बेळगाव : प्रतिनिधी : बेळगाव-गोवा मार्गावरील कुसमळी येथील रस्ता वाहून गेल्यामुळे चोर्ला मार्गे गोव्याला जाणारा रस्ता शनिवारी मध्यरात्रीपासून बंद झाला आहे. यामुळे गोव्याला जाणारी वाहतूक बैलुर आणि खानापूरमार्गे वळविण्यात आली आहे. (Road damaged)
बेळगावहून गोव्याला भाजीपाला, दूध आदी पुरवठा करणारी वाहने चोर्लामार्गे जातात. पण नदीवरील रस्ता वाहून गेल्याने आता या मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे.
बेळगाव-चोर्ला-गोवा मार्गावर कुसमळी येथे नवीन पूल बांधण्यात येत असल्याने, बाजूला पर्यायी रस्ता तयार करण्यात आला होता. परंतु जांबोटी परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात वाढला व त्यामध्ये पर्यायी मार्ग वाहून गेला. (Road damaged)
बेळगाव-चोर्ला-गोवा मार्गावरील कुसमळी ब्रिजला तडे गेल्याने सदर ब्रिज पाडण्यात आला व त्या जागी नवीन ब्रिज बांधण्याचे काम हाती घेण्यात आले होते. व वाहतुकीसाठी ब्रिजच्या बाजूने पर्यायी मार्ग तयार करण्यात आला होता. परंतु ब्रिजचे बांधकाम अजून काही प्रमाणात शिल्लक आहे. उर्वरित बांधकाम करण्यासाठी कंत्राटदाराने युद्धपातळीवर रात्रंदिवस काम सुरू केले आहे. परंतु यावर्षी पावसाचे आगमन लवकर झाल्याने या ब्रिज बांधकामात अडथळा निर्माण झाला आहे. (Road damaged)
सध्या जांबोटी परिसरात पावसाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याने मलप्रभा नदीतून पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात होत आहे. शनिवारी मध्यरात्री पाण्याच्या प्रवाहामुळे हा पर्यायी मार्ग वाहून गेला आहे. त्यामुळे वाहतूक बैलूर मार्गे व खानापूरमार्गे वळविण्यात आली आहे.
समाज
Bridge collapsed: इंद्रायणीवरील पूल कोसळून दोघांचा मृत्यू; अनेकजण बेपत्ता
पुणे : इंद्रायणी नदीवरील अरूंद पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला. अनेक पर्यटक बुडाल्याची भीती आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, १० ते १५ जण वाहून गेले आहेत. आपत्कालीन मदत म्हणून बचाव बोटी आणि अग्निशमन दलाच्या गाड्या तैनात करण्यात आल्या आहेत. (Bridge collapsed)
पिंपरी-चिंचवड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनहोटे यांनी सांगितले की, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) घटनास्थळी पोहोचले आहे. बचाव कार्य सुरू केले आहे. त्यांनी आतापर्यंत ३८ लोकांना वाचवले आहे.
“ सुटी असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या संख्येने पर्यटक आले होते. पर्यटक पुलावर असतानाच पूल कोसळला. एनडीआरएफ घटनास्थळी आहे,” असे बनहोटे यांनी सांगितले. (Bridge collapsed)
अत्यंत अरुंद पूल
हा पूल अत्यंत अरूंद आहे. एका वेळी फक्त एकच दुचाकी पुलावरून जाऊ शकते. शेलारवाडी ते कुंडमळा या दोन गावांना जोडणारा हा प्रमुख मार्ग आहे. सुटीच्या दिवशी या परिसरात पर्यटकांची मोठी वर्दळ असते.
पुलाच्या दोन्ही बाजूंनी तीव्र उतार होते. त्यामुळे पावसाळ्यात पाणी वाढले की या पुलावरून जाणे अत्यंत धोकादायक ठरायचे. नागरिकांनी या मार्गाचा वापर टाळण्याचा प्रयत्न केला तरी अन्य पर्याय नसल्याने त्यांना धोका पत्करावा लागत होता. (Bridge collapsed)
रात्री उशीरापर्यंत दुर्घटनास्थळी बचावकार्य सुरू होते. मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दुर्घटनेच्या कारणांची चौकशी
पूल कोसळून झालेली दुर्घटना दुर्दैवी आणि वेदनादायी आहे. या दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.(Bridge collapsed)
दुर्घटनेत काही नागरिक व पर्यटक नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याची प्राथमिक माहिती आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, स्थानिक प्रशासनाने तत्काळ दुर्घटनास्थळी पोहचून बचाव आणि मदतकार्य सुरू केले. जिल्हा प्रशासन, राष्ट्रीय आपत्कालीन प्रतिसाद दलही अल्पावधीतच घटनास्थळी पोचले असून त्यांनीही बचाव व मदतकार्यास सुरुवात केली, असे त्यांनी सांगितले.
खा. सुळे यांनी दिला धीर
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष खा. सुप्रिया सुळे यांनी जखमी नागरिकांना धीर दिला, त्यांच्याशी सुसंवाद साधला. ज्यांचे नातेवाईक बेपत्ता आहेत अशा कुटुंबीयांची भेट घेत त्यांना आधार दिला. “या ठिकाणी किती पर्यटक होते, कोणते लोक जखमी झाले आहेत आणि त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधा, त्यांना तातडीने मदत पोहोचवा,” असे निर्देश सुळे यांनी प्रशासनाला दिले.
