Home » Blog » KMT’s 156 remaining in service : के.एम.टी. रोजंदारीवरील १५६ कर्मचारी सेवेत कायम

KMT’s 156 remaining in service : के.एम.टी. रोजंदारीवरील १५६ कर्मचारी सेवेत कायम

by प्रतिनिधी
0 comments
KMT's 156 remaining in service

कोल्हापूर  : प्रतिनिधी :  राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी राज्य शासनाकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे कोल्हापूर महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या वाहतूक विभागाकडील (केएमटी) १५६ कर्मचारी सेवेत कायम करण्यात आले. या निर्णयाबद्दल केएमटी कर्मचाऱ्यांनी गुलाल उधळून आणि फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला. (KMT’s 156 remaining in service)

आमदार राजेश क्षीरसागर यांनी पत्रकाद्वारे माहिती दिली आहे. पत्रकात असे म्हटले आहे की,  केएमटी कडील रिक्त असणाऱ्या चालक,  वाहक पदांवर बदली प्रतीक्षा यादीवरील जेष्ठ व विनियमातील तरतुदीनुसार पात्र ठरणाऱ्या रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याच्या प्रस्तावास शासनाने मान्यता दिली आहे. नगरविकास मंत्री व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रस्तावावर सही करून के.एम.टी.च्या रोजंदारी कर्मचाऱ्यांनाही सेवेत कायम करण्याचा निर्णय घेतला आहे. (KMT’s 156 remaining in service)

गेले३० ते ३५ वर्षे रोजंदारी कर्मचारी न्यायाच्या प्रतीक्षेत होते. विधानसभा निवडणुकीपूर्वी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या यशस्वी पाठ पुराव्यामुळेच महानगरपालिकेतील आरोग्य विभागाकडील ५०८ रोजंदारी कर्मचारी कायम करण्यात आले होते.  यावेळी काही तांत्रिक त्रुटीमुळे के.एम.टी.तील १५६ कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा निर्णय लांबणीवर पडला होता. याबाबत आमदार राजेश क्षीरसागर यांनी सातत्याने पाठपुरावा केला. अखेर त्यांचा पाठपुरावा यशस्वी झाला आणि के.एम.टी.चे रोजंदारी कर्मचारी कायम करण्याचा निर्णय उप मुख्यमंत्री शिंदे यांनी  घेतला. आमदार क्षीरसागर यांच्या प्रयत्नामुळे महापालिकेतील कर्मचाऱ्यांना दुसऱ्यांदा न्याय मिळाला आहे. (KMT’s 156 remaining in service)

या निर्णयानंतर के.एम.टी. कर्मचाऱ्यांनी आमदार क्षीरसागर यांचे जाहीर आभार मानले. राजेश क्षीरसागर यांच्या निवासस्थानाजवळ जल्लोष करण्यात आला.   क्षीरसागर यांची भेट घेवून मनपूर्वक जाहीर आभार मानले. (KMT’s 156 remaining in service)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00