महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : तामिळनाडूच्या त्रिची विमानतळाहून यूएई देशातील शारजाह शहरात जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात उड्डाण केल्यानंतर अचानक तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे हे विमान त्रिची विमानतळाजवळच हवेतच फिरत होतं. या विमानात १४१ प्रवासी होते. अखेर या विमानाची आता इमर्जन्सी लँडिंग करण्यात यश आलं आहे. (Air India)
यूएई देशातील शारजाह शहरात जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात उड्डाण केल्यानंतर अचानक तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे हे विमान विमानतळ परिसरात हवेतच फिरत होतं. हायड्रोलिक फेल झाल्याने विमानाची चाकं आतमध्ये जाण्यास अडचणी येत होत्या. यावर तोडगा काढण्यासाठी विमानातील इंधन कमी केलं जात होतं. त्यासाठी हवेतच फिरवलं जात होतं. विमानाला पुढील ऑपरेशनल समस्या निर्माण झाल्या. त्यामुळे अधिकाऱ्यांनी विमानातील इंधन संपवून उतरविण्याची योजना आखली. इंधनाने भरलेल्या विमानाच्या इमर्जन्सी लँडिंगवेळी अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे इंधन संपवून विमानाची सुखरुप लँडिंग करण्यात आली.विमानाच्या इमर्जन्सी लँडिंगची माहिती मिळाल्यानंतर अनेक रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाच्या गाड्याही विमानतळावर तैनात करण्यात आल्या होत्या. मात्र, विमान विमानतळावर सुखरूप उतरले ही दिलासादायक बाब आहे.
हेही वाचा :
- अभिनेते सयाजी शिंदे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश
- तोफेचा गोळा जागेवरच फुटल्याने दोन अग्निवीरांचा मृत्यू
- ‘लाडकी बहीण योजने’साठी पुन्हा एक संधी