आजरा : रात्रीच्या सुमारास आजरा तालुक्यातील मसोली येथे चोरट्यांचा धुमाकूळ सुरू असताना ८५ वर्षीय यशोदा चंद्रु पोवार या आजीबाईने चोरट्यांना पळवून लावत आपल्या लेकाचे तब्बल १५ तोळे सोने चोरट्यांपासून वाचवले. याबद्दल यशोदाआजीचे मसोली पंचक्रोशीसह पोलिसांतही कौतुक होत आहे. ajara theft
आजीची मुले संभाजी आणि तानाजी पोवार हे दोघेही घरामध्ये नव्हते. आई यशोदा ही एकटीच घरी होती. रात्री दोनच्या सुमारास चोरटे पोवार यांच्या घरातील मौल्यवान वस्तूंचा शोध घेत असताना याच घरातून संभाजी पोवार यांच्या घरी जाण्यासाठी असणारा मधला दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. दरवाजाला टेकून ठेवलेली लाकडी फळी खाली पडली. फळी पडल्याने जमीन हादरली. या हादऱ्याने मुळात कमी ऐकू येणाऱ्या यशोदा आजीला जाग आली. ajara theft
काही दिवस गावात चोरीचे सत्र सुरू असल्याने आजीला आपल्याही घरी चोरी होत असल्याची कल्पना आली. यशोदाआजी जागी झाल्याची शंका चोरट्यांना येताच चोरट्यांनी लांबूनच चाकूचा धाक दाखवण्याचा प्रयत्न केला. आजीने चोरट्यांना न जुमानता थेट मुख्य दरवाज्याच्या दिशेने धाव घेत आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. आजीचा हा गोंधळ ऐकून शेजारी जागे झाले. तातडीने त्यांनी पोवार कुटुंबीयांच्या घराकडे धाव घेतली. चोरट्यांना यांचा सुगावा लागताच त्यांनी पळ काढला. ajara theft
या दरम्यान, हातात लागलेली दीड किलो चांदी घेऊन चोरटे पळून गेले. पण सुदैवाने या गोंधळामुळे घरातील तब्बल १५ तोळे सोने नेण्यात मात्र त्यांना अपयश आले. यशोदाआजीने प्रसंगावधान दाखवून केलेल्या प्रयत्नांचे आणि सुमारे बारा तेरा लाख रुपये किमतीचे सोने वाचविण्याच्या धाडसी कामगिरीचे म्हणूनच सर्वत्र कौतुक होत आहे.
हेही वाचा :
मंत्र्यांच्या तंबीमुळे चंदन तस्कराला अटक न करताच कोल्हापूरचे पोलिस माघारी