Political leadership: महिला कॅबिनेट मंत्र्यांची संख्या भारतात सर्वांत कमी
जीनिव्हा : जागतिक स्तरावर राजकारणात महिलांचा टक्का वेगाने घटत आहे. त्यातही कॅबिनेट मंत्र्यांच्या संख्येचा विचार करता सध्या भारताचा वाटा सर्वांत कमी आहे. संयुक्त राष्ट्रांनी प्रकाशित केलेल्या एका अभ्यासात ही बाब अधोरेखित केली आहे. (Political leadership)
भारत १८१ पैकी १७४ व्या स्थानावर आहे. आणि देशातील महिला कॅबिनेट मंत्र्यांची संख्या २-९.९ टक्के आहे. कमी महिला राजकीय नेते असलेल्या राष्ट्रांच्या दुसऱ्या सर्वांत खालच्या श्रेणीत भारत आला आहे, असे संयुक्त राष्ट्रांनी नमूद केले आहे.
जागतिक स्तरावरील टक्केवारीही घसरली आहे. जागतिक राजकारणाचा विचार करता केवळ २३% महिला मंत्री आहेत. महिलांना राजकारणातही लिंगभेदाचा सामना करावा लागतो. त्यामुळे बहुतेक हे चित्र असावे, असे दिसते.
गेल्या काही वर्षांत सरकारच्या कार्यकारी भूमिकांमध्ये महिलांची संख्या कमी झाली आहे, असे आंतरसरकारी संघटनेने नमूद केले आहे. १ जानेवारी २०२५ पर्यंतच्या आकडेवारीचा विचार करता कॅबिनेट मंत्र्यांच्या प्रमुखांपैकी फक्त २२.९ टक्के महिला आहेत. २०२४ मध्ये हे प्रमाण २३.३ टक्के होते. (Political leadership)
महिला मंत्रीच नसलेल्या देशांची संख्या गेल्या वर्षी सात होती. ती वाढून या वर्षी नऊ झाली आहे. गेल्या वर्षी १५ मंत्री होत्या. ते प्रमाण यावर्षी केवळ नऊवर आले आहे.
मंत्रिपदाची जबाबदारी देताना लिंगभेद आणि भेदभाव केला जात असल्याचे विश्लेषणही संयुक्त राष्ट्राच्या अहवालात करण्यात आले. विशेष करून लैंगिक समानता (८७ टक्के) आणि कुटुंब आणि बाल व्यवहार (७१ टक्के) खात्याशी संबंधित पदांचीच जबाबदारी महिलांना दिली जात असल्याचे दिसते. (Political leadership)
दुसरीकडे, पुरुषांना राष्ट्रीय आणि जागतिक महत्त्वाच्या मुद्द्यांवर वर्चस्व असलेल्या मंत्रालयांची जबाबदारी दिली जाते. ही बाब आणि सामान्य झाली आहे. यामध्ये संरक्षण (८७ टक्के), आर्थिक आणि वित्तीय व्यवहार (८४ टक्के) आणि परराष्ट्र व्यवहार (८२ टक्के) अशा खात्यांचा समावेश आहे.
एकूणच, केवळ २७ देशांमध्ये महिलांचे नेतृत्व आहे. पाच वर्षांपूर्वीच्या आकडेवारी (२१)च्या तुलनेत यात सुधारणा आहे. सुमारे १०३ देशांमध्ये कधीही महिलेकडे सरकारच्या प्रमुखपदाची जबाबदारी नसल्याचे वास्तव ‘विमेन पॉलिटिकल लीडर २०२५’ या अहवालात अधोरेखित करण्यात आले आहे.
याचा साहजिकच परिणाम महिलांचे प्रश्न अधिक जटील होण्यात होत आहे. त्यामुळे महिला सक्षमीकरण अधिक आव्हानात्मक होत आहे.
हेही वाचा :
यूएन आमसभा ठरावावेळची भारताची भूमिका धोकादायक : काँग्रेस
जेचिऑन : भारताची जिम्नॅस्ट प्रणती नायकने आशियाई आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक अजिंक्यपद स्पर्धेमध्ये व्हॉल्ट प्रकारात ब्राँझपदक पटकावले. आशियाई जिम्नॅस्टिक्स स्पर्धांमधील तिचे हे तिसरे पदक आहे. (Pranati Nayak)
दक्षिण कोरियामधील जेचिऑनमध्ये ही स्पर्धा सुरू आहे. ३० वर्षीय प्रणतीने या स्पर्धेत १३.४६६ गुण मिळवत ब्राँझपदकावर नाव कोरले. चीनच्या झँग यिहानने (१३.६५०) सुवर्णपदक जिंकले, तर व्हिएतनामची एनग्युएन थि न्हू (१३,५६६) ही रौप्यपदकाची मानकरी ठरली. टोकियो ऑलिंपिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रणती या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत १३.०८३ गुण मिळवून चौथ्या स्थानावर राहिली होती. अंतिम फेरीमध्ये पहिल्या प्रयत्नात १३.४६६ गुण मिळवल्यानंतर तिच्याकडे दुसऱ्या प्रयत्नात कामगिरी उंचावण्याची संधी होती. मात्र, दुसऱ्या प्रयत्नात तिला १२.८६६ गुणांपर्यंतच पोहोचता आले. प्रणतीने यापूर्वी, २०१९ मध्ये उलनबतार आणि २०२२ मध्ये दोहा येथे झालेल्या आशियाई जिम्नॅस्टिक्स स्पर्धांमध्येही ब्राँझपदक मिळवले होते. (Pranati Nayak)
या स्पर्धेमध्ये भारताची प्रोतिशा समंथा अंतिम फेरीमध्ये १३.०१६ गुणांसह चौथ्या स्थानावर राहिल्यामुळे तिचे पदक थोडक्यात हुकले. माजी राष्ट्रीय विजेती असणारी समंथा प्राथमिक फेरीत १२.९१६ गुणांसह आठव्या स्थानावर होती. प्रणती आता आशियाई स्पर्धांमध्ये भारतातर्फे सर्वाधिक पदके जिंकणारी महिला जिम्नॅस्ट ठरली आहे. तिने दोन पदके मिळवणाऱ्या भारताच्या दीपा कर्माकरला मागे टाकले. दीपाने २०१५ च्या हिरोशिमा आणि २०२४ च्या ताश्कंद आशियाई जिम्नॅस्टिक्स स्पर्धांमध्ये अनुक्रमे ब्राँझ आणि सुवर्णपदक जिंकले होते. (Pranati Nayak)
