मुंबई : विशेष प्रतिनिधी : मुंबई पोलिस विभागातील मोठ्या अधिकाऱ्यांच्या मदतीने मोठ्या प्रमाणात बेटिंग सुरू असल्याचा गंभीर आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मंगळवारी (२५ मार्च) सभागृहात केला. मेहुल जैन, कमलेश जैन आणि हिरेन जैन या व्यक्तींचा त्यामध्ये समावेश आहे. त्यांच्याकडून पाकिस्तानी खेळाडूंचा यासाठी वापर केला जात असल्याचा आरोप करीत त्या कथित संभाषणाचा पेनड्राइव्ह सभापतींकडे सादर केला.(Ambadas Danve)
अंतिम आठवडा प्रस्तावावरील भाषणात दानवे म्हणाले की, बेटिंग करणाऱ्यांमध्ये गंभीर आरोपही विरोधी पक्षनेत्यांनी केला आहे. नुकत्याच पार पडलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये ‘लोटस २४’ नावाच्या ॲपच्या माध्यमातून बेटिंग केल्यानंतर आता या सर्व व्यक्ती मुंबईत आयपीएलसाठी आल्या आहेत. याची त्वरित सखोल चौकशी होण्याची गरज आहे.
राज्याच्या परिवहन, सिडको, महसूल, आरोग्य विभागातील घोटाळे, मंत्र्यावर असलेले भ्रष्टाचाराचे आरोप, अधिकाऱ्यांचे घोटाळे सादर करत विधानपरिषदेचे अंबादास दानवे यांनी सरकारचे वाभाढे काढले. (Ambadas Danve)
राज्याने गेल्या दोन वर्षांपासून क्राईम इन महाराष्ट्र अहवाल प्रसिध्द केलेला नाही. राज्यात ५६४ विविध गुन्हे दाखल झाले असून दंगलीच्या घटना घडल्या आहेत. नागपुर, पुणे,संभाजीनगरमध्ये बलात्कराच्या घटनांचा आलेख वाढला असून दररोज २२ बलात्कार, ४५ विनयभंगाच्या घटना घडत आहेत. कायद्याचा धाक नसल्यामुळे या सर्व घटना घडत असल्याचे सांगून ते म्हणाले,कारागृहाची बंदीची क्षमता २७ हजार ११४ बंदी असताना ४३ हजार बंदी कोंबून ठेवले आहेत. राज्यात ५१ हजार कोटी रुपयांची फसवणूकीच्या घटना घडल्या आहेत. राज्यात गुन्हयांच व सायबर गुन्ह्याच प्रमाण वाढल असून ते रोखण्यासाठी सायबर सेल प्रभावी होण्याची आवश्यकता आहे. (Ambadas Danve)
अभिनेता सैफ अली खान यांच्या घरात घुसून चोरी करून त्याला मारण्याचा प्रयत्न झाला. बीड मस्साजोग सरपंच हत्येतील आरोपी अद्याप पकडला जात नाही. सोमनाथ सुर्यवंशी याचा मृत्यू मानव आयोगाच्या अहवालात पोलिसांनी केलेल्या मारहाणीत झाल्याचे स्पष्ट झाले. माजी मंत्र्यांचा परदेशात चाललेल्या मुलाच विमान वळवले जाते परंतु सूर्यवंशीला मारहाण करणाऱ्या लोकांवर सरकार कारवाई करू शकत नाही.केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेडछाड काढली जात असेल तर सर्वसामान्य मुलीची काय स्थिती असेल? असा सवालही दानवे यांनी उपस्थित केला.
जालनामधील भोकरदन येथे बोऱ्हाडे नावाच्या व्यक्तीला चटके दिले, त्या घटनेत नवनाथ दौंड या तालुकाप्रमुखांवर खोटा गुन्हा दाखल केला गेला.
अहमदाबादमधील सुधीर कोठडिया नावाच्या व्यक्तीने 2 हजार कोटी रुपये डिजिटल पध्दतीने जमवून हवाला मार्फत ते विदेशात पाठवले. यातील गुंतवणूकदारांची फसवणूक केली, याबाबत पराग अशोककुमार शहा यांनी तक्रार केली. मात्र याबाबत पुणे कि नारायण गावात गुन्हा दाखल व्हायला होता
मात्र ठाण्यात पोलीस उपायुक्तांच्या सांगण्यावरून पोलीस आयुक्त गुन्हा दाखल करतात. याप्रकरणाची चौकशी करण्याची मागणी दानवे यांनी केली. (Ambadas Danave) मंत्री संजय राठोड यांचे खासगी सचिव विशाल राठोड यांनी स्वत:च्या सहीने गो बंजारा ट्रस्टची जागा मंत्र्याच्या नावे करून घेतली. उल्हास नगर महानगरपालिकेत युडीच उल्लंघन करून टीडीआर घोटाळा झाला आहे. यात ललित खोब्रागडे नावाच्या अधिकाऱ्याने युडीसिपीआर उल्लंघन केल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. अंधेरी, के पश्चिम विभागातील चक्रपाणी नावाचे उपायुक्तांच्या वरदहस्ताने अवैध बांधकाम सुरु आहे. बोरिवली येथील पालिकेचे भगवती हॉस्पिटलचे खासगीकरण करण्याचा प्रयत्न महापालिका करत असल्याचा आरोपही अंबादास दानवे यांनी केला.
हेही वाचा :
कोरटकरला तीन दिवसाची पोलिस कोठडी
न्या. वर्मांच्या निवासस्थानी चौकशी