चेन्नई : कॉमेडियन कुणाल कामरांनी बुधवारी (२ एप्रिल) चाहत्यांची माफी मागितली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध कथित टीका केल्याबद्दल कॉमेडीयन कामरांच्या शोमध्ये सहभागी झालेल्या अनेक प्रेक्षकांना पोलिसांकडून नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. त्यातील एका बँकरला साक्षीदार म्हणून बोलावण्यात आले होते, असे पोलिसांनी सांगितले.(Apology to fans)
स्टँड-अप शो “नया भारत” दरम्यान त्यांनी केलेल्या कथित ‘देशद्रोही’ टिप्पणीबद्दल कामरा यांच्यावर अनेक एफआयआर दाखल आहेत. कारण त्यांच्या वादग्रस्त व्हिडीओनंतर प्रचंड राजकीय गदारोळ उडाला होता.
“माझ्या शोमध्ये उपस्थित राहिल्याने तुम्हाला झालेल्या गैरसोयीबद्दल मी मनापासून दिलगीर आहे,” असे कामरा यांनी ‘एक्स’ वर म्हटले आहे. त्यांनी एका बातमीचे वृत्त शेअर केले. पोलिसांनी नोटीस बजावल्यानंतर शोमध्ये उपस्थित असलेल्या नवी मुंबईतील एका बँकरला त्यांचा प्रवास अर्धवट सोडून पोलिसांसमोर जावे लागले, असे कामरा यांनी म्हटले आहे. (Apology to fans)
“कृपया मला ईमेल करा जेणेकरून मी तुमची पुढची सुट्टी भारतात कुठेही शेड्यूल करू शकेन,” असे त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, कार्यक्रमात उपस्थित असलेल्या प्रेक्षकांना त्यांचे जबाब नोंदवण्यासाठी बोलावण्यात आल्याच्या वृत्ताचे पोलिसांनी खंडन केले आहे.
कुणाल कामरा यांनी गेल्याच आठवड्यात मुंबईतील एका स्टुडिओमध्ये झालेल्या शोचा व्हिडीओ युट्युबवर शेअर केला आहे. कामरा यांची
प्रस्थापितांविरुद्ध लढा देणारा कलाकार अशी ओळख आहे. या ४५ मिनिटांपेक्षा जास्त कालावधीच्या व्हिडिओबद्दल त्यांनी माफी मागण्यास नकार दिला आहे. या व्हिडीओला युट्यूबवर १.२ कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. (Apology to fans)
मुंबई पोलिसांनी कामरा यांना तिसरे समन्स बजावले आहे. त्यांना ५ एप्रिल रोजी हजर राहण्यास सांगितले आहे.
मंगळवारी बजावलेल्या समन्समध्ये कामरा यांना खार पोलिस स्टेशनमध्ये हजर राहण्यास सांगण्यात आले जिथे गेल्या महिन्यात त्यांच्याविरुद्ध प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी त्यांना यापूर्वी दोनदा समन्स बजावले होते परंतु ते तपासात सहभागी झाले नाहीत.
मुंबईत जन्मलेला आणि वाढलेला हा कलाकार सध्या तामिळनाडूमध्ये राहतो. मुंबई पोलिसांनी त्यांना बजावलेल्या नोटिसीविरोधात कामरा यांनी मद्रास उच्च न्यायालयात दाद मागितली. उच्च न्यायालयाने दिलासा देत त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.