. त्याच वेळी पोलीस खंडणीच्या रकमेचे दहा बंडल मोजत असल्याचा आणि त्या नोटांपलीकडे ती महिला अत्यंत स्तब्ध, निश्चलपणे बसून असल्याचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला.
फिर्यादीच झाले आरोपी
अशी अनेक प्रकरणे आहेत की, तिथे फिर्यादीच आरोपी झाले आहेत. साक्षीदार तुरुंगात आहेत. पत्रकारांना अटक होत आहे. उदाहरण घ्यायचे झाले तर गुजरातमध्ये संजीव भट, नागपुरात सतीश उईके. तुषार खरात आणि त्या पीडित महिलेची अटकही त्याच मालिकेत गणली जाऊ शकते. फक्त त्याची श्रेणी वेगळी असेल. भट आणि उईके यांच्या तुलनेत तुषार खरात आणि ती पीडित महिला तशी नशीबवान म्हणायला हवीत. कारण त्यांना आज ना उद्या जामीन मिळेल. आज पडलेल्या अनेक मुद्यांची, शंकांची उकल त्यावेळी होईल. पण जयकुमार गोरे आणि गुन्हे दाखल करण्याचा सापळा रचणार्या बाजारबुणग्या टोळीसाठी काही प्रश्न आजही लोक विचारत आहेत. त्याची उत्तरे त्यांच्याकडे नाहीत. पण हे प्रश्न घेऊन समाजमन जागृत आहे.
काही मूलभूत प्रश्न (Jaykumar Gore Controversy)
१) पाच महिन्यापूर्वी तुषार खरात याच्याकडून ऍट्रासिटी, मारहाण झाली. तेव्हाच तक्रार दाखल होऊन अटक का नाही झाली ?
२) या प्रकरणात बदनामी एकाची झाली. ती दुसर्याने केली मग तिसरा खंडणी कशी काय देतो आणि चौथा कथित बदनामी करणार्यास कसा अडकवतो, हा काय बरे प्रकार आहे?
३) जो कोणी तिसरा (संबंधित महिलेचा वकील) खंडणीची मागणी पुढे पोहोचवतो, ज्याची बदनामी झाली त्याच्याकडे खंडणी मागतो आणि तो आरोपीच होत नाही, हा काय प्रकार आहे ?
फडणवीस यांचे निवेदन
या विषयावर लिहिलेच पाहिजे असे काही नाही. पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जेव्हा विधिमंडळाच्या पटलावरून गोरे प्रकरणात निवेदन करतात आणि त्यात जे मुद्दे मांडतात, वाक्यरचना सादर करतात, तेव्हा लिहिलेच पाहिजे असा हा प्रसंग आहे. फडणवीस म्हणतात, १) या प्रकरणात गोरे यांच्या बदनामीचा कट करण्यात आला आहे. २) त्यात शरद पवार गटाचे सुप्रिया सुळे, रोहित पवार, प्रभाकर देशमुख यांचा पण हात आहे. ३) त्या पीडित महिलेने २०१६ मध्ये केस केली, ती २०१९ ला संपली. ४) मी गोरे यांच्या हिंमतीला दाद देतो. (Jaykumar Gore Controversy)
फडणवीस यांनी आपल्या भाषणात मांडलेला पहिला मुद्दा घेऊ. २०१६ मध्ये केस झाली. पुराव्यासह ती कोर्टात उभी राहिली. मग तो आता झालेल्या बदनामीचा कट तोही आता कसा बरे होऊ शकतो?
त्यांचा दुसरा मुद्दा असा की, या बदनामीच्या कटात सुप्रिया सुळे, रोहित पवार, प्रभाकर देशमुख यांचा हात आहे. त्यासाठी ते फोन कॉल झाल्याचे आणि त्याचे रेकॉर्ड उपलब्ध असल्याचे सांगतात. कुणा पत्रकाराशी फोनवर बोलणे किंवा फोनवर चॅटिंग करणे कट असू शकतो का?
फडणवीस म्हणतात, त्या पीडित महिलेने दाखल केलेली केस २०१९ ला संपली. त्याबद्दल प्रश्न असे की, ती केस खरोखर सुनावणी घेऊन संपली का? गोरे म्हणतात तशी निर्दोष मुक्तता झाली का ? की तडजोड करुन संपविण्यात आली?
