Home » Blog » caste discrimination: दलित विद्यार्थ्यांना गावातील रस्त्यावरून जाण्यास विरोध; वृद्धेवर गुन्हा

caste discrimination: दलित विद्यार्थ्यांना गावातील रस्त्यावरून जाण्यास विरोध; वृद्धेवर गुन्हा

by प्रतिनिधी
0 comments
caste discrimination

हैदराबाद : दलित समुदायातील विद्यार्थ्यांना गावातील जवळच्या रस्त्यावरून जाण्यास विरोध करणाऱ्या वृद्धा आणि तिच्या कुटुंबावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. (caste discrimination)

पोलिसांनी सांगितले की, दलित समुदायातील विद्यार्थ्यांना जवळच्या रस्त्यावरून जाण्यास ही महिला सातत्याने विरोधत करत होती. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. व्हिडिओमध्ये शुक्रवारी सकाळी तंजावर तालुक्यातील कोल्लंगराय गावात शाळेचा गणवेश परिधान केलेले आणि बॅगा घेऊन काही विद्यार्थी रस्त्यावरून चालताना दिसत आहेत. त्यावेळी संबंधित वृद्ध महिला त्यांना काठीने अडवते आणि या रस्त्यावरून जायचे नाही, असे बजावते.

तंजावर तालुका पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, प्राथमिक माहिती अहवाल (एफआयआर) दाखल करण्यात आला आहे. ‘‘आतापर्यंत कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. महिला आणि कुटुंबियांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. चौकशी सुरू आहे,’’ असे अधिकाऱ्याने शनिवारी पीटीआयला सांगितले. (caste discrimination)

या गावातील गावकऱ्यांनी तक्रार केली आहे की, ही महिला आणि तिच्या कुटुंबातील सदस्य त्यांना गावच्या सार्वजनिक रस्त्यावरून जायला नकार देत आहेत. ‘वंडी पठाई’ किंवा ‘वाहन मार्ग’  म्हणून हा रस्ता ओळखला जातो. यापूर्वी, गावकऱ्यांनी आरोप केला होता की त्यांना त्यांच्या वस्तीवर पोहोचण्यासाठी एका पाणवठ्याभोवती १.५ किमी अंतर कापून लांब मार्गाने जावे लागले.

हेही वाचा :

बब्बर खालसाच्या दहशतवाद्याचे युएईहून भारताकडे प्रत्यार्पण

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00