महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाने दुपारी अडीचच्या सुमारास जाहीर केलेल्या आकडेवारी नुसार राज्यात नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आघाडीने ९० पैकी २३ जागा जिंकल्या असून २४ जागांवर आघाडी घेतली होती. भाजपने १५ जागा जिंकल्या असून १४ जागांवर आघाडी घेतली आहे. तर, पीडीपीने २ जागा जिंकल्या असून २ जागांवर आघाडीवर आहे. (Omar Abdullah)
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्स-काँग्रेस आघाडीने बहुमताची निर्णायक आघाडी घेतली आहे. या निकालावर नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ”मला आशा आहे की ओमर अब्दुल्ला मुख्यमंत्री बनतील.
दशकानंतर जनादेश
फारुख अब्दुला म्हणाले, “दहा वर्षांनंतर लोकांनी जनादेश दिला आहे. आम्ही ‘अल्लाह’कडे प्रार्थना करतो की त्यांच्या अपेक्षा पूर्ण करू. जनतेचे राज्य असेल.” आम्ही राज्यात माध्यमांना स्वातंत्र्य असेल. तुरुंगातील निरपराध लोकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करू.हिंदू आणि मुस्लिमांमध्ये विश्वासाचे नाते निर्माण करावा लागेल. इंडिया आघाडीतील पक्ष जम्मू- काश्मीरला राज्याचा दर्जा बहाल करण्यासाठी आमच्यासोबत संघर्ष करतील. मला वाटते की ओमर अब्दुल्ला मुख्यमंत्री होतील.” (Omar Abdullah)
ओमर अब्दुल्ला यांनी बडगाम आणि गांदरबल या दोन जागांवर निवडणूक लढवली होती. ओमर यांनी बडगामची जागा १८,४८५ मतांनी जिंकली आहे, तर गांदरबलमधून ते १०,२०० मतांच्या फरकाने आघाडीवर आहेत.
पीडीपी ला धक्का..
जम्मू- काश्मीरमधील निवडणुकीत पीडीपी पक्षाच्या सर्वेसर्वा मेहबुबा मुफ्ती यांना धक्का बसला आहे. श्रीगुफ्वारा-बिजबेहारा मतदारसंघातून मेहबुबा मुफ्ती यांच्या कन्या इल्तिजा मुफ्ती यांचा पराभव झाला आहे. येथे नॅशनल कॉन्फरन्सचे बशीर अहमद शाह विरी यांनी ९,७७० मतांनी विजय मिळवला आहे. दुपारी ३ वाजता मिळालेल्या आकडेवारीनुसार, पीडीपीचे २ उमेदवार जिंकले असून २ आघाडीवर आहेत.
हेही वाचा :
- डी. वाय. पाटील कृषी-तंत्र विद्यापीठाचा पहिला दीक्षांत समारंभ उत्साहात
- गोकुळकडून दूध उत्पादकांना ११३ कोटी ६६ लाखाची दिवाळी भेट
- सलमानच्या मानधनावर बिग बाँसकडून पाण्यासारखा पैसा खर्च