Home » Blog » व्हिक्टर ॲम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांना वैद्यकीय क्षेत्रासाठीचे नोबेल जाहीर

व्हिक्टर ॲम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांना वैद्यकीय क्षेत्रासाठीचे नोबेल जाहीर

The Nobel Prize : व्हिक्टर ॲम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांना वैद्यकीय क्षेत्रासाठीचे नोबेल जाहीर

by प्रतिनिधी
0 comments
The Nobel Prize

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : अमेरिकेचे व्हिक्टर ॲम्ब्रोस आणि गॅरी रुवकुन यांना वैद्यकीय क्षेत्रातील विशेष कामगिरीबद्दल यंदाचे नोबेल पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. पुरस्कारांची घोषणा आज (दि. ७) करण्यात आली. मायक्रो आरएनएच्या (microRNA) शोधाबद्दल व्हिक्टर ॲम्ब्रोस आणि गॅरी रुवकुन यांना हा पुरस्कार देण्यात येत असल्याचे जाहीर करण्यात आले.

जनुकांच्या क्रियाकलापांचे नियमन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या मायक्रोआरएनए या सूक्ष्म रेणूच्या शोधाबद्दल या दोघांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आल्याचे निवड समितीने म्हटले आहे. आपल्या शरीरातील सर्व पेशींची जनुके सारखीच असली तरीस्नायू आणि चेतापेशी यांसारख्या विविध प्रकारच्या पेशींची कार्ये वेगवेगळी असतातसे या शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. अर्थशास्त्रसाहित्यशांतताविज्ञान अशा क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींसाठी नोबेल पुरस्कार देण्यात येतो. दरवर्षीप्रमाणे यंदाही वैद्यकीय क्षेत्रासाठी पहिल्यांदा पुरस्काराची घोषणा करण्यात आली. त्यानंतर आता यापुढे १४ ऑक्टोबरपर्यंत अन्य क्षेत्रांतील पुरस्कारांची घोषणा करण्यात येईल.

हेही वाचा :

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00