हेही वाचा :
दक्षिण आफ्रिका कसोटी ‘चॅम्पियन’
आर्या-अर्जुन यांना मिश्रमध्ये सुवर्ण
मुंबई : विशेष प्रतिनिधी : शेतकरी कर्जमाफी जाहीर करण्याची गरज असताना महायुती सरकार जाणूनबूजून टाळाटाळ करत आहे. अवकाळी पावसाने शेतकरी संकटात सापडला आहे. सरकारने कर्जमाफी समितीचा खेळ न करता तातडीने कर्जमाफी व लाडक्या बहिणीला २१०० रुपये द्या आणि जमत नसेल तर खुर्च्या खाली करा, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शनिवारी दिला. (Congress demands loan waiver)
ते म्हणाले की, पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यक्रमात संतप्त शेतकऱ्यांनी जाब विचारला असता त्यांना दमदाटी केली. ही दादागिरी चालणार नाही. तुम्ही जनतेचे सेवक आहात मालक नाहीत, याचे भान ठेवा. कर्जमाफीसाठी समिती नेमण्याची भाषा करता, आश्वासन देताना समितीची आठवण आली नाही का? राज्याची आर्थिक परिस्थिती दिसली नाही का? आणि सर्वात महत्वाचे म्हणजे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी सकारकडे निधी नाही तर अदानी अंबानीसाठी लाखो करोडो रुपयांचा लाभ देण्यासाठी पैसा येतो कोठून? शेतकऱ्यांना व लाडक्या बहिणींना पैसे द्यायचे म्हटले की तिजोरीची आठवण येते का?, असा सवाल त्यांनी केला. (Congress demands loan waiver)
जगाच्या पोशिंद्याचे कंबरडे मोडले असताना सरकार शेतकरी कर्जमाफी देत नाही. शेतमालाला हमीभाव नाही. निवडणुकीवेळी कर्जमाफीचे आश्वासन देऊन मते घेतली व सत्ता मिळवली आणि आता कर्जमाफीबद्ल आम्ही बोललोच नाही, असे सत्ताधारी निर्लज्जपणे सांगत आहेत, असे सांगून ते म्हणाले की, भाजपा युती सरकार हे फक्त अदानी अंबानीसाठी पायघड्या घालते, पण शेतकरी व राज्यातील भगिनींना पैसे देताना चालढकल करत आहे. सुरजागडच्या खाणीतून मलई खाणार, समृद्धी महामार्गात भ्रष्टाचार, घोडबंदर भाईंदर बोगदा प्रकल्पात भ्रष्टाचार, पुणे रिंग रोड आणि आता अदानीच्या हितासाठी शक्तीपीठच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा मलिदा खाण्याचा उद्योग फडणवीस, अजित पवार व एकनाथ शिंदे यांचा सुरु आहे, असा आरोपही सपकाळ यांनी केला.
सरसकट कर्जमाफी द्या : पटोले
देशात सर्वांत जास्त शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात होतात हे लाजीरवाणे आहे. भाजपाचे नेते व सरकारमधील मंत्री मात्र शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी वाह्यात बडबड करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळत आहेत. शेतकरी हा गरीब व गरजू असून सरसकट सर्व शेतक-यांना कर्जमाफी द्यावी, अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी केली आहे. (Congress demands loan waiver)
कर्जमाफीची घोषणा करा : थोरात
बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफी आणि अन्य महत्त्वाच्या मागण्यांसाठी सुरू केलेले अन्नत्याग आंदोलन थांबविण्यासाठी सरकारने घेतलेली भूमिका, ही शेतकऱ्यांची पुन्हा एकदा फसवणूक ठरू नये. सत्तेवर येण्यापूर्वी या सरकारने पहिल्याच कॅबिनेट बैठकीत शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले होते. हे आश्वासन पाळणे सरकारचे नैतिक आणि राजकीय कर्तव्य आहे, सरकारने समिती स्थापन करण्याची नौटंकी करण्यापेक्षा सरसकट कर्जमाफीची घोषणा करावी, अशी आग्रही मागणी काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. थोरात म्हणाले, आज सरकारकडे लाखो कोटी रुपयांचे महामार्ग आणि विविध प्रकल्प उभारण्यासाठी पैसे आहेत, परंतु शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मात्र सरकारी तिजोरी रिकामी असल्याचा देखावा केला जात आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी समिती कशाला पाहिजे? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
हेही वाचा :
नरेंद्र मोदी तुम्ही कधी बोलणार?
