नवी दिल्ली : मुंबईवरील २६/ ११च्या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार तहव्वुर राणा याला भारतात आणल्यानंतर त्याला ‘एनआयए’ने अटक केली. (Rana extradited)
राणाचा ताबा मिळवण्यासाठी भारत सरकारने गेली अनेक वर्षे पाठपुरावा केला होता. त्याला नुकतेच यश मिळाले होते. अमेरिकेच्या न्यायालयाने राणाची याचिका फेटाळून लावली होती. त्यामुळे त्याचे भारताकडे प्रत्यार्पण करण्याचा मार्ग मोकळा झाला होता. भारत-अमेरिका प्रत्यार्पण करारांतर्गत सुरू केलेल्या कार्यवाहीच्या अनुषंगाने राणाला अमेरिकेत न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले होते. राणाने या कारवाईला स्थगिती देण्यासाठी सर्व कायदेशीर मार्गांचा वापर केल्यानंतर अखेर प्रत्यार्पण झाले, असे ‘एनआयए’ने म्हटले आहे. (Rana extradited)
कॅलिफोर्नियाच्या सेंट्रल डिस्ट्रिक्ट कोर्टाने १६ मे २०२३ रोजी त्याच्या प्रत्यार्पणाचे आदेश दिले होते. त्यानंतर राणाने नवव्या सर्किट कोर्ट ऑफ अपीलमध्ये अनेक खटले दाखल केले. ते सर्व फेटाळण्यात आले. त्यानंतर त्याने अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयातही याचिका आणि आपत्कालीन अर्ज दाखल केला होता. तोही फेटाळण्यात आला. भारताने अमेरिकन सरकारकडून वाँटेड दहशतवाद्यासाठी अखेर आत्मसमर्पण वॉरंट मिळवल्यानंतर दोन्ही देशांमधील प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू झाली. (Rana extradited)
यूएस स्काय मार्शल यांच्या मदतीने एनआयने इतर भारतीय गुप्तचर संस्था, एनएसजी, भारताचे परराष्ट्र मंत्रालय आणि गृह मंत्रालयाने संपूर्ण प्रत्यार्पण प्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. या सर्व यंत्रणांनी अमेरिकेतील इतर संबंधित अधिकाऱ्यांशी उत्तम समन्वय साधला.
खटल्यासाठी नरेंद्र मान यांची नियुक्ती
राणाच्या यशस्वी प्रत्यार्पणानंतर केंद्रीय गृह मंत्रालयाने या खटल्यासाठी ज्येष्ठ विधिज्ज्ञ नरेंद्र मान यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे. मंत्रालयाने रात्री उशिरा जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, केंद्र सरकार याद्वारे वकील नरेंद्र मान यांची दिल्लीतील एनआयए विशेष न्यायालये आणि अपीलीय न्यायालयांसमोर तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा या खटल्याची सुनावणी पूर्ण होईपर्यंत किंवा जे आधी होईल तोपर्यंत विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करत आहे. आरोपी तहव्वुर हुसेन राणाची बाजू दिल्ली विधि सेवा प्राधिकरणाचे वकील पीयूष सचदेवा मांडणार आहेत.
हेही वाचा :
मुंबई हल्ल्यातील पाकच्या सहभागाची गुपिते उघडणार