Home » Blog » मराठा महासंघाच्यावतीने शिवराज्याभिषेक व्याखानमालेचे आयोजन

मराठा महासंघाच्यावतीने शिवराज्याभिषेक व्याखानमालेचे आयोजन

by प्रतिनिधी
0 comments
Shivrajyabhishek Lecture Series Organized by the Maratha Mahasangh

कोल्हापूर : प्रतिनिधी : अखिल भारतीय मराठा महासंघाच्यावतीने शिवराज्याभिषेक दिनानिमित्त व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. माजी आमदार उल्हास पवार आणि डॉ. दीपक पवार यांची व्याख्याने होणार आहेत. तसेच शिवराज्याभिषेक निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक आणि जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. अखिल भारतीय मराठा महासंघ व मराठा स्वराज्य भवन ट्रस्टच्यावतीने कोल्हापुरातील सर्व जाती धर्मातील घटकांना सोबत घेऊन ६ जून शिव राज्याभिषेक सोहळा जनतेचा लोकोत्सव म्हणून गेले २० वर्षे साजरा करत आहे. यावर्षी  शिवराज्याभिषेक व्याख्यानमालेचे आयेजन केले आहे. राजर्षी शाहू स्मारक भवनात दोन दिवस मान्यवरांची व्याख्याने होणार आहेत. शनिवारी ३० मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजता माजी आमदार उल्हासदादा पवार यांचे “महाराष्ट्रातील सांस्कृतिक राजकारण” या विषयावर व्याख्यान होणार आहे. रविवारी सायंकाळी साडेपाच वाजता डॉ. दीपक पवार यांचे “छत्रपती शिवराय आणि आजचा महाराष्ट्र धर्म” या विषयावर व्याख्यान होणार आहे. (Shivrajyabhishek Lecture Series Organized by the Maratha Mahasangh)

व्याख्यानमालेबरोबर अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. एक जून रोजी सकाळी अकरा वाजता शाहू स्मारक भवन येथे फेटा बांधणी प्रशिक्षण होणार आहे. पाच जून रोजी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून सकाळी दहा वाजता आजरा येथे वृक्षारोपण होणार आहे.

शनिवारी सहा जून रोजी दुपारी साडेचार वाजता भव्य शिवराज्यभिषेक मिरवणूक काढण्यात येणार आहे. मंगळवार पेठेतील  मराठा महासंघ कार्यालय कळंबा रोड येथून लोकप्रतिनिधी व मान्यवरांच्या हस्ते मिरवणुकीस प्रारंभ होईल. मिरवणूक प्रबोधनात्मक व पारंपारिक पद्धतीने निघणार असून शिवकाळातील प्रसंग, हत्ती,घोडे, रथ या बरोबर चित्तथरारक मर्दानी खेळ, महिला लेझीम,वारकरी पथक, झांज पथक,धनगरी ढोल ही मिरवणुकीची आकर्षणे राहणार आहेत. (Shivrajyabhishek Lecture Series Organized by the Maratha Mahasangh)  

पत्रकार परिषदेला शैलजा भोसले, शहराध्यक्ष डॉ .संदीप पाटील, बबनराव रानगे, प्रकाश पाटील, कादर मलबारी, चंद्रकांत चव्हाण, शंकरराव शेळके, विजय पाटील, संयोगिता देसाई, संपत्ती पाटील, विजय पाटील, प्रताप नाईक, अशोक माळी आदी उपस्थित होते. (Shivrajyabhishek Lecture Series Organized by the Maratha Mahasangh)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00