शेतकरी कर्जमाफीसाठी समितीची काय गरज? : शेट्टी
जयसिंगपूर : प्रतिनिधी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी कर्जमुक्तीसाठी समिती नेमण्याचा निर्णय घेतला त्याप्रमाणे त्यांनी देशातील उद्योगपतींची कर्जे राईट ॲाफ करताना पंतप्रधान मोदींना व अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनाही समिती नेमण्याचा सल्ला द्यावा. लाडकी बहीणीसाठी वार्षिक ३६ हजार कोटी , शक्तीपीठ महामार्गासाठी ८६ हजार कोटी, बुलेट ट्रेन १ लाख ८ हजार कोटीचा चुराडा करत असताना कोणतीही समिती नेमली नाही. मग शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्यासाठी समितीची नेमण्याची काय गरज होती? असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे. राज्य सरकारने शेतकरी कर्जमुक्तीसाठी समिती गठीत केलेली आहे. सात बारा कोरा करणाऱ्या निर्णयास टाळाटाळ केल्यास राज्य सरकारला याची मोठी किंमत मोजावी लागेल, असा इशाराही शेट्टी यांनी दिला आहे. (Farmar loan)
राजू शेट्टी म्हणाले, प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक बच्चू कडू यांनी राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमुक्तीसह दिव्यांग अनुदान वाढ व विविध मागण्यासाठी सुरू केलेले आमरण उपोषण ७ व्या दिवशी राज्य सरकारने दिलेल्या लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आले. बच्चू कडूंच्या उपोषणास सरकार दाद देत नाही व कर्जमुक्ती विषयी चालढकल करीत आहे याचा महाराष्ट्रातील शेतक-यांना प्रचंड संताप आलेला होता. त्यामुळे कर्जमुक्ती ही केवळ बच्चू कडूंचीच मागणी नाही तर संपुर्ण राज्यातील शेतक-यांची मागणी आहे आणि ती रास्तही आहे. कारण सातबारा कोरा करण्याचे आश्वासन देवून महायुतीने शेतकऱ्यांची मते घेतलेली आहेत. म्हणून शेतकऱ्यांची ताकद दाखविण्यासाठी उद्या चक्काजामचे आवाहन केले होते. दरम्यान बच्चू कडू आणि सरकार यांच्यात वाटाघाटी होवून बच्चू कडू यांनी उपोषण स्थगित केल्याने उद्या दिनांक १५ जून रोजी संपुर्ण राज्यात विविध शेतकरी व सामाजिक संघटना यांचेवतीने होणारे चक्काजाम आंदोलन स्थगित करण्यात आले असल्याचे माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी दिली. (Farmar loan)
फडणवीस यांच्या विदर्भात सर्वाधीक शेतकऱ्यांच्या आत्महत्या
राजू शेट्टी म्हणाले, केंद्र व राज्य सरकारच्या धोरणामुळे तसेच अस्मानी व सुल्तानी संकटाने राज्यातील शेतकरी कर्जबाजारी होवून आर्थिकदृष्ट्या पिचला गेला आहे. राज्यात रोज आठ शेतकरी आत्महत्या करू लागले आहेत. सर्वाधिक आत्महत्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या विदर्भात होत आहेत. यामुळे त्यांनी समिती नेमून व चालढकल करून राज्यातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या रक्ताने भिजलेले कफन डोक्याला बांधून राज्यभर फिरू नये. जर राज्यातील शेतक-यांची कर्जमुक्ती झाली नाही तर याच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कपाळाचे कुंकू पुसलेल्या लाडक्या बहीणीचा शाप त्यांना लागल्याशिवाय राहणार नाही. (Farmar loan)
Done felicitated : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी न्यूनगंड बाळगू नये : डोणे
कोल्हापूर : विद्यार्थ्यांनी सचोटीने अभ्यास केला पाहिजे. आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवून ध्येयाकडे वाटचाल केली पाहिजे. ग्रामीण भागातील मुलेही प्रामाणिक कष्टातून यूपीएससीसारख्या अवघड परीक्षा पास होऊ शकतात. त्यासाठी न्यूनगंड सोडा आणि चिकाटीने अभ्यास करा, असा सल्ला आयपीएस बिरदेव डोणे यांनी दिला. (Done felicitated)
डोणे यांचा वसगडे, ता. करवीर येथील बुद्ध विहारात सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. लोकनियुक्त सरपंच योगिता बागडी यांच्याहस्ते हा सत्कार करण्यात आला.
