नवी दिल्ली : तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या बहिणींना पोलिसांनी मारहाण केल्यानंतर सोशल मिडियावर इम्रान खान यांच्या प्रकृतीबाबत अफवा उठल्या आहेत. अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील अनेक सोशल मिडिया हँडलवर असा दावा करण्यात आली आहे इम्रानची आदिया येथील तुरुंगात हत्या करण्यात आली आहे. ऑगस्ट २०२३ पासून इम्रान खान तुरुंगात आहेत. (Imran Khan)
इम्रान खान यांची बहिणी नोरीन नियाझी, अलिमा खान आणि उज्मा खान या इम्रान खानची भेट घेण्यासाठी तुरुंगात गेल्या होत्या. पण प्रशासनाने त्यांना भेटून दिले नाही. त्यानंतर त्यांनी तुरुंग परिसरात ठिय्या मांडल्यावर पोलिसांनी त्यांच्यावर हल्ला चढवल्याचे वृत्त आहे.
इम्रान खान यांची बहिणी नॉरिन नियाजी म्हणाल्या. “आम्ही त्यांच्या प्रकृतीच्या चिंतेबद्दल शांततेने निषेध केला. आम्ही रस्ते अडवले नाहीत, सार्वजनिक हालचालींना अडथळा आणला नाही, किंवा कोणत्याही बेकायदेशीर कृत्यात सहभागी झालो नाही. तरीही आम्हाला पूर्वसूचना न देता परिसरातील स्ट्रिट लाईट अचानक बंद करण्यात आल्या, आणि आमच्यावर हल्ला केला. माझे वय ७१ असून माझे केस धरुन जमिनीवर फेकण्यात आले. त्यामुळे मी जखमी झाली आहे”. (Imran Khan)
या घटनेनंतर रावळपिंडीतील अदियाला तुरुंगाबाहेर हजारो पीटीआय समर्थक जमले असून त्यांनी इम्रान खान यांच्यावरील कारवाईचा निषेध केला आहे. इम्रान खान यांना भेटण्यासाठी गेल्या महिन्याभरापासून सरकारने परवानगी नाकारली आहे. खैबर पख्तूनख्वाचे मुख्यमंत्री सोहेल आफ्रिदी यांनाही इम्रान खान यांना भेटण्यास परवानगी दिलेली नाही. त्यांनी सात वेळा तुरुंग प्रशासनाकडे परवानगी मागितली आहे. (Imran Khan)