Home » Blog » Belgaum accident : बेळगावच्या चार भाविकांवर घाला

Belgaum accident : बेळगावच्या चार भाविकांवर घाला

महाकुंभमेळ्याहून येताना इंदूरजवळ अपघात

by प्रतिनिधी
0 comments
belgaum accident

बेळगाव : प्रतिनिधी : प्रयागराज येथील महाकुंभमेळ्याहून परतताना बेळगावातील चौघांचा अपघातात मृत्यू झाला. या अपघातात इंदूरमधील दोघांचा समावेश आहे. शुक्रवारी सकाळी इंदूरजवळ ही दुर्घटना घडली. अपघाताचे वृत्त समजताच पुन्हा एकदा बेळगाव शहरावर शोककळा पसरली.(Belgaum accident)

सागर आणि नीतू या दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांत बेळगाव येथील तीन  महिला आणि एक पुरुष आहेत. हे चौघेही गणेशपूर, शिवाजीनगर, होसुर आणि वडगाव भागातील आहेत. त्यांची पूर्ण नावे समजू शकली नाहीत. (Belgaum accident)

प्रयागराज येथील कुंभमेळ्यात सहभागी होऊन बेळगावचे भाविक गुरुवारी आपल्या ट्रॅव्हलर वाहनाने बेळगावला परत येण्यासाठी निघाले होते.

त्यावेळी मध्यप्रदेशातील इंदूर जिल्ह्यामधील मानपूर येथील भेरू घाट येथे उतारावर एका दुचाकीला ठोकरल्यानंतर नियंत्रण सुटलेल्या ट्रॅव्हलरने (क्र. डीडी ०१ एक्स ९८८९) पुढे रस्त्याकडेला थांबलेल्या टँकरला (एमपी ०८ एचजी ८०२४)ला जोरदार धडक दिली. त्यात हा भीषण अपघात घडला.

अपघाताची माहिती मिळताच मानपूर पोलीस ठाण्याच्या पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मदतकार्य सुरू केले.

हेही वाचा :

केजरीवाल यांच्या निवासस्थानी ‘एसीबी’चे पथक

महाराष्ट्राच्या लोकसंख्येपेक्षा मतदार संख्या अधिक

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00