प्रयागराज : मौनी अमावस्येच्या मुहूर्तावरील अमृत स्नान बुधवारी (दि. २९ जानेवारी) दुपारनंतर पूर्ववत सुरू झाले. स्नानासाठी त्रिवेणी संगमाकडे जाताना संत-महंतांवर हेलिकॉप्टरने फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करण्यात आला.(amrit snan)
मौनी अमावस्येच्या मुहूर्तावर मंगळवारी मध्यरात्री सुरू झालेल्या स्नानावेळी प्रचंड गर्दी झाली. चेंगराचेंगरी झाली. त्यात किमान २० जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर काही काळ स्नान थांबवण्यात आले. दुपारनंतर सर्व आखाड्यांची बैठक झाली. त्यानंतर संत-महंतांनी स्नान करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्रिवेणी संगम येथे विविध आखाड्यांचे संत कमी संख्येने आले. (amrit snan)
एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना, पंचायती निरंजनी आखाड्याचे दिगंबर नागा बाबा चिदानंद पुरी यांनी या वर्षी आखाड्यांनी घेतलेल्या सावध भूमिकेवर भूमिका व्यक्त केली. ‘आजच्या एका अनपेक्षित घटनेमुळे आमची (आखाड्याची) शोभा यात्रा काढता आली नाही. आम्ही आता थोड्या संख्येने पवित्र स्नान करण्यासाठी येत आहोत,’ असे ते म्हणाले. (amrit snan)
अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत रवींद्र पुरी यांनीही, संत स्नानानंतर लवकरात लवकर घाट रिकामा करण्यात येईल.
‘आम्ही अमृतस्नानासाठी जात आहोत आणि हजारो संत आणि नागा माझ्यासोबत येत आहेत… आम्ही घाट लवकर रिकामे करू जेणेकरून येथे आलेले सर्व भाविक पवित्र स्नान करू शकतील,’ असे त्यांनी एएनआयला सांगितले.
जुना आखाड्याचे हरिगिरी महाराज संगम येथे अमृतस्नान करण्यापूर्वी म्हणाले, ‘आम्ही इतर आखाड्यांसोबत बैठक घेतली. राहूकाल संपल्यानंतरच स्नान सुरू होईल, असे निश्चित करण्यात आली.’
हेही वाचा :
महाकुंभमेळ्यात चेंगराचेंगरी, २० भाविकांचा मृत्यू
कुंभमेळ्याचा ४५ कोटी भाविकांचा आकडा कुठून आला?
राष्ट्रपती, पंतप्रधान कुंभमेळ्यासाठी येणार