Home » Blog » आमच्यातील मतभेदाला पूर्णविराम : प्रकाश आवाडे

आमच्यातील मतभेदाला पूर्णविराम : प्रकाश आवाडे

Ichalkaranji : मला लढायला सांगितले आहे म्हणून मी लढतोय : राहुल आवाडे

by प्रतिनिधी
0 comments
Ichalkaranji

कोल्हापूर; प्रतिनिधी : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप पक्ष आणि आम्ही ताराराणी पक्ष आता भाजप म्हणून एकत्र सामोरे जात आहोत. त्यामुळे महायुतीचे उमेदवार म्हणून राहुल आवाडे चांगल्या मताधिक्याने निवडून येतील. माजी आमदार सुरेश हाळवणकर आणि आम्ही कार्यकर्त्यांचे मनोमिलन व्हावे, यासाठी चर्चा करून निर्णय घेऊ. जिल्ह्यात भाजप अतिशय ताकदीने लढेल आणि जिंकेलही, असा विश्वास आमदार प्रकाश आवाडे यांनी व्यक्त केला. ते इचलकरंजी येथे बोलत होते.  (Ichalkaranji)

चहापानासाठी बावनकुळे आवाडेंच्या घरी

इचलकरंजीतून महायुतीकडून राहुल आवाडे यांची उमेदवारी निश्चित झाल्यानंतर महिन्याभरापासून इचलकरंजी मतदारसंघात सुरेश हाळवणकर गटातील आणि निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांची नाराजी आणि खदखद बाहेर पडत होती. यामुळे भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येऊ लागला होता. हे डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज इचलकरंजी येथे भाजपच्या मेळाव्यास उपस्थिती लावली. मात्र या मेळाव्यास आवाडे पितापुत्रांना निमंत्रितच करण्यात आले नव्हते. त्याबाबत  माध्यमांनी बावनकुळे यांना विचारले असता, त्यांनी आवाडे यांच्या घरी चहापानाचा नियोजित कार्यक्रम असल्याचे सांगितले. कार्यक्रमानंतर आमदार प्रकाश आवाडे यांच्या घरी उपस्थितीही लावली. यावेळी त्यांच्यासोबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार धनंजय महाडिक उपस्थित होते. तथापि माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी येथे येणे टाळले.

कार्यकर्त्यांचे मनोमिलन होईल

दरम्यान भेटीनंतर माध्यमांशी बोलताना आमदार प्रकाश आवाडे यांनी सर्व काही आलबेल असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आम्ही भाजप म्हणून एकत्र सामोरे जात आहोत. महायुतीचे उमेदवार म्हणून राहुल आवाडे चांगल्या मताधिक्याने निवडून येतील. माजी आमदार सुरेश हाळवणकर आणि आम्ही कार्यकर्त्यांचे मनोमिलन करण्यासाठी चर्चा करून निर्णय घेऊ. या निवडणुकीची रणनीती आणि पक्षप्रवेश ठरवणार आहोत. आमच्यातील मतभेदाला पूर्णविराम मिळाला आहे. आम्ही एकत्र काम करणार आहोत हे महत्त्वाचे आहे. कार्यकर्त्यांचे मनोमिलन शंभर टक्के होणार आणि भाजप म्हणून काम करणार आहोत. तसेच जिल्ह्यातही भाजप अतिशय ताकदीने लढेल आणि जिंकेल, असा विश्वाही आ. प्रकाश आवाडे यांनी व्यक्त केला. (Ichalkaranji)

लाँच केले असे म्हणणे चुकीचे

एकेकाळी वेगवेगळ्या व्यासपीठावरून आम्ही समाजकारण आणि राजकारण करत होतो. आता देशाला आणि नरेंद्र मोदी यांना ताकद देण्यासाठी राज्यात महायुतीचे सरकार येणे गरजेचे आहे. यामुळे सर्वजण एका व्यासपीठावर एका विचाराने आलो आहोत. जे काही समज गैरसमज असतील ते एकत्र बसून सोडवू आणि कामाला लागू, अस सांगत राहुल आवाडे म्हणाले, आम्ही केवळ या निवडणुकी पुरते एकत्र आलेलो नाही तर यापुढील सर्व निवडणुकांसाठी आम्ही एकत्र काम करू.

दरम्यान, सुरेश हळवणकर यांनी मेळाव्यात बोलताना आमदार प्रकाश आवाडे यांनी आपल्या लाडक्या मुलाला लाँच करत असल्याची टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना राहुल आवाडे म्हणाले, मला लाँच केले असे म्हणणे चुकीचे आहे. वयाच्या २० व्या वर्षांपासून काम करत आहे. पक्षाला माझी गरज होती तेव्हा जिद्दीने मी कामाला लागलो. ज्यावेळी पक्षाने आणि माझ्या नेत्यांनी थांबायला सांगितले त्यावेळी मी थांबलेलो आहे. आज मला लढायला सांगितले आहे म्हणून मी लढत आहे, असे राहुल आवाडे यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा :

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00