न्यू यार्क वृत्तसंस्था : अमेरिकन ‘फेडरल रिझर्व्ह’ने व्याजदरात २५ आधार अंकांनी (०.२५ टक्के) कपात केली आहे. आता व्याजदर ४.५० ते ४.७५ टक्क्यांदरम्यान असतील. यापूर्वी १८ सप्टेंबर रोजी ‘फेडरल रिझर्व्ह’ने व्याजदरात ५० बेसिस पॉइंट (०.५%) कपात केली होती. व्याजदर कपातीमुळे शेअर बाजारात (stock market) तेजी येऊ शकते, असे शेअर बाजार विश्लेषकांचे मत आहे. (US Fed Rate Cut)
‘फेडरल रिझर्व्ह’ने मार्च २०२० नंतर सप्टेंबर २०२४ मध्ये व्याजदरात कपात केली होती. चलनवाढ नियंत्रित करण्यासाठी, सेंट्रल बँक ऑफ अमेरिकाने मार्च २०२२ ते जुलै २०२३ दरम्यान ११ वेळा व्याजदर वाढवले होते. २०२३ मध्ये सलग तिसऱ्यांदा व्याजदर अपरिवर्तित ठेवले. गेल्या वर्षी, ‘फेडरल रिझर्व्ह’ने आपल्या धोरणात्मक निर्णयात सलग तिसऱ्यांदा व्याजदर अपरिवर्तित ठेवले. २६ जुलै २०२३ रोजी, ‘फेडरल रिझर्व्ह’ने बाजाराच्या अपेक्षेनुसार धोरण दर ५.२५ टक्के ते ५.५ टक्क्यांच्या श्रेणीत अपरिवर्तित ठेवले होते. तथापि, ‘फेडरल रिझर्व्ह’ने असेही सूचित केले होते, की २०२४ मध्ये दर कपात दिसून येईल आणि ते ४.६ टक्क्यांपर्यंत खाली येऊ शकते.
stock market२०२२ पासून दर वाढवण्यास सुरुवात
महागाईचा सामना करण्यासाठी ‘फेडरल रिझर्व्ह’ने मार्च २०२२ पासून दर वाढवण्यास सुरुवात केली. गेल्या वर्षी जुलैपर्यंत हे दर २३ वर्षांतील सर्वोच्च पातळीवर गेले होते. बँका एकमेकांवर किती व्याज आकारतील याचा दर ‘फेडरल रिझर्व्ह’ठरवते; परंतु याचा अनेकदा ग्राहक कर्ज, तारण, क्रेडिट कार्ड आणि वाहन कर्जावरही परिणाम होतो. व्याजदर कपातीमुळे शेअर बाजारात तेजी येऊ शकते, असे शेअर बाजार विश्लेषकांचे मत आहे. अमेरिकेचे आर्थिक आरोग्य बिघडू शकते. गुंतवणुकदारांचा उत्साह कमी होऊ शकतो. कमी कपातीमुळे बाजारात निराशा होते, कारण बाजार व्याजदरात अधिक कपातीची अपेक्षा करत आहे. व्याजदरात कपात करण्यास उशीर झाल्यास नोकरीच्या बाजारपेठेत मंदी येऊ शकते. ‘पॉलिसी रेट’ हे महागाईशी लढण्यासाठी एक शक्तिशाली साधन आहे.
US Fed Rate Cut : बँका त्यांच्या ग्राहकांसाठी कर्जे महाग करतात
कोणत्याही मध्यवर्ती बँकेकडे पॉलिसी रेटच्या रूपात चलनवाढीचा सामना करण्यासाठी एक शक्तिशाली साधन असते. जेव्हा महागाई खूप जास्त असते, तेव्हा सेंट्रल बँक पॉलिसी रेट वाढवून अर्थव्यवस्थेतील पैशाचा प्रवाह कमी करण्याचा प्रयत्न करते. पॉलिसी रेट जास्त असेल तर बँकांना सेंट्रल बँकेकडून मिळणारे कर्ज महाग होईल. बदल्यात, बँका त्यांच्या ग्राहकांसाठी कर्जे महाग करतात. यामुळे अर्थव्यवस्थेतील पैशाचा प्रवाह कमी होतो. जर पैशाचा प्रवाह कमी झाला, तर मागणी कमी होते आणि महागाई कमी होते. जेव्हा अर्थव्यवस्था वाईट टप्प्यातून जाते, तेव्हा पुनर्प्राप्तीसाठी पैशाचा ओघ वाढवावा लागतो. अशा परिस्थितीत सेंट्रल बँक पॉलिसी रेट कमी करते. त्यामुळे सेंट्रल बँकेकडून बँकांना मिळणारे कर्ज स्वस्त होऊन ग्राहकांनाही कमी दरात कर्ज मिळते.
हेही वाचा