Home » Blog » Breach of privilege notice: कुणाल कामरा, अंधारेंविरोधात हक्कभंग

Breach of privilege notice: कुणाल कामरा, अंधारेंविरोधात हक्कभंग

विधिमंडळ अधिवेशनाचे वाजले सूप

by प्रतिनिधी
0 comments
Breach of privilege notice

मुंबई : विशेष प्रतिनिधी : कॉमेडियन कुणाल कामरा यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या व्यंगात्मक काव्याबद्दल त्यांच्यासह शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या विरोधात बुधवारी (२६ मार्च) विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मांडण्यात आला.(Breach of privilege notice)

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी विधानसभा व विधानपरिषदेत हा प्रस्ताव मांडताना सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी कामरा व विरोधकांवर कडाडून हल्ला चढविला. विधानसभा अध्यक्ष व सभापती राम शिंदे यांनी हा प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी विषय समितीकडे पाठवला.

दरम्यान तीन मार्चपासून सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा बुधवारी मुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिलेल्या उत्तरानंतर सुप वाजले. पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून सुरू होणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. (Breach of privilege notice)

गेल्या दोन दिवसापासून वादाचा विषय ठरलेला कॉमेडियन कुणाल कामराने आपल्या नया भारत या कॉमेडी शोमधून शिवसेना पक्षाचे नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर नाव न घेता बोचरी टीका केली . एका गाण्याचे विडंबन करत कामराने एकनाथ शिंदेंच्या दाढी, चष्म्यावरुन आणि शिवसेना पक्षातील बंडावरुन निशाणा साधला होता.

दुसरीकडे विरोधकांनीही हा व्हिडिओ शेअर करत या टीकेचे समर्थन केले. शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे  यांनी  ते गाणे पुन्हा म्हटले. त्यामुळे अंधारे यांनी सोशल मीडियावर बोलताना उपमुख्यमंत्र्यांबाबत चुकीची भाषा वापरली आहे. त्यामुळे, सुषमा अंधारे यांनी दोन्ही सभागृहाचा अवमान आणि अपमान केला आहे. अशी टीका करीत भाजपाचे विधान परिषदेतील गटनेते प्रवीण दरेकर यांनी त्यांच्या विरोधातील हक्कभंग प्रस्ताव मांडला. (Breach of privilege notice)

विधानसभेतही शिवसेनेचे आमदार रमेश बोरनारे यांनी हक्कभंग प्रस्ताव मांडला. कुणाल कामरा याचे गाणे पुन्हा सुषमा अंधारे यांनी म्हटले, मुख्यमंत्री यांनी निवेदन केले असतानाही परत ते गाणे म्हटले आहे, हा सभागृहाचा अपमान आहे. असे आमदार  बोरनारे यांनी सांगितले.

मी पायाला ५६ पुरुष बांधते असे म्हटले नाही : सुषमा अंधारे आपल्याविरुद्धच्या हक्कभंग प्रस्तावावर प्रतिक्रिया देताना सुषमा अंधारे यांनी भाजपाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांच्यावर अप्रत्यक्ष हल्ला चढविला. त्या म्हणाल्या, मी कोणत्याही सदस्याचा अपमान केलेला नाही,  मी कोणतेही बिभत्स कृत्य केलेले नाही की मी सभागृहात ५६ जण पायाला बांधून फिरते, अशी भाषा केलेली नाही. मी कोणाचा एकेरी उल्लेख केला आहे का?, मी सभागृहाबद्दल कोणाला खोटी माहिती पुरवली आहे का? असा सवाल  उपस्थित केला. तसेच, ज्या गृहमंत्र्यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूप्रकरणी सभागृहात खोटी माहिती दिली, अंतरवालीतील लाठी हल्ल्यासंदर्भात सभागृहाला खोटी माहिती देणारे गृहमंत्री फडणवीस आणि कोकणातील रिफायनरी संदर्भात नागरिकांनी केलेल्या आंदोलनावर पोलिसांनी केलेल्या अत्याचाराची सभागृहात खोटी माहिती देणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर हक्कभंग आणणे शक्य आहे का, याची माहिती मला सभागृहाने द्यावी, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे. तसेच, सभागृहात विभत्स हातवारे करणाऱ्या लोकांवरही तुम्ही हक्कभंग कधी आणणार आहात?, अशी त्यांनी उपरोधिकपणे विचारणा केले.

हेही वाचा :
जयकुमार गोरे प्रकरणाची ए टू झेड स्टोरी
मुख्यमंत्री, मंत्र्यांची वर्तणूक संविधानविरोधी
मोबाईलमधील डाटा डिलेट केल्याची कोरटकरची कबुली!

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00