कोल्हापूर; प्रतिनिधी : अण्णा मोगणे सहारा स्पोर्टस् अकॅडमीने मालती पाटील क्रिकेट अकॅडमीचा एक डाव ६१ धावांनी पराभव करत मुरलीधर सोमाणी चषक १९ वयोगट क्रिकेट स्पर्धा जिंकली. कर्णधार अभिषेक आंब्रे आणि रोहित गिरीने अष्टपैलू कामगिरी केली. अभिषेकने १२६ धावा आणि सहा बळी तर रोहितने ११३ धावा आणि सात बळी मिळवले. जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजीत ही स्पर्धा टेक्नोमेट एंटरप्रायझेसने पुरस्कृत केली होती.
राजाराम महाविदयालयाच्या मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यात मालती पाटील क्रिकेट अकॅडमीने पहिल्या डावात १४५ धावा केल्या. ईशान देवणे आणि पृथ्वीराज निंबाळकरने प्रत्येकी ३४ धावा केल्या. श्रीशांत गवळीने २१ धावा केल्या. अण्णा मोगने कडून अभिषेक आंब्रेने पाच गडी बाद केले. सुदर्शन कुंभारने तीन तर रोहित गिरीने दोन बळी मिळवले.
अण्णा मोगणेने पहिल्या डावात ३९६ धावा केल्या. अभिषेक आंब्रेने शतक झळकावत १२६ तर रोहित गिरीने ११३ धावा केल्या. अथर्व शेळकेने ४२, सुदर्शन कुंभारने ४० तर विकास रजपूतने २२ धावा केल्या. मालती पाटीलकडून सुयश साळुंखेने पाच गडी बाद कले. ईशान देवणे आणि पृथ्वीराज निंबाळकरने प्रत्येकी दोन बळी घेतले.
मालती पाटील संघाचा दुसरा डाव १९० धावात आटोपला. ईशान देवणेने ४६, अर्जुन घोरपडेने ४१, पृथ्वीराज निंबाळकरने २७, सुशय साळुंखेने २२ धावा केल्या. रोहित गिरीने पाच गडी बाद केले तर अभिषेक आंब्रे, निरंजन कुंभार, हर्षवर्धन साळुंखेने प्रत्येकी एक गडी बाद केला. अण्णा मोगणे सहारा अकॅडमीने हा सामना एक डाव ६१ धावांनी जिंकला.
विजयी संघ : अभिषेक आंब्रे (कर्णधार), अखिलेश अब्दागीरे, अखिलेश महाडीक, अथर्व शेळके, हर्षवर्धन साळोखे, निकीत नागदेव, निरंजन पाटील, रोहीत गिरी, संस्कार पाटील, सुदर्शन कुंभार, विकास रजपुत, मयांक राठोड, विरेन कोळी, प्रशिक्षक सुरज जाधव
हेही वाचा :
- फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री, अजितदादा सहाव्यांदा उपमुख्यमंत्री
- ३१ वर्षे तुरुंगवास आणि १५४ फटक्यांची शिक्षा, कोण आहेत नरगिस मोहम्मदी?
- जगभरातील १०० प्रभावशाली महिलांच्या यादीत तीन भारतीय