Home » Blog » ज्येष्ठ, दिव्यांगांच्या गृह मतदानास सुरुवात

ज्येष्ठ, दिव्यांगांच्या गृह मतदानास सुरुवात

ज्येष्ठ, दिव्यांगांच्या गृह मतदानास सुरुवात

by प्रतिनिधी
0 comments
Maharashtra Assembly postal voting

कोल्हापूर; प्रतिनिधी : ८५ वर्षांवरील ज्येष्ठ आणि दिव्यांगांच्या गृह मतदानाला गुरुवारपासून सुरुवात झाली. १४ ते १६ नोव्हेंबर या तीन दिवसाच्या कालावधीत चार हजार ६०१ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

जे मतदान केंद्रापर्यंत जाऊ शकणार नाहीत अशा ८५ वर्षांपुढील आणि दिव्यांग मतदारांसाठी गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील दहाही मतदारसंघात तीन दिवस संबंधितांच्या घरी जाऊन मतदान करुन घेण्यात येणार आहेत. या मतदान प्रक्रियेत मतदान केंद्राध्यक्ष, मतदान केंद्र अधिकारी, शिपाई आणि बंदोबस्ताला पोलिस असे पथक असते. हे पथक मतदाराच्या घरी पोहोचल्यानंतर त्यांना आपण कोण आहोत आणि कशासाठी आलो आहोत याची माहिती देतात. त्यानंतर मतदान केंद्रावर होणाऱ्या प्रक्रियेप्रमाणेच संपूर्ण प्रक्रिया पार पाडली जाते. मतदान केंद्राप्रमाणेच येथेही मतदान प्रक्रिया पूर्णपणे गोपनीय पद्धतीने पार पाडली जात आहे. त्यामुळे मतदानाची गुप्तता कायम राहते. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मतपत्रिका दोन पाकिटात बंदिस्त करून मतपेटीत टाकली जाते. त्यामुळे गृह मतदानाची प्रक्रिया म्हणजे एक प्रकारचे मतदान केंद्रच झाले आहे.

जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदार संघातील ८५ वर्षांपेक्षा जास्त वयाचे, दिव्यांग मतदारांचे १२ डी अर्ज भरून घेतले आहेत. यापैकी मतदान केंद्रात जावून मतदान करणे शक्य नसलेल्या मतदारांची संख्या चार हजार ६०१ इतकी आहे. यात ८५ वर्षांवरील तीन हजार ८७० तर ७३१ दिव्यांग मतदार आहेत. तसेच कळविलेल्या दिवशी मतदार अनुपस्थित असल्यास त्यांना पुन्हा एक संधी दिली जाणार आहे. दोन वेळा अनुपस्थित असलेल्या मतदारांना गृहमतदान करण्याची त्याचबरोबर मतदान केंद्रावर जावून मतदान करण्याची संधी नसेल, असेही जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे यांनी सांगितले.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00