सातारा : प्रतिनिधी : अज्ञानामुळेच अंधश्रध्दा निर्माण होते आणि माणसे आपल्या हानीला कारणीभूत ठरतात. त्यासाठी समाजाला ज्ञानाकडे घेऊन जायला हवे. तरच महाराष्ट्र शासनाने केलेला जादूटोणाविरोधी कायदा समाजावर प्रभाव असणाऱ्या लोकापर्यंत अधिक परिणामकारक पोहचू शकेल. डॉ. विलास खंडाईत यांची तळमळ यासाठीच आहे असून त्यांच्या प्रयत्नामुळे समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजेल असा विश्वास प्राच्यविद्यापंडीत डॉ. आ. ह. साळुखे यांनी व्यक्त केला.(Book published)
डॉ. विलास खंडाईत यांनी पीएचडी संशोधनावर आधारित लिहिलेल्या ‘जादूटोणाविरोधी कायदा : प्रशिक्षण कार्यक्रम’ या मराठीतील पुस्तकाचा हिंदी आणि इंग्रजीत अनुवादीत पुस्तकांच्या प्रकाशन सोहळ्यात अध्यक्षस्थानावरुन डॉ. आ. ह. साळुंखे बोलत होते. यावेळी विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे ज्येष्ठ नेते डॉ. भारत पाटणकर, राजकीय विश्लेषक राजू परुळेकर, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त सुनील जाधव, इंग्रजी पुस्तकाचे अनुवादक ख्यातनाम मानसोपचार तज्ञ डॉ. अनिमिष चव्हाण, हिंदीचे अनुवादक डॉ. भानुदास आगेडकर, डॉ. अरुण सोनकांबळे, प्रकाशक राकेश साळुंखे, सीताबाई खंडाईत आदी उपस्थित होते.(Book published)
आ. ह. साळुंखे म्हणाले, समाजातील अज्ञान, अंधश्रध्दा दूर व्हावी. ज्ञानाच्या प्रकाशात समाज उजळून निघावा यासाठीही खंडाईत यांची धडपड आहे. त्यांच्या या धडपडीला नक्कीच यश मिळेल.
डॉ. पाटणकर म्हणाले, माणसांच्या मनात भीती निर्माण झाल्यानंतरच अंधश्रध्दा तयार होते. ही अंधश्रध्दा अनाठायी आहे. समाजातील अंधश्रध्दा निर्मूलनासाठी मोहीम उघडावी लागेल. या चळवळीत आपणालाही उतरावे लागणार आहे. कारण, अंधश्रध्देतून निर्माण होणाऱ्या दुख:चे मूळ नष्ट करायलाच हवे.
अंधश्रध्दा ही मानसिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक आहे. आपले जीवन असुरक्षित आहे म्हणून आपण एखादी गोष्ट पकडतो. त्यातीलच अंधश्रध्दा हा एक प्रकार आहे. याबाबत जनजागृती आवश्यक आहे. डॉ. खंडाईत यांच्या पुस्तकामुळे कायद्याची माहिती सर्व स्तरावर पोहचण्यासाठी मदतच होणार आहे, असे ज्येष्ठ पत्रकार राजू परुळेकर यांनी स्पष्ट केले.(Book published)
लेखक विलास खंडाईत यांनीही मनोगत व्यक्त केले. अंधश्रध्दा शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीयही आहे. समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजला तरच खरा विवेकी माणूस तयार होईल, असे खंडाईत यांनी सांगितले.(Book published)
यादरम्यान डॉ. अनिमिष चव्हाण, डॉ. अरुण सोनकांबळे या अनुवादकांनीही पुस्तकासंबधी भूमिका स्पष्ट केली. सहाय्यक आयुक्त सुनील जाधव यांनी शुभेच्छा दिल्या. डॉ. विनोद वीर यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. सूत्रसंचालन पत्रकार अरुण जावळे यांनी केले. या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला माजी आमदार मदनदादा भोसले, डॉ. सतिश बाबर, डॉ. वैशाली चव्हाण, डॉ. सुहास पोळ, डॉ. गितांजली पोळ, चंद्रकांत खंडाईत, विजयराव गायकवाड, अनंता वाघमारे, नारायण जावलीकर, प्राचार्य अरुण गाडे, आदीनाथ बिराजे, गणेश कारंडे, हरिदास जाधव, प्रा. शरद गायकवाड, प्रशांत पोतदार, प्रज्वल मोरे, वैभव गायकवाड, सागर गायकवाड, आदी उपस्थित होते.
हेही वाचा :
अमेरिकेत शिकायला गेलेली मुलगी कोमात