Home » Blog » Blast in school: शिक्षिकेला धडा शिकवण्यासाठी उचलले भयंकर पाऊल

Blast in school: शिक्षिकेला धडा शिकवण्यासाठी उचलले भयंकर पाऊल

by प्रतिनिधी
0 comments
Blast in school

बिलासपूर (म.प्र.) : सतत रागावणाऱ्या शिक्षिकेला धडा शिकवण्यासाठी आठवीच्या विद्यार्थ्यांनी शाळेत भयंकर कृत्य केल्याची घटना उघडकीस आली. यामुळे शिक्षकांसह पालकही हादरून गेले आहेत. शिक्षिकेला धडा शिकवण्यासाठी ऑनलाइन सोडीयम मागवले. ते बाथरूममध्ये ठेवले. त्याचा स्फोट झाला. या घटनेत चौथीत शिकणारी मुलगी गंभीर जखमी झाली. स्तुति मिश्रा (वय वर्षे १०) असे या मुलीचे नाव आहे. सेंट विन्सेट पलोटी स्कूलमध्ये ही भयंकर घटना घडली.(Blast in school)

पोलिसांना घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल केले. काही विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले. आठवीतील दोन विद्यार्थी आणि तीन विद्यार्थिनींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली. त्यावेळी त्यांनी शिक्षिकेच्या त्रासाला कंटाळून हे कृत्य केल्याची कबुली दिली. या सर्वांविरोधात बालगुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. त्यांना बालन्यायालयासमोर दाखल केले असता या सर्वांची रवानगी बालसुधार गृहात करण्यात आली. (Blast in school)

शुक्रवारी सकाळी परीक्षेवेळी स्तुती बाथरूममध्ये गेली होती. त्यावेळी स्फोट झाला. त्यात ती गंभीररित्या भाजली गेली. तिला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. स्फोटाच्या भयंकर आवाजाने शाळेत प्रचंड घबराट पसरली. घटनेचे कारण समजताच दुसऱ्या दिवशी शाळेसमोर तीव्र निदर्शने करण्यात आली. तसेच दोषींवर कारवाईची मागणी करण्यात आली. (Blast in school)

पोलिसांनी चौकशी केली असता, संबंधित विद्यार्थांनी पाटणा येथून स्फोटक ऑनलाइन मागवली. त्रास देणाऱ्या शिक्षिका बाथरूम गेल्यानंतर स्फोट करण्याचा या विद्यार्थ्यांचा कट होता. मात्र या घटनेत चौथीतील विद्यार्थिनी जखमी झाली. शाळेच्या प्राचार्यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच विद्यार्थांची चौकशी करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. (Blast in school)

या आधीही घडला होता प्रकार

आंदोलकांनी शाळा प्रशासनावर बेजबाबदारपणाचा आरोप केला. या आधीही अशा घटना घडल्या आहेत. मात्र शाळा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. शाळेच्या सहलीवेळी एका विद्यार्थ्याच्या बाईकमध्ये बॉम्बसदृश वस्तू सापडली होती. मात्र शाळेने हे प्रकरण दाबून ठेवले. बाथरूममध्ये झालेल्या स्फोटाचे प्रकरणही दाबून ठेवण्याचा शाळा प्रशासनाचा प्रयत्न होता, असा आरोप आंदोलकांनी केला आहे.

दरम्यान, सर्व शक्यता गृहित धरून पोलीस तपास करत आहेत. विद्यार्थ्यांनी किती सोडीयम मागवले होते याची चौकशी करण्यात येत आहे.

हेही वाचा :

महाकुंभहून परतताना गोकाकचे सहा भाविक ठार

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00