Home » Blog » न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी सरन्यायाधीश म्हणून घेतली शपथ

न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी सरन्यायाधीश म्हणून घेतली शपथ

न्यायमूर्ती खन्ना यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिली शपथ

by प्रतिनिधी
0 comments
Sanjiv Khanna

दिल्ली; वृत्तसंस्था : न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी आज (दि.११) भारताचे ५१ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. न्यायमूर्ती खन्ना यांना राष्ट्रपती मुर्मू यांनी शपथ दिली. यावेळी राष्ट्रपती भवन येथे झालेल्या न्यायमूर्ती खन्ना यांच्या शपथविधी सोहळ्याला मावळते सनन्यायाधीश  डी. वाय. चंद्रचूड उपस्थित होते. (Sanjiv Khanna)

भारताचे नवे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी १९८३ साली दिल्ली विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली. न्यायमूर्ती खन्ना यांनी दिल्लीतील तीस हजारी न्यायालयातून त्यांनी आपल्या वरिली कारकिर्दीला सुरूवात केली. यानंतर न्यायमूर्ती खन्ना यांनी आयकर विभाग आणि दिल्ली सरकारच्या नागरी प्रकरणांचे वकील होते. २००५ मध्ये  संजीव खन्ना दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती झाले. त्यांनी तब्बल १३ वर्षे दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून काम पाहिले. २०१९ साली न्यायमूर्ती खन्ना यांना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून बढती मिळाली. त्यांना विविध कायदेशीर क्षेत्रातील कामाचा अनुभव आहे. यात लवाद, कर आकारणी, व्यावसायिक कायदा, संवैधानिक कायदा आणि पर्यावरण कायदाचा समावेश आहे. (Sanjiv Khanna)

२०१९ पासून सर्वोच्च न्यायालयातील ६ वर्षांच्या आपल्या कारकिर्दीत न्यायमूर्ती खन्ना यांनी ४०० पेक्षा अधि न्यायपीठांचा भाग म्हणून काम पाहिले आहे.  जुलैमध्ये न्यायमूर्ती खन्ना आणि न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठाने अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर केला होता. अलीगढ मुस्लिम विद्यापीठाला अल्पसंख्याक दर्जा देण्याचे समर्थनही त्यांनी केले होते.

घरातून मिळाला वकिलीचा वारसा

न्यायमूर्ती संजीव खन्ना यांना वकिलाचा वारसा घरातूनच मिळाला. न्यायमूर्ती संजीव खन्ना यांचे वडिल देवराज खन्ना यांनी दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून काम पाहिले आहे. तर न्यायमूर्ती खन्ना यांचे काका हंसराज खन्ना हे सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती होते. (Sanjiv Khanna)

 

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00