Home » Blog » संविधान शिल्पाची विटंबना करणाऱ्या आरोपीची आत्महत्या

संविधान शिल्पाची विटंबना करणाऱ्या आरोपीची आत्महत्या

by प्रतिनिधी
0 comments
Accused commits suicide in Parbhani

परभणी : परभणीतील संविधान शिल्पाची विटंबना करणाऱ्या प्रकरणातील प्रमुख आरोपी दत्ता सोपान पवार याने आत्महत्या केली. १३ महिने तुरुंगात राहिल्यानंतर चार दिवसापूर्वीच त्याची जामिनावर मुक्तता झाली होती. (Accused commits suicide in Parbhani)

मिर्झापूर गावातील स्वत:च्या शेतातील खोलीत दत्ता पवार मृतावस्थेत आढळून आले. त्यांनी दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. १० डिसेंबर २०२४ रोजी परभणी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान शिल्पाची तोडफोड करण्यात आली होती. या घटनेचे राज्यभर पडसाद उमटले होते. या प्रकरणी पोलिसांनी दत्ता पवार याला अटक केली होती. त्याला जामिनी मिळाला नसल्याने १३ महिने तो न्यायालयीन कोठडीत होता. चार दिवसापूर्वी त्याला जामिन मिळाला. जामिन मिळाल्यानंतर दत्ता पवार पुन्हा आयुष्य सुरू करतील अशी अपेक्षा असताना त्यांना स्वत:च्या शेतातील घरात आत्महत्या केल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहे. दत्ता पवारांची पत्नी आणि दोन मुले पुणे येथे वास्तव्यास आहेत. (Accused commits suicide in Parbhani)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00