19
मुंबई; विशेष प्रतिनिधी : जाणीवपूर्वक पक्षविरोधी भूमिका घेतल्यामुळे आणि पक्षशिस्त मोडल्याबद्दल आमदार सतीश चव्हाण यांना पक्षातून सहा वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी आज (दि.१८) दिली. (Satish Chavan)
१५ ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुती सरकारच्या विरोधात प्रतिमा मलिन करण्याच्या हेतूने जाणीवपूर्वक पक्षविरोधी भूमिका छत्रपती संभाजीनगरचे आमदार सतीश चव्हाण यांनी घेतली होती. वास्तविक सर्व समाजघटकांना न्याय देण्याची भूमिका महायुती सरकारच्या कार्यकाळात घेतलेली आहे. असे असताना आमदार सतीश चव्हाण यांनी जाणीवपूर्वक शिस्तभंग केला असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसकडून ही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे., असे तटकरे यांनी सांगितले. (Satish Chavan)
हेही वाचा :
- पाचगणी मुख्याधिकारी यांना उच्च न्यायालयाची नोटीस
- कोल्हापूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या १०२ जागांसाठी भरती
- पन्नूच्या हत्येच्या कटात भारताचा सहभाग नाही