मुंबई; विशेष प्रतिनिधी : परभणी व बीडमधील घटनांवर सर्व स्तरातून कारवाईची मागणी केली जात असताना महायुती सरकार मात्र गंभीर नाही. सरकार कारवाईची भाषा करत असले तरी सरकार वस्तुस्थिती मान्य करायला तयार नाही, त्यामुळे चौकशीतून उत्तर काय मिळणार हे माहित आहे, असे सांगून बीड व परभणी हत्या प्रकरण दाबण्याचा मुख्यमंत्र्यांकडून प्रयत्न होत असल्याचे आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. (Nana Patole)
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या दोन दिवसांच्या नव सत्याग्रह कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पटोले बेळगावात प्रसार माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले की, परभणीत आंबेडकरी विचाराच्या सुशिक्षित तरुणाचा पोलीस मारहाणीत झालेला मृत्यू हा पोलीसांनी केलेली हत्याच आहे. बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांची निघृण हत्या केली, या दोन्ही घटनांवर जनतेने व सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी वस्तुस्थिती मांडली आहे. पण, भाजपा युती सरकार मान्य करत नाही, हे सरकार प्रायोजित असल्याने सीआयडी चौकशी केली तरी त्यातून काही निष्पन्न होणार नाही.
देशात हुकूमशाही सुरु असून या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बेळगावात होत असलेले अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे दोन दिवसांचे विशेष अधिवेशन हे काँग्रेस पक्षासाठी तसेच देशवासीयांसाठी अत्यंत महत्वाचे आहे, असेही त्यांनी सांगितले. (Nana Patole)
हेही वाचा :
- हरपवडे ग्रामस्थांना त्रासदायक ठरलेले वानर अखेर पिंजऱ्यात बंद
- या लोकांचे अपराध भरले; या ‘आका’ला अटक करावी
- सर्व विभागांनी १०० दिवसांच्या आराखड्यातून ठोस कामगिरी करावी