Home » Blog » जन्मगावी गोव्यात नाना पाटेकरांनी घेतला अखेरचा श्वास  

जन्मगावी गोव्यात नाना पाटेकरांनी घेतला अखेरचा श्वास  

by प्रतिनिधी
0 comments
Nana Patekar passes away in Goa

कोल्हापूर : प्रतिनिधी : नाटक आणि चित्रपटातील ज्येष्ठ, प्रतिष्ठित अभिनेते नाना पाटेकर (वय ७५ )यांचे गोव्यातील डोना पावला त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. गुरुवारी सकाळी त्यांच्या निधनाने महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला धक्का बसला. आज गुरुवारी दुपारी चार वाजता पुण्यातील डोणजे येथील त्यांच्या फॉर्म हाऊसवर नाना पाटेकरांवर अंत्यसंस्कार होणार आहे. (Nana Patekar passes away in Goa)

डॉक्टरांकडून ४५ मिनिटे सीपीआर

नाना पाटेकर हे त्यांच्या गोव्यातील मुळ गावी डोना पावला येथे काही कामानिमित्त आले होते. आज गुरुवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास त्यांच्या केअरटेकरांना नाना अस्तव्यस्थ  अवस्थेत पडल्याचे दिसले. त्यांनी नाना पाटेकरांना ताबडतोब गोव्यातील माणिपाल हॉस्पिटलमध्ये नेले. डॉक्टरांनी त्यांच्यावर ४५ मिनिटे सीपीआर देऊन वाचवण्याचा प्रयत्न केला पण त्यांना यश आले नाही. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. त्यांचे शवविच्छेदन करण्यात येणार असल्याची माहिती माणिपाल हॉस्पिटचचे ऑन्कालॉजी विभागाचे प्रमुख डॉ. शेखर साळकर यांनी दिली.

नाम फाउंडेशनच्या माध्यमात शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न

नाटकातून सुरुवात केलेल्या नाना पाटेकरांनी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत छाप पाडली. आपल्या अभिनयाने त्यांनी बॉलीवूडमध्ये दबदबा ठेवला होता. त्यांच्या अभिनयाचे अनेक चाहते होते. प्रख्यात नट असतानाही त्यांची राहणी साधेपणाची होते. समाजकार्यातही त्याचे मोठे योगदान होते. अभिनेते मकरंद अनासपुरे आणि नानांनी नाम फाउंडेशनची स्थापना केली. या संस्थेतर्फे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न केले. (Nana Patekar passes away in Goa)

माफीचा साक्षीदार, भालू , मराठी चित्रपटात खलनायकाची भूमिका

नाना पाटेकरांचे पूर्ण नाव विश्वनाथ पाटेकर होते. त्यांचा जन्म १ जानेवारी १९५१ मध्ये झाला. त्यांनी मराठी नाटकातून अभिनयाची सुरुवात केली. विजया मेहता दिग्दर्शित हमिदाबाईची कोठी या नाटकातही त्यांनी भूमिका केली होती. १९७८ मध्ये गमन चित्रपटातून त्यांनी अभिनयात पदार्पण केले. मराठी चित्रपट भालू या मध्ये त्यांनी खलनायकांची भूमिका रंगवली होती. माफीचा साक्षीदारमधील खलनायकाची भूमिका गाजली होती.

अंकुश, परिंदा, क्रांतीवीर मधील अभिनयाने देशभर नाव

१९८६ मध्ये प्रदर्शित झालेल्या एन चंद्रा यांच्या अंकुश चित्रपटापासून त्यांची कारकीर्द बहरली. एन.चंद्राच्या प्रतिघात चित्रपटातील त्यांची भूमिका गाजली होती. विधु विनोद चोप्रांच्या परिंदा चित्रपटातील अण्णा ही खलनायिकाची भूमिकेने त्यांचे नाव देशभर झाले. या चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान नानाचा जीवघेणा अपघातही झाला होता पण त्यातून बचावले. तिरंगा, क्रांतीवीर, खामोशी चित्रपट गाजले होते. क्रांतिवीर चित्रपटात भूमिकेबद्द्ल त्यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. खामोशी चित्रपटात त्यांनी मुक्या व्यक्तीची भूमिका केली होती. मराठीतील पक पक पकाक, डॉ. प्रकाश आमटे हे मराठी चित्रपटही गाजले होते. नाना पाटेकर विविध ढंगाच्या भूमिका केल्या होत्या. (Nana Patekar passes away in Goa)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!