नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आम आदमी पक्षाचे (आप) संयोजक अरविंद केजरीवाल महागाई कमी करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे नेते, खासदार राहुल गांधी यांनी सोमवारी केला. या दोघांवर त्यांनी जोरदार निशाणा साधला. (Rahul Slams Modi)
दिल्लीच्या सीलमपूर भागात ‘जय बापू, जय भीम, जय संविधान रॅली’त ते बोलत होते.
‘महागाई शिगेला पोहोचली आहे. गरीब लोक अधिक गरीब आणि श्रीमंत लोक अधिक श्रीमंत होत आहेत. अंबानी आणि अदानी पंतप्रधान मोदींचे मार्केटिंग करतात. तुम्ही मोदी, अरविंद केजरीवाल यांना अदानीबद्दल काही बोलताना पाहिले आहे का? … आम्हाला असला अब्जाधीशांचा देश नको आहे,’ असे ते म्हणाले.(Rahul Slams Modi)
पंतप्रधान मोदी, भाजप आणि आरएसएस दररोज डॉ. आंबेडकरांच्या संविधानावर हल्ला करतात, समाजा-समाजात द्वेष पसरवत आहेत. केवळ प्रेमानेच देशात द्वेषाचा पराभव होईल, असे सांगून राहुल गांधी यांनी संविधान वाचवण्यासाठी आम्ही कन्याकुमारी ते काश्मीर असा ४००० किलोमीटरचा प्रवास केला,’ अशी आठवण सांगितली. (Rahul Slams Modi)
मला असा भारत नको आहे जिथे अब्जाधीशांना काहीही करण्याची मुभा असेल. अंबानी आणि अदानीसारख्या लोकांनी संपूर्ण देश विकत घेतला आहे आणि सर्व व्यवसाय नियंत्रित केले आहेत, असा आरोपही राहुल गांधी यांनी केला.
राहुल गांधी यांनी आपचे निमंत्रक केजरीवाल यांच्यावरही जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले, ‘केजरीवाल यांनी स्वच्छ दिल्लीचा प्रचार केला, दिल्लीला पॅरिस बनवण्याचे, भ्रष्टाचार नष्ट करण्याचे आश्वासन दिले, परंतु तसे काहीच झाले नाही. उलट प्रदूषण आणि महागाई वाढली.’
हेही वाचा :
काँग्रेसचे ‘संविधान वाचवा’ अभियान
रशियाकडून लढणाऱ्या केरळच्या तरुणाचा मृत्यू