Home » Blog » Three arrested from Karnataka : हॉस्पिटल डीनच्या घरफोडीचा लागला छडा, कर्नाटकातील तिघांना ठोकल्या बेड्या

Three arrested from Karnataka : हॉस्पिटल डीनच्या घरफोडीचा लागला छडा, कर्नाटकातील तिघांना ठोकल्या बेड्या

by प्रतिनिधी
0 comments
Three arrested from Karnataka

कोल्हापूर : प्रतिनिधी : राजर्षी शाहू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या डीन डॉ. अनिता अरुण परीतेकर यांच्या घरात झालेल्या चोरीचा छडा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने छडा लावला. सव्वा महिन्याने पोलिसांनी कर्नाटकातील तीन संशयितांना अटक केली आहे. वेंकटेश रमेश (वय २३, रा. चलकेरे, जि.चित्रदुर्ग, कर्नाटक, सध्या रा. बेंगळुरु), गिरीश वेंकटेश (वय २१, मुळ गाव बोंमवारा, ता. देवनहल्ली, जि. बेंगळुरु, सध्या रा. बेंगळुरु). रणजित रमेश  (रा. चलकेरे, जि.चित्रदुर्ग, कर्नाटक, सध्या रा. बेंगळुरु) अशी संशयितांची नावे आहेत.  (Three arrested from Karnataka)

न्यू शाहूपुरी येथील टुरिस्ट आणि अट्रिया हॉटलच्या मागे असलेल्या पाटणकर पार्क येथील डॉ. अनिता परितेकर यांच्या घरी ११ ऑगस्ट रोजी सकाळी अकरा ते दुपारी अडीच दरम्यान चोरी झाली. चोरट्यांनी कडी कोयंडा उचकटून हिरे, सोन्याचे दागिने, मोबाईल फोन असा ४२ लाख ३४ हजार ७९५ रुपयांचा माल लंपास केला होता. शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. (Three arrested from Karnataka)

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने समांतर तपास करताना सीसीसीटीव्हीची मदत घेतली. कर्नाटक राज्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगार व्यंकटेश रमेश याने साथीदारांसह चोरी केल्याचे निष्पण झाले. पोलिसांनी कर्नाटक राज्यात आठ दिवस सापळा रचून वेंकटेश रमेश आणि गिरीश वेंकटेश यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी करुन घराची झडती घेतली असता ९०.७६ ग्रॅम वजनाचे सोने आणि हिऱ्याचे दागिने हस्तगत केले. तसेच गुन्ह्यात वापरलेली चारचाकी आण दुचाकी जप्त केली. या गुन्ह्यात वेंकटेश रमेशचा भाऊ रणजित रमेश यालाही ताब्यात घेतले. पोलिसांनी उर्वरित १६० ग्रॅम वजनाचे सोने हस्तगत केले. पोलिसांनी या गुन्ह्यातील २५०.७६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, वाहने असा ३६ लाख ७० हजार १२० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. गुन्ह्यात वापरलेली मोटर सायकल संशयितांनी पुण्यातील सांगवी येथून चोरुन नेल्याचे तपासात उघड झाले. (Three arrested from Karnataka)

पोलिस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. धीरजकुमार, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलिस उप निरीक्षक संतोष गळवे, शेष मोरे, पोलिस हवालदार महेश खोत, लखनसिंह पाटील, शुभम संकपाळ, संजय कुंभार, सागर माने, महेश पाटील, विजय इंगळे, संदीप बेंद्रे, विशाल चौगले, विलास किरोळकर, अमित सर्जे, समीर कांबळे, योगेश गोसावी, सुशील पाटील, हंबीरराव अतिग्रे, सागर चौगुले, सायबर पोलिस ठाण्यातील सचिन बेंडखेळे, धनंजय घुगरे यांनी तपास केला. (Three arrested from Karnataka)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00