Home » Blog » भरूच : सहा यात्रेकरू अपघातात ठार

भरूच : सहा यात्रेकरू अपघातात ठार

भरूच : सहा यात्रेकरू अपघातात ठार

by प्रतिनिधी
0 comments
Gujarat Accident

भरूच : वृत्तसंस्था : गुजरातमधील भरूच जिल्ह्यात सोमवारी रात्री एक भीषण अपघात झाला. त्यात सहा जणांना आपला जीव गमवावा लागला. शुक्लतीर्थ जत्रेवरून परतणाऱ्या यात्रेकरूंच्या इको कारची जंबुसर-आमोद रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला धडक बसल्याने हा अपघात झाला. कारमध्ये दोन महिला आणि दोन लहान मुलांसह एकूण सहा जण होते. कारची धडक एवढी भीषण होती, की कारचे छत उडून गेले. बचाव पथकाने अपघातस्थळी पोहोचून मोठ्या प्रयत्नानंतर मृतदेह बाहेर काढले.

भरूचमधील जंबुसर-आमोद रोडवर झालेल्या अपघातात सपनाबेन जयदेव गोहिल, जयदेव गोविंदभाई गोहिल, कीर्तिकाबेन अर्जुनसिंग गोहिल, हंसाबेन अरविंद जाधव, संध्याबेन अरविंद जाधव आणि विवेक गणपत परमार यांचा समावेश आहे. हे सर्व लोक जंबुसरमधील वेडच आणि पंचकडा गावातील रहिवासी होते. अपघात झाला त्या वेळी हे सर्व जण शुक्लतीर्थ येथे सुरू असलेल्या जत्रेला भेट देण्यासाठी गेले होते आणि तेथून परतत असताना हा अपघात झाला. ईको कार उभ्या असलेल्या ट्रकला धडकली. सोमवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. ही धडक एवढी जोरदार होती की कारचे पूर्ण नुकसान झाले आहे.

ट्रक इंडिकेटर न देता उभा करण्यात आला होता. समोरून येणाऱ्या प्रखर दिव्यामुळे चालकाला काही दिसले नाही. त्यामुळे अपघात झाला. अपघातात भरधाव वेग आणि रस्त्यावरील गर्दीमुळे हा अपघात झाला. या रस्ता अपघाताच्या काही तासांपूर्वी सोमवारी सकाळी गुजरातच्या आणंद जिल्ह्यात आणखी एक भीषण रस्ता अपघात झाला. अहमदाबाद-वडोदरा द्रुतगती मार्गावर पहाटे साडेचारच्या सुमारास खासगी लक्झरी बस आणि ट्रकमध्ये धडक झाली. ही बस महाराष्ट्रातून राजस्थानला जात होती. या अपघातात ६ जणांचा मृत्यू झाला, त्यापैकी तीन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर तीन जणांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. याशिवाय या अपघातात आठ जण गंभीर जखमी झाले असून, त्यांना रस्त्यावरून जाणाऱ्यांनी आणि पोलिसांनी रुग्णालयात नेले.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00