Home » Blog » मोक्याच्या जागा दलालांना विकण्याचा मुश्रीफांचा घाट : स्वाती कोरी

मोक्याच्या जागा दलालांना विकण्याचा मुश्रीफांचा घाट : स्वाती कोरी

समरजित घाटगे यांच्या प्रचार सभेतून टीका

by प्रतिनिधी
0 comments
swati kori

गडहिंग्लज; प्रतिनिधी : शैक्षणिक विद्यापीठ अशी आदर्शवत ओळख असणाऱ्या गडहिंग्लज शहराला पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या भ्रष्ट प्रवृत्तीने बदनाम केले आहे. त्यांच्या फोडाफोडीच्या आणि बेबंदशाही कारभाराला जनता कंटाळली आहे. शहरातील अत्यंत मोक्याच्या जागा भू-माफियांना आणि टक्केवारीतील दलालांना विकण्याचा घाट मुश्रीफ यांनी घातला आहे. अशा भ्रष्ट प्रवृत्तीला गडहिंग्लजकर नक्की धडा शिकवतील, अशी घणाघाती टीका जनता दलाच्या नेत्या स्वाती कोरी यांनी केली. महाविकास आघाडीचे उमेदवार समरजित घाटगे यांच्या प्रचारार्थ आयोजित प्रचारसभेत त्या बोलत होत्या.

त्या म्हणाल्या, हजारो कोटींचा घोटाळा लपविण्यासाठी मुश्रीफ यांनी जातीयवादी पक्षाचा आसरा घेतला. राजकारणात यशस्वी होण्यासाठी पैशाच्या बळावर माणसे विकत घेण्याचा त्यांचा एककलमी फंडा सुरू आहे. शहरात त्यांची झुंडशाही आणि एकाधिकारशाही फोफावली आहे. स्वत:च्या राजकीय स्वार्थासाठी दिवंगत आम. श्रीपतराव शिंदे यांचा पक्ष फोडण्याचे पाप ते करत आहात याची किंमत त्यांना या निवडणुकीत चुकवावी लागेल.

समरजित घाटगे म्हणाले, पंचवीस वर्षे सत्तेत असलेल्या मुश्रीफांच्या मतदारसंघातील जनतेला उपचारांसाठी पुणे-मुंबईला जावे लागते हे त्यांच्या कर्तृत्वाचे अपयशच मानावे लागेल. त्यांनी प्रसिद्ध केलेल्या सात हजार कोटींच्या पुस्तकात शिक्षण, आरोग्य या महत्त्वपूर्ण कामांसाठी किती निधी खर्च केला याची आकडेवारी का दिली नाही? सत्तेची संपूर्ण हयात कंत्राटदार, ठेकेदार टोळीला पोसण्यासाठीच त्यांनी घालवली. त्यामुळे आपल्या सर्वांच्या हक्काचा आणि कुटुंबातील या सदस्याला विधानसभेत पाठवा. सर्वांना विश्वासात घेऊन काम करेन.

बसवराज आजरी, कुमार पाटील,काशीनाथ देवगौडा, संभाजी भोकरे, सुनील शिंत्रे यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी शिवाजीराव खोत, रणजितसिंह पाटील, बाबासाहेब पाटील, ॲड .दिग्विजय कुराडे, यांच्यासह कार्यकर्ते,पदाधिकारी, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत प्रास्ताविक रामदास कुराडे यांनी केले. संपतराव देसाई यांनी आभार मानले

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00