जत : तालुक्यातील रेवनाळ येथे लांडग्याच्या हल्ल्यात वीस मेंढ्या, तर चार कोकरे मृत्युमुखी पडली आहेत. या घटनेत सोपान लोखंडे (रा.रेवनाळ ता.जत) यांच्या परिवाराचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. सोमवारी (दि.३०) पहाटे ही घटना घडली. मेंढ्या ओरडण्याचा आवाज येताना लोखंडेंसह कुटुंबीय जागे झाले. त्यानंतर लांडग्याच्या कळपाने तेथून धूम ठोकली. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच वन पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन पाहणी करून पंचनामा केला. या परिवाराला तत्काळ मदत मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे. (Sangli News)
अधिक माहिती अशी की, सोपान लोखंडे हे शेतीसह जोडधंदा म्हणून मेंढपाळ व्यवसाय करतात. लोखंडे हे घरामध्ये झोपलेले असताना सोमवारी (दि. ३०) पहाटे चारच्या सुमारास लांडग्याच्या कळपाने घराच्या शेजारी उभारण्यात आलेल्या मेंढ्याच्या वाखरीत हल्ला चढविला. या हल्ल्यात २० मोठ्या मेंढ्या व चार लहान कोकरे यांचा जागीच मृत्यू झाला. मेंढ्यांच्या ओरडण्याचा आवाज येत असल्याने लोखंडे परिवार जागा झाला. त्यानंतर लांडग्याच्या कळपाने तेथून धूम ठोकली.
यावेळी जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे यांनी रेवनाळ येथे जाऊन लोखंडे परिवाराची भेट घेतली. त्यांना प्रकाशराव जमदाडे यूथ फाउंडेशनकडून ११ हजार रुपयांची मदत केली. शासन व प्रशासनाकडे पाठपुरावा करून लोखंडे परिवाराला तत्काळ नुकसानभरपाई मिळवण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही जिल्हा बँक संचालक प्रकाश जमदाडे यांनी दिली. (Sangli News )
हेही वाचा :
- रोहित सेनेचा डंका; कानपूर कसोटीत ७ विकेट राखून विजय
- Sambhajiraje Chhatrapati | संभाजीराजे यांच्या ‘स्वराज्य’ला मिळाले चिन्ह
- Govinda Bullet Injury : रिव्हॉलव्हरमधून चुकून गोळी उडाली; अभिनेता गोविंदा जखमी