Home » Blog » लोक राहिले, तर देश राहील !

लोक राहिले, तर देश राहील !

लोक राहिले, तर देश राहील !

by प्रतिनिधी
0 comments
file photo

-हृदयेश जोशी

आई-वडिलांनी लहानपणी शिकवलं की बेटा, देश राहिला तर आपण राहू. ते चूक होतं. मी माझ्या मुलांना शिकवतो की, लोक राहिले तर हा देश राहील. तुम्ही माझ्या आत तिरंग्यासाठी, या देशासाठी आणि या देशाच्या तथाकथित महानतेसाठी बळजबरीनं आदर नाही निर्माण करू शकत.

लहानपणी आई-वडिलांनी शिकवलं की, देश राहिला तर आपण राहू. त्यांनी कानोकानी ऐकलेली ही गोष्ट मला शिकवली होती….मला तेव्हा ती चांगली वाटली…. मलाही लहानपणी वाटायचं की देश राहिला तर आपण राहू. देश समजून घेतल्यानंतर मला कळलं की ते चुकीचं होतं. देशाच्या राहण्याशी माझा काही संबंध नाहीदेश जागोजागी भेगाळला आहे आणि त्यात मी पुन्हा पुन्हा अडकत चाललोय. मी या देशाचाच नाहीया समाजाचाही नाही. मी जिथून आलोय ते या देशाचा वर्तमान चेहरा आणि समाजापासून खूप लांब आहे. मी आपल्या मुलांना नाही शिकवत की, देश राहिला तर आपण राहू.

या देशात जितकी वर्षे मुस्लिमांचे लाड होत आलेत तितक्या वर्षांपासून त्यांचं दमनसुद्धा होत आलंय आणि त्यांच्याविरोधात खोटे खटलेसुद्धा चालत आलेत. जेव्हापासून मुसलमानांना खूश करण्यासाठी योजना येत राहिल्या तेव्हापासून त्यांच्या मुलांना तुरुंगात सडण्यासाठी सोडण्यात आलं. त्याच्या बरोबरीनं बहुसंख्यांकांचे (इथं हिंदू असं वाचा) सुद्धा खूप लाड झाले. अल्पसंख्यांकांना सतत लाथाडलं त्यांच्या घरांतून पळवून लावलं परंतु कधी बहुसंख्यांक आरोपींना पकडलं किंवा शिक्षा झाली असं क्वचितच घडलं. कश्मीरी पंडितांबद्दल मी वारंवार बोलत आलोय१९८४च्या दंग्यांबद्दलही खूप बोललोयइथं पुन्हा सांगतो की या दोन्ही लाजिरवाण्या घटना होत्या. १९८४ ची दंगल राज्यसत्तेने प्रायोजित केली होती, सरकारच्या संरक्षणाखाली झालेल्या २००२च्या गुजरातच्या दंगलीप्रमाणं. त्याचप्रमाणं कश्मीरी पंडितांच्या पलायनावर सरकारनं मूक दर्शक बनून राहणं आणि त्यांचं पुन्हा सन्मानानं पुनर्वसन करण्याऐवजी निर्वासित छावण्यांमध्ये राहण्यासाठी सांगणं यातून राज्यसत्तेचा कुरुप चेहरा दिसतो. आज आपण इतिहासाचं पुनर्लेखन करतोय. हिंदू संघटना गरीब मुसलमानांना लक्ष्य करताहेत आणि त्यांना जय श्री राम, भारत माता की जय म्हणण्यासाठी असहाय्य बनवलं जातंय. मुसलमानांना पूर्वीसुद्धा पाकिस्तान मुर्दाबाद आणि हिंदुस्थान झिंदाबाद म्हणायला सांगितलं गेलं आहे. आपली देशभक्ती सिद्ध करण्यासाठी. पण या देशात मुसलमानांनी का पुन्हा पुन्हा देशभक्ती सिद्ध करायची?

जेव्हा मी एखादा व्हिडीओ बघतो की, एखाद्या गरीब मुसलमानाला पकडून जय श्री राम किंवा भारत माता किंवा वंदे मातरम म्हणायला जबरदस्ती केली जातेय. त्याला आई-बहिणीवरुन शिव्या देऊन कापून काढण्याची धमकी दिली जातेय…. तेव्हा वाटतं भारत नावाची गोष्ट संपली आहे. हिंदुस्थान नष्ट झालाय आणि आम्ही हिंदू पाकिस्तान तयार करायला लागलोय जिथं जीव वाचवण्यासाठी एखाद्या गरिबाला म्हणावं लागतं, ‘मी हिंदू आहे भावांनो

मी नास्तिक आहे आणि कुठला धर्म किंवा पूजेवर माझा विश्वास नाही. पासपोर्टवर लिहिलंय तेवढ्यापुरताच मी भारतीय आहे. मी ब्राह्मण कुटुंबात जन्माला येऊनही त्यांचा मोठा टीकाकार आहे. मी रुढीवादी आणि धर्मांध मुसलमान, शीख किंवा कोणत्याही धर्मातल्या कट्टरतावादी लोकांचा तेवढाच द्वेष करतो. मला असं वाटतं की मुसलमानांनी मुस्लिम कट्टरता आणि रुढींच्या विरोधात सर्वात आधी उभं राहिलं पाहिजे. आपला धर्म उदार बनवण्यासाठी त्यांनी सर्वतोपरि प्रयत्न करायला पाहिजेत. मला हे ठाऊक आहे की, अनेकदा आपल्यातले अनेक लोक इस्लामी कट्टरतावादाच्या विरोधात आक्रमकपणे उभे राहात नाहीत, परंतु मुस्लिमांना मी असं नाही म्हणणार की, ‘हिन्दुस्तान में रहना है तो वंदेमातरम कहना होगा।

मी पुन्हा एकदा हेसुद्धा विचारू इच्छितो की, मुसलमानांना का वारंवार देशभक्ती सिद्ध करायला सांगितलं जातं ? आणि आज देशातले बहुतांश लोक हिंदू कट्टरतावाद्यांबाबत का गप्प आहेत? हे मौन कसं काय सहन केलं जातंय? हिंदू कट्टरतावाद का सहन केला जातोय ?

मी आधीपासून असा नव्हतो. गेल्या काही वर्षांमध्ये बदलत बदलत इथपर्यंत आलोय. माझ्यासाठी मातृभूमी नावाची कुठलीही गोष्ट नाही. आई-वडिलांनी लहानपणी शिकवलं की बेटा, देश राहिला तर आपण राहू. ते चूक होतं. मी माझ्या मुलांना शिकवतो की, लोक राहिले तर हा देश राहील. पहिल्यांदा देशातले लोक आहेत त्यानंतर हा स्थिर भूभाग आहे. जर लोक मरत असतील आणि त्रस्त असतील, मुलींवर बलात्कार होत असतील आणि आयांच्या स्तनामध्ये लेकरांसाठी दूध नसेल तर अशा देशाच्या संपन्नतेचा कसा काय अभिमान बाळगला जाऊ शकतो? मी बदलत बदलत असा झालोय. तुम्ही माझ्या आत तिरंग्यासाठी, या देशासाठी आणि या देशाच्या तथाकथित महानतेसाठी बळजबरीनं आदर नाही निर्माण करू शकत.

(हृदयेश जोशी हे हिंदीतील ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00