Home » Blog » बस अपघातात १७ प्रवाशांचा होरपळून मृत्यू

बस अपघातात १७ प्रवाशांचा होरपळून मृत्यू

by प्रतिनिधी
0 comments
17 killed in Chitradurga accident

चित्रदुर्ग : कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग ४८ वर झालेल्या भीषण अपघातात स्लीपर प्रवासी बसमधील १७ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांना हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल केले. नाताळ सणाचा जल्लोष सुरू असताना पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. (17 killed in Chitradurga accident)

मिळालेल्या माहितीनुसार चित्रदुर्ग जिल्ह्यातील हिरियूर तालुक्यातील गोरलार्थ क्रॉसिगजवळ बेंगळुरूच्या दिशेना जाणारा मालवाहू ट्रकचे नियंत्रण सुटले आणि दुभाजक ओलांडून ट्रक बेंगळुरूहून शिवमोग्गाकडे जाणाऱ्या खासगी प्रवासी बसला जोरात धडकला. बसच्या धडकेनंतर डिझेल टँकमधील गळतीने बसने पेट घेतला. बसमध्ये ३५ प्रवासी होते व ते साखर झोपत होते. बस मध्यभागीच पेटल्याने अनेकजण अडकून पडले. बस जळून पूर्णपणे खाक झाले. अनेक प्रवासी बाहेर पडले. त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल केले. प्राथमिक माहितीनुसार बसमधील १७ प्रवाशांचा मृत्यू झाला. हिरियर ग्रामीण पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. (17 killed in Chitradurga accident)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00