Home » Blog » महाराष्ट्रात हरियाणा इफेक्ट?

महाराष्ट्रात हरियाणा इफेक्ट?

Assembly Election : महाविकास आघाडीमध्ये अस्वस्थता

by प्रतिनिधी
0 comments
Maharashtra Government file photo

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे पडसाद आता महाराष्ट्रात उमटू लागले आहेत. आगामी विधानसभेच्या पाश्वभूमीवर ठाकरेंच्या पक्षाचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’मधून,राज्यातील नेत्यांचे कान टोचण्याचा प्रयत्न केला गेला आहे. खासदार तसेच प्रवक्ते संजय राऊत यांनी काँग्रेसला देशभरात स्वबळावर लढायचं असेल तर तसं जाहीर करावं असं म्हटलं आहे. परिणामी, विधानसभा निवडणुकीआधी महाविकास आघाडीमध्ये अस्वस्थता वाढू लागली आहे. (Assembly Election)

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी, संजय राऊत बैठकीत आहेत तर बैठकीमध्ये त्यांना विचारतो की त्यांनी अग्रलेख मुद्दाम हून लिहिला की त्यांनी वस्तुस्थिती मांडली. मात्र ही महाराष्ट्राची वस्तुस्थिती नाही,असं पटोले म्हणाले. अशाप्रकारे अग्रलेखातून किंवा प्रतिक्रिया देऊन जाहीरपणे आघाडीमध्ये अशाप्रकारे बोलणं योग्य नाही, असंही पटोले म्हणाले. तसेच आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच पुढे जाणार आहोत. कोणी मोठा भाऊ कोणी छोटा भाऊ नाही. आमच्यात काही वाद नाही. संजय राऊत यांच्याबरोबर आम्ही चर्चा करू. कुणाचा चेहरा द्यायचा हे बैठकीत आम्ही चर्चा करू.

संजय राऊतांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना, हरियाणाचा निकाल बदलता आला असता. इंडिया आघाडीत निवडणुकीला समोरे गेलो असतो तर नक्कीच बदल दिसला असता.महाराष्ट्रात उद्धव ठाकरे, शरद पवार आहेत हे एकनाथ शिंदेंनी विसरता कामा नये. जे हरियाणात घडलं आहे ते तिथपर्यंतच राहाणार. महाराष्ट्रात त्याचा परिणाम दिसून येणार नाही. इथे तुम्ही काहीही केलं तरी जिंकणार नाही. इथे आमची आघाडी आहे. आम्ही एकत्र आहोत. आम्ही एकत्र राहून निवडणूक लढणार आणि जिंकणार,” असंही राऊत म्हणाले.

हेही वाचा :

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00