डोणे म्हणाले, स्पर्धा परीक्षेसाठी किमान पाच तास अभ्यासाची तयारी ठेवली पाहिजे. मुले हीच पालकांची संपत्ती असतात. याची जाणीव मुलांनीही ठेवावी. विद्यार्थ्यांनी अपयशाला खचून न जाता सचोटीने प्रयत्न केले पाहिजेत. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आमच्यासाठी सतत मार्गदर्शक आहेत, याचे भान ठेवून अभ्यास केला आणि दहावीपासूनच स्पर्धा परीक्षेची तयारी केली तर यश निश्चित मिळते, असे ते म्हणाले. (Done felicitated)
वंचित बहुजन आघाडीचे शाखाध्यक्ष सुनील कांबळे, आम्रपाली बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष मनोहर भोसले, संस्थेचे दिनकर कांबळे, भानुदास भोसले, संदीप भोसले, अण्णा कामत, बाळासाहेब कांबळे, रमजान बेपारी, बाळासाहेब उपाध्ये, सुरेश वसगडेकर तसेच इयत्ता दहावी-बारावी, पदवीधर सरळ सेवा, एमपीएससी-यूपीएससीचे विद्यार्थी उपस्थित होते. सत्काराआधी डोणे यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
हेही वाचा :
पंचगंगा हॉस्पिटल राज्यात प्रथम
हनिमूनसाठी गेलेल्या जोडप्यांपैकी राजा रघुवंशी याची हत्या म्हणजे एक सुनियोजित षड्यंत्र आणि सुपारी देऊन केलेले हत्याकांड असल्याचे पोलिस तपासातून उघड झाले आहे. मेघालय पोलिसांनी या प्रकरणाला ‘ऑपरेशन हनीमून’ असे नाव दिले असून या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन त्याचे धागेदोरे उलगडले आहेत. (Operation Honeymoon)
- डॉ. विजय चोरमारे
इंदूरहून शिलाँगला हनिमूनसाठी गेलेल्या जोडप्यांपैकी राजा रघुवंशी याची हत्या आणि त्याची पत्नी सोनम बेपत्ता झाल्याच्या बातमीने देशभर खळबळ उडाली होती. २१ मे रोजी घडलेल्या या घटनेमुळे केवळ ईशान्य भारतच नव्हे, तर संपूर्ण देश हादरून गेला होता. देशभरातील प्रसारमाध्यमांतून त्याची चर्चा सुरू झाली होती.
देशभर खळबळ उडाली असताना सोनम रघुवंशी नऊ जून रोजी अचानक उत्तर प्रदेशातील गाझीपूरमध्ये ‘प्रकट’ झाली. त्यावरून एकूण या प्रकरणाबाबतचा गोंधळ वाढवला. राजाची हत्या सोनमने घडवून आणल्याचा दावा मेघालय पोलिस करीत असताना, आपले अपहरण केल्याचा दावा सोनमने केला होता. त्यामुळे एकूण या प्रकरणाची गुंतागुंत वाढली होती. सोनम आणि राजा रघुवंशीच्या नातलगांनी केलेल्या वक्तव्यांनी गोंधळात भर टाकली होती. परंतु मेघालय पोलिसांनी या प्रकरणाचे धागेदोरे उलगडले आहेत. (Operation Honeymoon)
पोलिसांनी ऑपरेशन हनिमून असे नाव दिलेले हे नेमके प्रकरण काय आहे आणि त्याचे धागेदोरे कसे उलगडत गेले, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.
सोनम आणि राजा रघुवंशी या दोघांच्याही कुटुंबांनी दिलेल्या म्हटले आहे की, राजा आणि सोनमच्या लग्नापूर्वी त्यांची भेट आणि बोलणे झाले होते. दोघेही लग्नासाठी तयार होते, आनंदी होते. (Operation Honeymoon)
त्याचमुळे सोनमच राजाच्या हत्येत सामील कशी असेल, असा प्रश्न सुरुवातीला उपस्थित केला जात होता. सोनम राजाशी लग्नासाठी तयार होती आणि आनंदी होती, तर फक्त १५ दिवसांत तिने राजाची हत्या का घडवून आणली? इंदौरहून शिलाँगला जाऊन हत्या घडवणे, संपूर्ण योजना बनवणे, हे सर्व इतक्या लवकर आणि इतक्या सहजतेने शक्य होते का? असे प्रश्न उपस्थित केले जात होते. पोलिसांनी त्याही सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधली आहेत.
सोनमचे वडील देवीसिंह कुशवाह यांची इंदूरमध्ये प्लायवूड फॅक्टरी आहे. तिथे काम करणाऱ्या राज कुशवाह या तरुणाशी सोनमचे प्रेमसंबंध होते. त्याच्यासोबत राहण्यासाठीच सोनमने पती राजा कुशवाहची हत्या केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. या हत्याकांडाचे सगळे नियोजन एकट्या सोनमनेच केले असून अनेक धक्कादायक बाबी पोलिस तपासातून समोर आल्या आहेत.
आपल्या वडिलांना हृदयविकाराचा त्रास आहे. त्यांना प्रेमविवाह मान्य होणार नाही. त्यामुळे मी त्यांच्या इच्छेनुसार राजा रघुवंशीशी लग्न करते. दरम्यान पतीला संपवते. त्यानंतर मी तुझ्याशी लग्न करते, असे सोनमने राज कुशवाहला सांगितले होते. त्याचसाठी पुढची सगळी पटकथा रचली आणि त्यानुसार राजा रघुवंशीची हत्या करण्यात आली.
हनिमूनला जाण्यासाठी पती राजा रघुवंशीचे आणि आपले विमानाचे तिकिट सोनमनेच बुक केले होते. त्याचवेळी तिने चार संशयितांची रेल्वेची तिकिटे बुक केली होती. आपला प्रियकर राज कुशवाह याच्यासह आकाश राजपूत, आनंद कुर्मी आणि विशाल चौहान असे हे चौघेजण होते. प्रत्यक्षात चौघे रेल्वे स्टेशनवर आले तेव्हा राज कुशवाहने येण्यास नकार दिला आणि तो ट्रेनमध्ये बसला नाही. उरलेले तिघेजण नियोजनानुसार ट्रेनने पोहोचले. त्यांच्या निवासाची व्यवस्था सोनमनेच केली होती.
