महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : पाकिस्तानच्या दौऱ्यावर असणाऱ्या इंग्लंडच्या खेळाडूंनी कसोटीत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. मुलतान येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा युवा फलंदाज हॅरी ब्रुकने त्रिशतक झळकावून ऐतिहासिक कामगिरी केली. यासह ‘मुलतान’चा ‘सुलतान’ बनला आहे. त्याने हे त्रिशतक ९८.४५ च्या सरासरीने फलंदाजी करत ३१० चेंडूत झळकावले. ब्रुकचे हे त्रिशतक हे कोणत्याही इंग्लिश फलंदाजाने झळकवलेले सर्वात जलद त्रिशतक ठरले आहे. यासह ब्रूक कसोटी क्रिकेटमध्ये वेगवान त्रिशतक झळकावणारा गेल्या ३४ वर्षांतील पहिला इंग्लिश खेळाडू ठरला आहे. त्याचे हे कारकिर्दीतील पहिलेच त्रिशतक आहे. ही कामगिरी करताना हॅरी ब्रुकने वीरेंद्र सेहवागचा मुलतान स्टेडियमवरील त्रिशतकाचा विक्रम मोडीत काढला. (Harry Brook)
ब्रुकने मोडला विरेंद्र सेहवागचा मुलतानमधील विक्रम
जलद त्रिशतक ठोकण्याचा विक्रम सेहवागच्याचं नावावर
पाकिस्तानविरूद्ध त्रिशतक झळकवणारा पाचवा फलंदाज
कसोटीत त्रिशतक झळकावणारा सहावा खेळाडू
रूटसोबत ऐतिहासिक भागीदारी
ब्रूक आणि जो रूट यांनी मिळून ४५४ धावांची भागीदारी केली. कोणत्याही कसोटीत पाकिस्तानविरुद्ध केलेली ही सर्वात मोठी भागीदारी आहे. या जोडीने पीटर मे आणि कॉलिन काउड्री यांचा 67 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला. याआधी त्यांनी ४११ धावांची भागीदारी केली होती. या भागिदारी मोलाची साथ देणारा रुट २६२ धावांची उत्कृष्ट खेळी खेळून बाद झाला. त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीतील सहावे द्विशतक झळकावले.
Our first Test triple centurion for 34 years 🏏
Brook joins Sandham, Hammond, Hutton, Edrich and Gooch 📝
🇵🇰 #PAKvENG 🏴 | #EnglandCricket pic.twitter.com/ZMdsKPmb8q
— England Cricket (@englandcricket) October 10, 2024