मुंबई : प्रतिनिधी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिनी आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधत राज्य सरकारने अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेतील शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर केली. या यादीत फक्त ५५३ शेतकऱ्यांचा समावेश आहे. पहिल्या यादीत ०.१ टक्क्याहून कमी शेतकरी लाभार्थी ठरले आहेत. राज्यातील ३२ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येणार आहे. (Loan waiver for only 553 farmers in the first list.)
ठाण्यातील १८२ शेतकऱ्यांना कर्जमाफी
सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी ही यादी जाहीर करताना उर्वरीत शेतकऱ्यांची टप्प्याटप्याने यादी जाहीर करण्यात येणार आहे असे सांगितले. आज झालेल्या लाभार्थ्यांच्या यादीत अमरावतीतील ५८, लातूरमधील १३३, नागपूरमधील १६, पुण्यातील ८५, साताऱ्यातील ३८, सोलापूरातील २१ तर ठाण्यातील १८२ शेतकऱ्यांचा समावेश होता. (Loan waiver for only 553 farmers in the first list.)
५६ लाख शेतकऱ्यांना मिळणार लाभ
कर्जमुक्ती योजनेसाठी संकलित केलेल्या माहितीनुसार राज्यातील ३२ लाख शेतकरी थकबाकीदार असून अंदाजे २४ लाख शेतकरी नियमित कर्जफेड करणारे आहेत. अशा ५६ लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. कर्जमाफीसाठी ३६ हजार ५८५ रुपयांची रक्कम अंदाजित करण्यात आली आहे. तसेच २०१९ च्या महात्मा फुले कर्जमाफी योजनेतील लाभार्थ्यांना ५० हजारांऐवजी दोन लाख रुपयांपर्यंतचा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या योजनेचा खर्च ४० हजार ९८० कोटी रुपयांपर्यंत पोचणार आहे. (Loan waiver for only 553 farmers in the first list.)