ही घटना म्हणजे एक सुनियोजित षड्यंत्र आणि सुपारी देऊन केलेले हत्याकांड असल्याचे पोलिस तपासातून उघड झाले आहे. मेघालय पोलिसांनी या प्रकरणाला ‘ऑपरेशन हनीमून’ असे नाव दिले असून या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन त्याचे धागेदोरे उलगडले आहेत. लग्नानंतर अवघ्या दहा दिवसांनी या हत्येची पटकथा लिहिली गेली असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. हत्या झालेल्या राजा रघुवंशीची पत्नी सोनम रघुवंशी हीच या हत्येची मूळ सूत्रधार आहे, असल्याचा पोलिसांचा दावा आहे. हत्येतील तिच्या सहभागाचे अनेक भक्कम पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. (Operation Honeymoon)
गाझीपूरच्या धाब्यावर प्रगटल्यानंतर सोनमने सांगितले की, तिला बंदिवासात ठेवले गेले होते. “लुटमार करून माझे अपहरण करण्यात आले. एका खोलीत मला बंद ठेवले गेले. गाडीत बसवून गाझीपूरच्या ढाब्यावर सोडले.”
परंतु तिची ही कहाणी काल्पनिक आणि दिशाभूल करणारी असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
मेघालय पोलिसांनी या प्रकरणाला ‘ऑपरेशन हनिमून’ असे नाव दिले, कारण ही हत्या हनिमून ट्रिपदरम्यान घडली. या ट्रिपचे नियोजन स्वतः सोनमने केले होते. संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या या प्रकरणाची देशभरातील माध्यमांतून चर्चा झाली. मेघालयातील पर्यटनावरही त्याचा विपरित परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली. त्यामुळे स्थानिक पोलिसानी अत्यंत गांभीर्याने तपास केला. पोलिसांच्या मुख्य पथकात २० तज्ज्ञ अधिकारी आणि एकूण १२० पोलीस कर्मचारी सामील होते. सात जून रोजी सर्व संशयित ठिकाणांवर एकाच वेळी छापे टाकण्यात आले. त्यातून पोलिसांच्या हाती महत्त्वाचे पुरावे मिळाले.
हत्याकांडातील तीन संशयितांशी सोनमची आधीपासूनच ओळख होती. घटनेपूर्वी दहा किलोमीटर अंतरावर त्या तिघांसोबत ती दिसली होती. राजा रघुवंशी आणि सोनम ज्या हॉटेलात थांबले होते, तिथून जवळच्या हॉटेलमध्ये संशयित थांबले होते. पोलिसांच्या हाती सुमारे ४२ सीसीटीव्ही फुटेज लागले आहेत. स्कुटीच्या मागावरूनही बरीच माहिती मिळाली. आरोपींच्या म्हणण्यानुसार, सोनमने त्यांना राजा रघुवंशीला ठार करण्यास सांगितले.
सोनमने दरम्यानच्या काळात केलेल्या प्रवासावरून तिच्या हत्येतील सहभागाबाबत
- २१ मे : सर्व आरोपी गुवाहाटीला पोहोचले.
- २२ मे : आरोपी शिलाँगला पोहोचले.
- २३ मे : राजा रघुवंशीची हत्या
- सोनम २३ मे रोजी गुवाहाटीहून इंदूरला निघाली.
- २५ मे रोजी ती इंदूरला पोहोचली आणि तिथे ती राजाला भेटली. राजाने तिला एक दिवस इंदूरमध्ये भाड्याच्या खोलीत थांबवले. (Operation Honeymoon)
- पोलिसांना ३ आणि ४ जूनलाच अंदाज आला होता की, सोनम या हत्येत सामील आहे. आकाशचा रक्ताने माखलेला शर्ट घटनास्थळी सापडला. सोनमने आकाशला दिलेला रेनकोट घटनास्थळापासून ६ किलोमीटर अंतरावर सापडला. हे तपास भटकवण्यासाठी केले गेले होते.
- आनंद कुर्मीला जेव्हा पकडले गेले, तेव्हा घटनेच्या वेळी त्याने घातले होते, तेच कपडे त्याच्या अंगावर होते. हत्येनंतर सर्व आरोपी ११ किलोमीटर अंतरावर एकत्र जमले.
- घटनास्थळावरून आकाशचा रक्ताने माखलेली शर्ट जप्त करण्यात आला.
- सोनमने दिलेला रेनकोट ६ किमी दूर सापडला.
- आनंद कुर्मी तेच कपडे घालून पकडला गेला, जे हत्येच्या वेळी त्याने परिधान केले होते.
- हत्येनंतर सर्व आरोपी ११ किमी दूर एका ठिकाणी जमले.
यावरून पोलिसांना हत्येचे धागेदोरे उलगडण्यात यश आले.
हत्येत वापरलेले हत्यार गुवाहाटीतील एका हॉटेलबाहेरील दुकानातून खरेदी केले गेले.
सोनम आणि राजा रघुवंशीच्या हनीमून ट्रिपदरम्यान एकही फोटो काढला गेला नाही. सोशल मीडियावरसुद्धा कोणतीही माहिती दिली गेली. यामुळेच पोलिसांना संशय निर्माण झाला. मात्र हत्येनंतर अवघ्या १५ मिनिटांनंतर राजा रघुवंशीच्या अकाउंटवरून एक पोस्ट करण्यात आली: “सात जन्मांची साथ आहे.” ही पोस्ट सोनमने स्वतः केली होती, ज्यामुळे ती संशयाच्या भोवऱ्यात सापडली.
