नवी दिल्ली : महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क | राष्ट्रवादी पक्षाच्या घड्याळ चिन्हाबाबतची सुप्रीम कोर्टातील सुनावणी पुन्हा लांबणीवर पडली आहे. आता १५ ऑक्टोबरला ही सुनावणी होणार आहे. राष्ट्रवादी पक्ष फुटीनंतर निवडणूक आयोगाने घड्याळ चिन्ह अजित पवार गटाला दिले. त्याविरोधात शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. आज (दि. १) त्यासंदर्भात सुनावणी होणार होती. पण, आता ती पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीवेळी सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटाला काही अटींवर घड्याळ चिन्ह वापरण्यास परवानगी दिली होती. राज्यात विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. या पार्श्वभूमीवर घड्याळ चिन्हाबाबत काय निर्णय होणार, याची उत्सुकता लागून राहिली आहे. (Supreme Court of India)
हेही वाचा :
- रोहित सेनेचा डंका; कानपूर कसोटीत ७ विकेट राखून विजय
- Govinda Bullet Injury : रिव्हॉलव्हरमधून चुकून गोळी उडाली; अभिनेता गोविंदा जखमी
- ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर