नवी दिल्ली : एअर इंडियाने पॅरिसला जाणारे विमान मंगळवारी (१७ जून) रद्द केले. विमानात तांत्रिक समस्या निर्माण झाली आहे. ती सोडवण्यात येत आहे, प्रवाशांना लवकरात लवकर सुविधा मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे एअरलाइनने म्हटले आहे. (Paris Flight Cancelled)
पॅरिस चार्ल्स द गॉल (सीडीजी) विमानतळावर रात्रीच्या उड्डाणांवर निर्बंध असल्याने विमानसेवा रद्द करण्यात आली आहे, असे एअर इंडियाने एका निवेदनात म्हटले आहे.
विमान कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, उड्डाणपूर्व तपासणी दरम्यान काही विमानात काही समस्या आढळली. त्यामुळे मंगळवारी त्यांची दिल्ली-पॅरिस उड्डाण रद्द केले आहे.
पॅरिसरला होणारे उड्डाण रद्द झाल्यामुळे १८ जून रोजी पॅरिसहून दिल्लीला येणारी परतीची फ्लाइट AI142 देखील रद्द करण्यात आली आहे, असेही निवेदनात म्हटले आहे. (Paris Flight Cancelled)
‘‘दिल्लीहून पॅरिसला जाणारी जाणारी फ्लाइट AI143 रद्द करण्यात आली आहे. उड्डाणपूर्व अनिवार्य तपासणीदरम्यान एक समस्या आढळून आली. ती सध्या सोडवली जात आहे.
‘‘तथापि, पॅरिस चार्ल्स द गॉल (सीडीजी) विमानतळावर रात्रीच्या कामकाजावर निर्बंध असल्याने, फ्लाइट रद्द करण्यात आली आहे,’’ असे एअर इंडियाने म्हटले आहे. (Paris Flight Cancelled)
रद्द झालेल्या विमानातील प्रवाशांची हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. प्रवाशांनी तिकीट रद्द केल्यास पूर्ण परतफेड करण्यात येईल किंवा वेळापत्रकात बदल केल्यास ही सुविधाही मोफत देण्यात येईल, असे एअरलाइन्सने म्हटले आहे.
हेही वाचा :
इराणने दुसरा सर्वोच्च कमांडर गमावला
ट्रम्प यांच्याकडून आगीत तेल : चीन