Bachchu Kadu refuses request: मंत्र्यांची विनंती बच्चू कडूंनी फेटाळली
अमरावती/मुंबई : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बेमुदत अन्नत्याग आंदोलन करणाऱ्या बच्चू कडू यांची राज्याचे मंत्री संजय राठोड यांनी शुक्रवारी (१३ जून) भेट घेतली. त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. मात्र ती कडू यांनी फेटाळून लावली. (Bachchu Kadu refuses request)
जोपर्यंत मागण्या मान्य केल्याची घोषणा होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा निर्धार बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा बोलून दाखवला.
प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी गेल्या ८ जूनपासून बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. शुक्रवारी मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी कडू यांची उपोषणस्थळी भेट देत कडू यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. (Bachchu Kadu refuses request)
त्यावर रोज १५ ते २० शेतकरी आत्महत्या करत आहेत. सरकार या प्रश्नात लक्ष घालायला तयार नाही. आम्ही कधीही शेतकरी, शेतमजुरांसोबत विश्वासघात करू शकत नाही. मागण्यांवर एकत्र निर्णय घ्या नाही तर आमची अंत्ययात्रा काढा. या दोन्ही पैकी काही केले तरी ते मान्य आहे, अशी संतप्त भूमिका कडू यांनी यावेळी मंत्री राठोड यांच्यासमोर मांडली.
उपोषणस्थळी भेट दिल्यानंतर मंत्री संजय राठोड यांनी सरकारची भूमिका मांडली. बच्चू कडू यांच्या तब्बेतीची आम्हा सर्वांना चिंता आहे. दर मंगळवारी मंत्रिमंडळाची बैठक होते. त्यामध्ये त्यांच्या मागण्यांचा विषय मी मांडणार आहे. (Bachchu Kadu refuses request)
१४ ऐवजी १५ जूनला चक्काजाम आंदोलन
दरम्यान, विमान दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर संघटनेच्यावतीने १४ जूनला होणारे आंदोलन एक दिवस लांबणीवर टाकण्यात आले आहे. बच्चू भाऊ कडू व पाठिंबा देणाऱ्या सर्व नेते, सामाजिक संघटना आणि आंदोलकांच्या निर्देशानुसार हे राज्यव्यापी चक्का जाम आंदोलन १५ जून रोजी करण्यात येईल, अशी घोषणा करण्यात आली आहे.
आ. संजय खोडके, यशोमती ठाकूर यांचा पाठींबा
कडू यांच्या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषद सदस्य संजय खोडके व अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके यांच्यासह काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी पाठींबा दिला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बच्चू कडू यांनी सुरु लढ्यात आपण सहभागी असल्याचे सुलभा खोडके यांनी सांगितले. मात्र उपोषणाचा मार्ग न अवलंबता शासन दरबारी व मंत्रालय स्तरावर आंदोलन करून शेतकऱ्यांच्या प्रश्नांना न्याय देऊ. आंदोलन मागे घ्यावे, असे आवाहन सुलभा खोडके यांनी केले.
प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू हे मोझरी येथे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अन्नत्याग आंदोलन करत आहेत. बच्चू भाऊ सोबत राजकीय मतभेद असले तरी शेतकऱ्याच कल्याण हाच आमच्यासाठी धर्म आहे अस मी मानत आले आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर होणाऱ्या आंदोलनाला माझा पाठिंबा आहे, असे यशोमती ठाकूर यांनी म्हटले आहे.
त्यांच्या एक्स पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्रात २०२४ मध्ये २,६३५ तर मागच्या ६ महिन्यांत ८६९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. कर्ज, नापीकी, अवकाळी पाऊस तसेच सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांना कंटाळून शेतकऱ्यांनी आपले जीवन संपवले आहे. यात विदर्भ, मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्येचा आकडा अधिक आहे. राज्यातल्या महायुती सरकारने सत्तेत यायच्या आधी शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन दिले, पण सत्तेत येताच शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली. भाजप आणि महायुती सरकारचे घटक राहिलेल्या बच्चू कडू यांच्या आंदोलनाला सहा दिवस झाले आहेत. त्यांची साधी दखलही या निगरगट्ट सरकारने घेऊ नये? आज या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की, त्यांनी बच्चू कडू यांनी मांडलेल्या मुद्यांना गांभीर्याने घ्यावे. तसेच त्वरित शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घ्यावा. (Bachchu Kadu refuses request)
सरकारतर्फे चर्चेसाठी महाराष्ट्राचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड उपोषणस्थळी दाखल… pic.twitter.com/szYEI6FALT
— BACCHU KADU (@RealBacchuKadu) June 13, 2025
अत्यंत महत्वाचे,14 जून चे चक्काजाम आंदोलन 15 जून रोजी होईल..
— BACCHU KADU (@RealBacchuKadu) June 13, 2025
गुरुवार दिनांक 12 जून रोजी अहमदाबाद येथे विमान दुर्घटनेत बळी पडलेल्या निष्पाप नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली व त्यांच्या कुटुंबा प्रती शोक संवेदना म्हणून मा. बच्चू भाऊ कडू व पाठिंबा देणाऱ्या सर्व नेते,सामाजिक… pic.twitter.com/pzhSnKvgG0
हेही वाचा :
मी जिवंत कसा बाहेर पडलो ?
