Home » Blog » Ambadas danave: बीडच्या ‘त्या’ संस्थाचालकावर गुन्हा दाखल होणार

Ambadas danave: बीडच्या ‘त्या’ संस्थाचालकावर गुन्हा दाखल होणार

विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंच्या प्रश्नाला उत्तर

by प्रतिनिधी
0 comments
Ambadas danave

मुंबई : बीड जिल्ह्याचा मुद्दा यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात चांगलाच गाजतो आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराडला अटक होईपर्यंत भाजपचे आमदार सुरेश धस यांनी मुद्दा चांगलाच लावून धरला. पाठोपाठ मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. त्यानंतर अर्थसंकल्प सादर होण्याची आधी मंत्री मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला. आता बीडच्याच आश्रमशाळेतील शिक्षकाच्या आत्महत्येचे प्रकरण सभागृहात चर्चेला आले. (Ambadas danave)

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी हा मुद्दा उपस्थित केला. विधानपरिषदेत यांनी शिक्षक धनंजय नागरगोजे यांनी फेसबुकवर पोस्ट लिहून आत्महत्या केल्याची घटना धक्कादायक असल्याचे विधानपरिषदेत बोलताना लक्षात आणून दिले. तसेच या प्रकरणात अद्यापही संस्थाचालकांवर गुन्हा का दाखल नाही, असा सवाल दानवे यांनी विचारला.

शिवसेना आमदार अनिल परब यांनीही हा मुद्दा उपस्थित केला. तसेच तत्काळ संस्थाचालकावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी सभागृहात केली. त्यानंतर, याप्रकरणी सखोल चौकशी करून गुन्हा दाखल होईल, असे उत्तर गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिले. (Ambadas danave)

आश्रमशाळेत नोकरी करणाऱ्या नागरगोजे यांना १८ वर्षांपासून पगारच मिळालेला नाही. शिवाय पगाराची विचारणा केल्यानंतर संस्थाचालकाने तू फाशी घे… असा सल्ला दिला. नागरगोजे यांनी फेसबुक पोस्ट करत फाशी घेतली. त्यात त्यांनी संस्थाचालकाचे नाव घेतले आहे. या घटनेनंतर विक्रम मुंडे, विजय मुंडे, अतुल मुंडे हे शिक्षण संस्थाचालक आहेत. आत्महत्या केलेल्या शिक्षकाची ३ वर्षांची मुलगी आहे. अजूनही संस्थाचालकावर गुन्हा दाखल नाही. अद्याप संस्थाचालकावर गुन्हा दाखल का केला नाही? असा सवाल दानवे यांनी केला. तसेच, पोलिसांनी सु मोटो गुन्हा दाखल करून घ्यायला हवा, अशी मागणीही त्यांनी केली. (Ambadas danave)

मूळ प्रकरण का?
धनंजय नागरगोजे बीडच्या केळगाव येथील आश्रमशाळेत शिक्षक होते. गेल्या १८ वर्षापासून ते काम करत होते. मात्र, त्यांना पगार मिळालेला नव्हता. आर्थिक परिस्थिती खालावत गेली. अखेर धनंजय याने बीडमधील कृष्णा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेजवळ गळफास घेतला आणि जीवन संपवले. त्याआधी त्यांनी फेसबुक पोस्ट केली. चिमुकल्या मुलीची माफीही मागितली. ही फेसबुक पोस्ट सविस्तरपणे त्याने लिहिले होती.

हेही वाचा :
औरंगजेबाचे महिमामंडन करणाऱ्यांवर कठोर कारवाई
लाडकी बहीण योजना बंद करणार नाही, पण

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00