गोरे यांचा नागरी सत्कार करा, पण…
आता फडणवीस जे अत्यंत महत्त्वाचे उद्गार काढताहेत, त्याबद्दल बोलू. ते म्हणतात,’गोरे यांच्या हिंमतीला दाद देतो.’ द्या, द्या, दाद द्या, न्हाय तर नागरी सत्कार पण करा, पण तो करण्यापूर्वी जरा थोडे एक-दोन नमुने पाहू. मायणी येथील मेडिकल कॉलेजमध्ये कोरोना काळात मृत व्यक्तिंच्या नावे गोरे आणि त्यांच्या सहकार्यांनी अनुदान हडप केल्याची एक केस पेंडिंग आहे. तो पण हिंमतीने केलेला प्रकार आहे. याच कॉलेजच्या संस्थेत धर्मादाय आयुक्त कार्यालयात सादर करायला एक बनावट वर्तमानपत्र किंवा पेपर छापून एक जाहिरात/ प्रकटन सादर केल होते. त्याही प्रकरणात पोलीस केस झाली. प्रकरण अंगलट यायला लागल्यावर ज्याप्रमाणे तुषार खरात, पीडित महिला यांचे संभाषण रेकॉर्ड करण्यात आले, तसेच रेकॉर्डिंग करुन एक संपादक आणि त्या दैनिकाचा व्यवस्थापक याला अटक झाली. बनावट जाहिरात छापून, ती घेऊन कोर्टात सादर करणारे गोरे मोकळे आणि जिथे छापली ते अटकेत, असा झ्याक धंदा आहे. अशी ही हिंमत आहे.
…तर फडणवीस साहेब, तुम्ही ज्या हिंमतीला दाद देताय ना, ती रामशास्त्री प्रभुणे यांच्या न्यायालयात राघोबादादांनी गारद्यांना भले बहाद्दर म्हणावे, या सदरीची आहे.
त्या दोन प्रश्नांचे काय?
ज्याप्रमाणे फडणवीस यांच्या सदरेवर संजय राठोड ते अशोक चव्हाण अशा लोकांना क्लीन चीट मिळाल्या आहेत, तसेच हेही प्रकरण आहे. कुणी कितीही प्रयत्न केले तरी गोरे यांना राज्याचा नेता बनवायचा निर्धार केला आहे. गोरे यांनी मायणी प्रकरणाप्रमाणेच याही प्रकरणात फिर्यादीला आरोपी बनविले आहे. कुणाचीच सत्ता कधीच ताम्रपट घेऊन येत नाही. पेरलेले उगवतेच उगवते. कारण ते कसले तरी बीज असते. रावणाचे चौदा चौघड्यांचे राज्य कुच्च्या खाईत गेले. तो वाईट होता, पण अशोकवनात जाऊन भोंगळा झाला नव्हता. तो संदर्भ लक्षात घेतला तर गोरे किस खेत की मूली. काळासारखे उत्तम औषध नसते आणि तो काळ जे उत्तर देतो, ते सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट असते. याही प्रकरणाचा आणि एकूण गोरेंचा निवाडा यथावकाश होईल. तोपर्यंत मोबाईल स्क्रोल करणार्या लाखो लोकांच्या डोक्यात तुषार खरात यांनी विधिमंडळाच्या आवारात विचारलेले दोन प्रश्न आहेत. १) जयाभाऊ तुम्ही त्या महिलेच्या मोबाईलवर नागडे फोटे पाठविले होते की नव्हते आणि २) तुम्ही त्या महिलेची माफी मागितली होती का नव्हती ? (Jaykumar Gore Controversy)
आधुनिक युगाची सुरुवात होण्यापूर्वी जगभरात एक तर धर्माची सत्ता होती किंवा धर्माधिष्ठित राज्यसत्ता होती. लंडन धर्मप्रांताचे तेव्हाचे बिशप होते मैंडल क्रेयटन. त्यांना उद्देशून लॉर्ड एक्ट यांनी पत्र लिहिले. त्यातील पुढील ओळी जगभरात उध्दृत केल्या जातात. त्या ओळी अशा आहेत. ‘पॉवर टेन्डस् टू करप्ट अँड अपसुलेट पॉवर करप्टस् अपसुलेटली.’ अर्थात जी व्यक्ती सत्तेत असते तिला सत्ता भ्रष्ट बनविते आणि ज्याच्या हाती निरंकुश, पाशवी सत्ता असते ती त्या व्यक्तीला आकंठ भ्रष्ट करते. विषय त्याही पार पुढे गेलाय. सत्तेच्या शिलाजीत, व्हायग्रामुळे काही अवयव जरा मापाच्या बाहेर वळवळू लागतात, त्याचे हे उदाहरण आहे.
हेही वाचा :
असंवेदनशील, अमानवी
उच्च न्यायालयातील ७७ टक्के न्यायाधीश उच्च जातीचे