मुंबई : प्रतिनिधी : दंगलखोर कोणत्या जातीचा, पंथाचा, धर्माचा न पाहता राज्यातील कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी कारवाई झाली पाहिजे. तुमच्या विचाराचे सरकार आहे. मग भागवत, फडणवीस, शिंदे, अजितदादांनी कुदळ फावडे घेऊन कबर तोडण्यास जावे, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केली. (Sanjay raut on riot)
जनतेने या कारस्थानापासून सावध रहावे. व्हिलन संपवला की हिरो आपोआपच संपतो. हे कारस्थान कोण करतेय हे लक्षात घ्या आणि शांतता राखा, असे आवाहन राऊत यांनी केले.
नागपूरमध्ये सोमवारी झालेल्या दंगलीविषयी राऊत यांनी आपले मत व्यक्त करताना त्यांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली.
ते म्हणाले, महाराष्ट्र वेठीस धरणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. दंगली का पेटवल्या जात आहेत?, होळीतही वातावरण खराब केले गेले. राजापुरात असेच घडले, आता गुढीपाढव्यालाही असेच करतील. काल औरंगजेबाची ढाल करुन हिंदू-मुस्लिम दंगली घडवल्या गेलेया. सरकार तुमचे आहे, दंगली का करता? तुमच्या विचारांचे सरकार आहे. भागवत, फडणवीस, शिंदे, अजितदादांनी कुदळ-फावडे घेऊन कबर तोडायला जावे. ही कबर महाराष्ट्राच्या शौर्याचे प्रतिक आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचे महत्व कमी करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. व्हिलन संपवला की हिरो संपतो, हे कारस्थान लक्षात घेतले पाहिजे. (Sanjay raut on riot)
बाबरीचा लढा वेगळा
बाबरीचा लढा वेगळा होता. बाळासाहेबांचे स्पष्ट मत होते. आम्हाला फक्त बाबरी द्या इतर मशिदी घ्या अशी त्यांची भूमिका होती. त्यांचा लढा राम मंदिरासाठी होता, असे सांगून खासदार राऊत म्हणाले, बाहेरून आलेल्यांनी हे करणं शक्य नाही. मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात बाहेरुन लोक येऊन दंगा पेटत असेल तर हे गृहमंत्रालयाचे अपयश आहे. विहिंपकडून दोन दिवसांपासून भडकावू वक्तव्य सुरु होते. राज्यात नवा दंगल पॅटन सुरु झालेला आहे. हिंदूंच्या मनात भीती निर्माण करण्याचा हा पॅटर्न तयार झाला. (Sanjay raut on riot)
भ्रष्टाचार दाबण्यासाठी…
औरंगजेबाच्या विचाराचे महिमामंडण करणाऱ्यांवर कारवाई करू, असे फडणवीस म्हणतात. त्यांचे आम्ही स्वागत करु, अशी प्रतिक्रिया व्यक्त करून खा. राऊत म्हणाले, महाराष्ट्रात महिमामंडण शिवरायांचेच होणार. औरंगेबाच्या कबरीचे उद्दात्तीकरण कोणी करत नाही. तुमचेच लोक करतायत. सरकारची भ्रष्टाचाराची प्रकरणे दाबण्यासाठी औरंगजेबाचे विषय काढले जातायत. जयकुमार रावल यांनी कोट्यावधीचा भ्रष्टाचार केला. १८० कोटी गरीब जनतेचे लुटले, त्याला तुम्ही काय केले, असा सवालही राऊत यांनी केला.
हेही वाचा :
पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना सोडणार नाही
सरकार, फडणवीस पुरस्कृत दंगल