महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : बिहार सरकारने महाराष्ट्रातील रहिवाशी आयपीएस शिवदीप लांडे यांच्यावर आता मोठी जबाबदारी दिली आहे. शिवदीप लांडे यावर काय निर्णय घेतात, त्याकडे लक्ष लागले आहे. शिवदीप लांडे बिहारमधील सिंघम म्हणून ओळखले जातात. त्यांनी काही दिवसांपूर्वी अचानक प्रशासकीय सेवेचा राजीनामा दिला होता. सरकारने त्यांचा राजीनामा अजून स्वीकारलेला नाही. राजीनामा दिल्यानंतर शिवदीप लांडे यांच्याकडून धमाकेदार कामगिरी सुरु आहे. त्यांनी तनिष्क शोरुम प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीने न केल्यामुळे संपूर्ण पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांचे निलंबन केले होते. आता त्यांची पोलीस महानिरीक्षक (प्रशिक्षण) म्हणून पटण्यात बदली केली आहे. (Shivdeep Lande)
बिहारचे सिंघम…
शिवदीप वामनराव लांडे २००६ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांचा जन्म अकोला जिल्ह्यातील असून आई वडील हे सर्वसामान्य शेतकरी वर्गातील आहेत. त्यांना आदर्श मानणारे अनेक युवकांमध्ये महाराष्ट्रातील युवक आहेत. ते महाराष्ट्रातील युवकांच्या नेहमी मार्गदर्शन आणि मदतही करत असतात. त्यांच्या राजीनाम्याची बातमी समजल्यावर संपूर्ण बिहारमध्ये धक्का बसला. शिवदीप लांडे बिहारमध्ये ‘सुपरकॉप’ आणि ‘सिंघम’ नावाने ओळखले जातात. ( Shivdeep Lande)
केवळ ३३ दिवसांत त्यांची पुन्हा बदली झाली आहे. त्यांनी ६ सप्टेंबर रोजी पूर्णिमाचे आयजी म्हणून कार्यभार घेतला होता. त्यानंतर १९ सप्टेंबर रोजी राजीनामा दिला. मुझफ्फरपूरमधील भूमाफियावर केलेल्या कारवाईमुळे त्यांची बदली झाल्याची चर्चा होती. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला होता.
हेही वाचा :
- महायुती सरकारचा निर्णयांचा धडाका
- याकडे पाहून सुचली नॅनोची कल्पना
- ‘लाडकी बहीण योजने’मुळे विरोधकांना धडकी; मुख्यमंत्र्यांची टीका