Home » Blog » जातनिहाय जनगणनेवर मोदींनी भूमिका जाहीर करावी : रमेश चेन्नीथला यांचे आव्हान 

जातनिहाय जनगणनेवर मोदींनी भूमिका जाहीर करावी : रमेश चेन्नीथला यांचे आव्हान 

जातनिहाय जनगणनेवर मोदींनी भूमिका जाहीर करावी : रमेश चेन्नीथला यांचे आव्हान 

by प्रतिनिधी
0 comments
Ramesh Chennithala

मुंबई  : विशेष प्रतिनिधी : काँग्रेस अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींचे आरक्षण  संपवणार असल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप अत्यंत खोटा व जनतेची दिशाभूल करणारा आहे. काँग्रेस पक्षानेच देशाला संविधान व आरक्षण देऊन मागास जातींना हक्क व अधिकार दिले व वर्षानुवर्षे मनुवाद्यांनी केलेल्या अत्याचारातून त्यांची सुटका केली. आरक्षण व संविधान संपवण्याचे प्रयत्न तर नरेंद्र मोदी व भारतीय जनता पक्षच करत आहे. जातनिहाय जनगणनेवर पंतप्रधान  मोदी व त्यांच्या पक्षाची भूमिका काय आहे हे  स्पष्ट करावे?, असे आव्हान महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी शुक्रवारी दिले.

टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत त्यांनी पंतप्रधानांच्या खोट्या आरोपावर कडाडून टीका केली. ते म्हणाले की, राहुल गांधी यांनी दलित, आदिवासी, ओबीसी समाजाला सामाजिक न्याय मिळावा यासाठी कन्याकुमारी ते काश्मीर ४ हजार किलोमीटरची पदयात्रा काढली. जातनिहाय जनगणनेची मागणी केली. भाजपाचा त्याला विरोध आहे, त्यामुळेच पंतप्रधान मोदी आरक्षण संपवण्याचा खोटा आरोप काँग्रेस पक्षावर करत आहेत. काँग्रेस पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खोट्या आरोपाचा तीव्र निषेधही करत आहे. मोदी यांच्या प्रचार सभांना महाराष्ट्रातील जनतेचा प्रतिसाद मिळत नाही. मुंबईतील शिवाजी पार्कवर झालेल्या सभेला अत्यल्प प्रतिसाद मिळाला. जनता मोदींच्या खोट्या बोलण्यास कंटाळली आहे.  मोदी रिकाम्या खुर्च्यांना संबोधित करत होते. याउलट राहुल गांधी यांच्या प्रचार सभांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे, याकडेही चेन्नीथला यांनी लक्ष वेधले.

सोयाबीनला ७ हजार दर देऊ

भाजपने शेतकऱ्यांची फसवणूक केली असून देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या सोयाबीन, कांदा व कापसाला योग्य भाव देण्याचे आश्वासन पाळले नाही. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर सोयाबीनला ७००० रुपये प्रति क्विंटल भाव देऊ असेही रमेश चेन्नीथला यांनी जाहीर केले.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00