Home » Blog » महायुतीचा झेंडा, मविआचा सुफडासाफ

महायुतीचा झेंडा, मविआचा सुफडासाफ

महायुतीचा झेंडा, मविआचा सुफडासाफ

by प्रतिनिधी
0 comments
Mahayuti BJP

कोल्हापूर; प्रतिनिधी :  लोकसभा निवडणूकीतील पराभव विसरुन महायुतीने विधानसभा निवडणूकीत दोनशेहून अधिक जागांवर आघाडी घेऊन सत्तास्थापनेकडे आश्वासक वाटचाल केली आहे. महाविकास आघाडीला दारुण पराभवास सामोरे जावे लागत असून मतदानाचा कलात त्यांचा आकडा ५० च्या आसपास स्थिर आहे. भाजपने १२५ अधिक जागांवर आघाडी घेतल्याने भाजपचा मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट झाले असून केंद्रीय नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करणार की, सरप्राईज चेहरा देणार हे सायंकाळपर्यंत स्पष्ट होईल. (Mahayuti)

आज (दि.२३) सकाळी आठ वाजल्यापासून २८८ विधानसभा मतदारसंघात मतमोजणीस सुरुवात झाली. सुरुवातीपासून महाविकास आघाडीने पहिल्या टप्प्यात आघाडी घेतली होती. पण सकाळी दहा वाजेपर्यंत महायुतीने जबरदस्त मुसंडी मारुन दोनशे पारचा टप्पा गाठला. महायुतीतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विजय जवळपास निश्चित झाला आहे. मंत्री अदिती ठाकरे, दीपक केसरकर, भाजपचे अमल महाडिक, यांनी विजय नोंदवला असून महायुतीच्या उमेदवारांनी मोठे मताधिक्य घेत विजयाकडे वाटचाल सुरु केली आहे.

मतमोजणीचा कल स्पष्ट होऊ लागल्यावर भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करण्यास सुरुवात केली. ढोल ताशाच्या गजरात गुलाल उधळून कार्यकर्त्यांनी नृत्य करुन आनंद साजरा केला. लाडू पेढे वाटून विजयाचा जल्लोष साजरा केला.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00