76
कोल्हापूर : प्रतिनिधी : परिवर्तन महाशक्तीने महायुती व महाविकास आघाडीला धक्के देण्यास सुरुवात केली आहे. माजी आमदार सुभाष साबणे यांनी छत्रपती संभाजीराजे यांच्या परिवर्तन महाशक्तीमध्ये उपस्थितीत प्रवेश केला. (Subhash Sabne)
सुभाष साबणे यांनी काल (दि.१९) भाजपा सदस्य पदाचा राजीनामा दिल्यानंतर आज (दि.२०) परिवर्तन महाशक्तीमध्ये त्यांचा प्रवेश केला आहे. ते शिवसेनेकडून १९९९, २००४ व २०१४ साली आमदार म्हणून निवडून आले होते. तसेच देगलूर बिलोलीचे विधानसभेचे कॉंग्रेस आमदार रावसाहेब अंतापुरकर यांच्या अकाली निधनानंतर साबणे यांनी भाजपाकडून पोट निवडणूक लढवली होती, परंतु त्यांचा पराभव झाला होता.
हेही वाचा :
- राष्ट्रवादी शरद पवार पक्ष सतेज पाटील यांच्याविरोधात आक्रमक
- “ऐनवेळी अन्य नाव येवू शकते” काँग्रेस निरीक्षकांच्या अंदाजाने दिवसभर रंगली चर्चा
- काकांचा पुतण्याला आणखी एक धक्का