Home » Blog » Book my show remove Kamra: कामरांना ‘बुक माय शो’ने हटवले?

Book my show remove Kamra: कामरांना ‘बुक माय शो’ने हटवले?

नसेल तर हरकत नाही! : कामरांची पोस्ट

by प्रतिनिधी
0 comments
Book my show remove Kamra

मुंबई : स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा यांना ‘बुक माय शो’ने आपल्या प्लॅटफार्मवरून हटवल्याचे वृत्त आहे. एकनाथ शिंदे गटाचे पदाधिकारी राहुल कनाल यांनी त्याबद्दल बुक माय शोच्या सीईओचे आभार मानल्याचे पोस्ट ‘पीटीआय’ने प्रसिद्ध केली आहे. त्यावर कामरा यांनी ‘बुक माय शो’ला उद्देशून या वृत्ताची खात्री करायला सांगितली आहे. कामरा यांनी ‘एक्स’वर तशी पोस्ट केली आहे.(Book my show remove Kamra)

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध केलेल्या कथित टिप्पणीवरून वाद निर्माण झाला होता. त्यांच्याविरोधात शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी गुन्हे दाखल केले आहेत. कामरा यांना पोलिसांनी नोटिसाही बजावल्या आहेत. कामरा यांनी मद्रास उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मिळवला आहे. (Book my show remove Kamra)

राहूल कनाल यांनी बुक माय शोचे सीईओ आशिष हेमराजानी यांना पत्र देत पोर्टल ‘‘स्वच्छ’’ ठेवल्याबद्दल आणि अशा कलाकाराला निखळ मनोरंजनाच्या यादीतून बाहेर ठेवल्याबद्दल ‘‘आभार’’ मानले, असल्याची त्यांची पोस्ट पीटीआय या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केली आहे. (Book my show remove Kamra)

या पोस्टमध्ये कनाल म्हणतात, ‘‘तुमच्या टीमने तुमच्या विक्री आणि प्रमोशनच्या यादीतून या कलाकाराला बाहेर  काढल्याबद्दल मी मनापासून आभार व्यक्त करण्यासाठी लिहित आहे. बुकमायशोच्या ‘सर्च’मधून त्याला (कामरा) बाहेर काढल्याबद्दल धन्यवाद. शांतता राखण्याची बाजू घेतल्याबद्दल आणि त्याच वेळी आमच्या भावनांचा आदर केल्याबद्दल आभार.”

दरम्यान, कनाल यांच्या दाव्याबद्दल बुक माय शोने अद्याप कसलेही स्पष्टीकरण दिलेले नाही. या पार्श्वभूमीवर कुणाल कामरा यांनी ‘बुक माय शो’ला उद्देशून, ‘मी तुमच्या प्लॅटफार्मवर आहे की नाही, याची खात्री करा. नसेल तर हरकत नाही,’ अशी पोस्ट केली आहे.

हेही वाचा :
‘बेअक्कल आणि भंपक कृषिमंत्री’
अभय कुरूंदकर दोषी

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00