नवी दिल्ली : प्रतिनिधी : सर्वोच्च न्यायालयाचे ५२ वे सरन्यायाधीश पदी भूषण रामकृष्ण गवई यांची नियुक्ती होणार आहे. विद्यमान सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या निवृत्तीनंतर गवई सरन्यायाधीश पदाची सुत्रे स्वीकारणार आहेत. १४ मे रोजी राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु त्यांना सरन्यायाधीशपदाची शपथ देणार आहेत. न्यायाधीश भूषण गवई हे नागपूरचे आहेत. (Bhushan Gavai)
गवई यांचा जन्म २४ नोव्हेंबर १९६० रोजी अमरावती येथे झाला. १६ मार्च १९८५ रोजी ते बारमध्ये रुजू झाले. १९८७ ते १९९० पर्यंत मुंबई उच्च न्यायालयात त्यांनी स्वतंत्रपणे वकिली केली. १९९० नंतर, मुख्यतः मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमोर त्यांनी वकिली केली. संवैधानिक कायदा आणि प्रशासकीय कायद्यात वकिली केली. नागपूर महानगरपालिका, अमरावती महानगरपालिका आणि अमरावती विद्यापीठाचे ते स्थायी वकील म्हणून त्यांनी काम केले. सिकॉम, डीसीव्हीएल इत्यादी विविध स्वायत्त संस्था आणि महामंडळे आणि विदर्भातील विविध नगरपरिषदांमध्ये नियमितपणे काम केले. (Bhushan Gavai)
गवई यांची ऑगस्ट १९९२ ते जुलै १९९३ पर्यंत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सहाय्यक सरकारी वकील आणि अतिरिक्त सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाली. १७ जानेवारी २००० रोजी नागपूर खंडपीठात सरकारी वकील म्हणून रुजू झाले. १४ नोव्हेंबर २००३ रोजी उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून त्यांना बढती मिळाली. १२ नोव्हेंबर २००५ रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे कायमस्वरूपी न्यायाधीश झाले. मुंबई येथील प्रमुख पदावर तसेच नागपूर, औरंगाबाद आणि पणजी येथील खंडपीठांवर सर्व प्रकारच्या नियुक्त्या असलेल्या खंडपीठांचे अध्यक्षपद भूषवले. २४ मे २०१९ रोजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून बढती झाली. गवई हे २३ नोव्हेंबर २०२५ रोजी निवृत्त होणार आहेत. (Bhushan Gavai)
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून शपथ घेतल्याने त्यांनी महत्वपूर्ण निर्णय दिले. शिक्षण संस्था स्थापन करण्याचा मुलभूत अधिकार आहे. मोदी आडनाव मानहानीप्रकरणी राहूल गांधी यांच्या शिक्षेला त्यांनी स्थगिती दिली होती. दिल्ली मद्य घोटाळाप्रकरणातील मनीष सिसोदिया यांना जामीन मंजूर केला. न्यायमूर्ती गवई यांनी उत्तर प्रदेशातील आरोपींच्या घरांवरील झालेल्या बुलडोझर कारवाईचा तीव्र शब्दात निषेध केला आणि कार्यकारी अधिकारी न्यायाधीश होऊ शकत नाही असे मत ही त्यांनी व्यक्त केले आहे. (Bhushan Gavai)
हेही वाचा :