Home » Blog » अमेरिकेचा इराणवर हल्ला; शांतता चर्चेला तडा?

अमेरिकेचा इराणवर हल्ला; शांतता चर्चेला तडा?

by प्रतिनिधी
0 comments
US attacks Iran; Peace talks fall apart

नवी दिल्ली : अमेरिका आणि इराण या दोन्ही देशात सध्या शस्त्रसंधी सुरू असताना अचानक अमेरिकेने इराणवर हल्ला केला. इराणच्या दक्षिणेकडील अब्बास बंदर परिसरात हल्ले करण्यात आले. होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ क्षेपणास्त्र प्रक्षेपण स्थळांना आणि सुरुंग पेरण्याचा प्रयत्न करणाऱ्या बोटीवर आत्मसंरक्षणार्थ हल्ला केला आहे असा दावा अमेरिकेने केला आहे. या हल्ल्याने दोन्ही देशात सुरू असलेल्या शांतता चर्चेला तडा जाण्याची भिती व्यक्त केली जात आहे. (US attacks Iran; Peace talks fall apart)

दोन्ही देशातील संघर्ष थांबवण्यासाठी गेली तीन महिने वॉशिंग्टन आणि तेहरान यांच्यात अप्रत्यक्ष वाटाघाटी सुरू असताना अमेरिकेने हल्ला केला. या कारवाईमुळे कतार आणि इतर देशांनी सुरू केलेल्या शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांना अडथळे निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हल्ला करण्यापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणमधील युरोनियम साठ्याबाबत इशारा दिला होता. दोन्ही देशामध्ये होणाऱ्या कोणत्याही कराराचा भाग म्हणून इराणकडे असलेला युरोनियमचा साठा वॉशिंग्टनकडे दिला पाहिजे किंवा आंतरराष्ट्रीय देखरेखीखाली नष्ट केला पाहिजे असा आग्रह धरला आहे.

अमेरिकेने आज केलेल्या हल्ल्याच्यावेळी इराणचे वरिष्ठ अधिकारी युद्ध् संपवण्यासाठी अमेरिकेसोबतच्या संभाव्य करारावर कतारसोबत चर्चा करण्यासाठी दोहा येथे होते. होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा सुरू करणे. आणि युरोनियम साठ्यावरील वाद सोडवण्यावर चर्चा होणार आहे. (US attacks Iran; Peace talks fall apart)

इराणच्या अब्बास बंदर परिसरात बोटींवर अमेरिकने हल्ला केला. इराण इंटरनॅशनलने दिलेल्या वृत्तानुसार होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ असलेल्या लारक बेटावर झालेल्या अमेरिका इस्त्रायल हल्ल्यात अनेक जण ठार झाले. इराणच्या एसएनएन या वृत्तसंस्थेने या हल्ल्याचे वर्णन अमेरिका इस्त्रायली हल्ला असे केले आहे. स्थानिक वृत्तांनुसार तिघांचा मृत्यू झाल्याचा दावा केला आहे. (US attacks Iran; Peace talks fall apart)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00