नवी दिल्ली : हवाई दुर्घटनांमध्ये आतापर्यंत अनेक नेते आणि महत्त्वाच्या व्यक्ती मृत्युमुखी पडल्या आहेत. प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. होमी भाभा, काँग्रेसचे नेते माधवराव शिंदे, वायएसआर, संजय गांधी यांच्यासह सीडीएस जनरल बीपीन रावत यांनी अशा दुर्घटनांमध्ये प्राण गमावले आहेत. गुरुवार (१२ जून)च्या विमान दुर्घटनेत गुजरात माजी मुख्यमंत्री विजय रूपानी यांच्यासह २४१ जणांचा मृत्यू झाला. (Aircrash)
या पार्श्वभूमीवर पीटीआयने अशा दुर्घटनांची आणि यात मृत्युमुखी पडलेल्या प्रमुख व्यक्तींची यादी दिली आहे.
* होमी भाभा (१९६६)
भारताच्या अणुकार्यक्रमाचे प्रणेते अणुभौतिकशास्त्रज्ञ होमी जहांगीर भाभा यांचे २४ जानेवारी १९६६ रोजी एअर इंडिया फ्लाइट १०१ मध्ये एका अपघातात दुःखद निधन झाले. जिनेव्हा हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी झालेल्या चुकीच्या संपर्कामुळे विमान स्विस आल्प्समधील माँट ब्लँक येथे कोसळले. (Aircrash)
* संजय गांधी (१९८०)
काँग्रेस नेते आणि तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे पुत्र संजय गांधी यांचे २३ जून १९८० रोजी अपघातात निधन झाले. सफदरजंग विमानतळाजवळ दिल्ली फ्लाइंग क्लबच्या विमानात हवाई स्टंट करण्याचा प्रयत्न करताना विमानाचे नियंत्रण सुटले आणि ते कोसळले.
* माधवराव सिंधिया (२००१)
ज्येष्ठ काँग्रेस नेते माधवराव सिंधिया, जे स्वतः माजी नागरी विमान वाहतूक मंत्री होते यांचे ३० सप्टेंबर २००१ रोजी कानपूर येथे एका राजकीय रॅलीदरम्यान विमान अपघातात निधन झाले. त्यांना घेऊन जाणारे १० आसनी खाजगी विमान उत्तर प्रदेशातील मणिपुरीजवळ खराब हवामानामुळे कोसळले. (Aircrash)
* जीएमसी बालयोगी (२००२)
लोकसभा अध्यक्ष आणि तेलुगू देसम पक्षाचे नेते जीएमसी बालयोगी यांचा ३ मार्च २००२ रोजी अशाच अपघातात मृत्यू झाला. पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील भीमावरम येथून त्यांना घेऊन जाणारे खाजगी हेलिकॉप्टर आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील कैकलूरजवळील तलावात कोसळले.
* सायप्रियन संगमा (२००४)
मेघालयाचे ग्रामीण विकास मंत्री सायप्रियन संगमा आणि इतर नऊ जणांचा राज्याच्या राजधानीपासून फक्त २० किमी अंतरावर असलेल्या बारापाणी तलावाजवळ हेलिकॉप्टर कोसळून मृत्यु झाला. २२ सप्टेंबर २००४ रोजी ही दुर्घटना घडली.
* के. एस. सौम्या (२००४)
सुप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री के. एस. सौम्या १७ एप्रिल २००४ रोजी एका विमान अपघातात मृत्युमुखी पडली. ‘सूर्यवंशम’ मधील तिची भूमिका अत्यंत गाजली होती. सौम्या तिच्या भावासोबत बेंगळुरूहून करीमनगरला विमानाने जात होती. त्यावेळी हा अपघात झाला.
* ओ. पी. जिंदाल आणि सुरेंदर सिंग (२००५)
उद्योगपती आणि हरियाणाचे मंत्री ओम प्रकाश (ओपी) जिंदाल २००५ मध्ये कृषी मंत्री सुरेंदर सिंग यांच्यासह एका हेलिकॉप्टर अपघातात मृत्युमुखी पडले. त्यांचे हेलिकॉप्टर दिल्लीहून चंदीगडला जात असताना उत्तर प्रदेशातील सहारनपूरमध्ये कोसळले. (Aircrash)
* वाय. एस. रेड्डी (२००९)
आंध्र प्रदेशचे तत्कालीन लोकप्रितय मुख्यमंत्री वाय एस राजशेखर रेड्डी (२००९) यांचे २ सप्टेंबर २००९ रोजी निधन झाले. त्यांचे बेल ४३० हेलिकॉप्टर खराब हवामानामुळे घनदाट अशा नल्लामला जंगलात कोसळले. ते वायएसआर म्हणून प्रसिद्ध होते.
* दोरजी खांडू (२०११)
अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री दोरजी खांडू आणि इतर चार जणांचा ३० एप्रिल २०११ रोजी पश्चिम कामेंग जिल्ह्यात अपघाती मृत्यू झाला. तवांगहून इटानगरला घेऊन जाणाऱ्या त्यांचे हेलिकॉप्टर अपघातग्रस्त झाले. * सीडीएस जनरल बिपिन रावत (२०२१) भारताचे पहिले संरक्षण प्रमुख जनरल बिपिन रावत यांचे ८ डिसेंबर २०२१ रोजी हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले. ही घटना तामिळनाडूतील कुन्नूरजवळ घडली. जनरल रावत त्यांच्या पत्नी आणि इतर ११ जणांसह सुलूरहून वेलिंग्टनला जात होते.
हेही वाचा :
इराणवरील हल्ल्यानंतर एअर इंडियाकडून १६ विमाने रद्द
मी जिवंत कसा बाहेर पडलो ?