कोल्हापूर : प्रतिनिधी : बालगोपाल तालीम मंडळाने संध्यामठ तरुण मंडळावर २-० अशा फरकाने विजय मिळवला. तर हंगामात पहिल्या विजयाची नोंद करताना उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळाने वर्षा विश्वास स्पोर्टस् वर २-१ अशा फरकाने मात केली. कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशन आयोजित केएसए अ गट फुटबॉल स्पर्धा शाहू स्टेडियमवर खेळवली जात आहे. (Balgopal Victory)
बालगोपाल संघ मोठ्या गोलफरकाने विजय मिळवेल, असे वाटत असताना संध्यामठ तरुण मंडळाने मध्यंत्तरापर्यंत त्यांना गोलशून्य बरोबरीत रोखले. उत्तरार्धात रोहित कुरणेच्या पासवर रोमेन सिंगने गोल करत बालगोपालच्या पहिल्या गोलची नोंद केली. ७६ व्या मिनिटाला सागर पोवारने बालगोपालचा दुसरा गोल केला. दोन गोलची आघाडी कायम टिकवत बालगोपालने सामना जिंकून तीन गुणांची कमाई केली. बालगोपालकडून सागर पोवार, सिद्धार्थ पाटील, ऋतुराज पाटील, रोहित कुरणे, रोमेन सिंग, लियॉन, प्रथमेश जाधव तर संध्यामठकडून दिग्विजय बसर्गे, आशिष पाटील, इलायस शर्मा, कपिल शिंदे यांचा चांगला खेळ झाला. (Balgopal Victory)
दुपारच्या सत्रात पहिल्या सामन्यात उत्तरेश्वर आणि वर्षा विश्वास यांच्यातील सामन्यात पूर्वार्धात ३४ व्या मिनिटाला सोहम निकमने गोल करत वर्षा विश्वासला आघाडी मिळवून दिली. पण आघाडीचे समाधान फार काळ टिकले नाही. पुढच्याच मिनिटाला स्वराज्य पाटीलने गोल करत उत्तरेश्वरला १-१ अशी आघाडी मिळवून दिली. हीच स्थिती मध्यंतरास कायम राहिली. उत्तरार्धात तुषार पुनाळकरने गोल करत उत्तरेश्वरला आघाडी मिळवून दिली. हीच आघाडी कायम टिकवत उत्तरेश्वरने हंगामातील पहिल्या विजयाची नोंद केली.
- शनिवारचे सामने
- फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ वि. उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळ : दुपारी २.०० वा.
- शिवाजी तरुण मंडळ वि. बालगोपाल तालीम मंडळ : दुपारी ४.०० वा.
हेही वाचा :
…अन्यथा खेळाडूंना ‘आयपीएल’बंदी
जोकोविच, झ्वेरेव, सबालेंकाची आगेकूच